ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Friday, October 28, 2016

माळ_स्त्रीसामर्थ्याची - माळ अकरावी

मृणाल...मृण्मयी!!: *नमस्कार!!*

  रंगांच्या किमयांमधून भावनांचे *मुलभूत संवेदन* दिसून येते. मानवी संवेदनेसारखे रंगांतही जसे *गुण तसे दोष* ही प्रकट होतात. एक रंग *स्वतःच्या संवेदना जपूनच* दुसऱ्याच्या संवेदनेत मिसळतो.एक रंग *दुसऱ्याच्या संवेदनाच नष्ट* करून मिसळून जातो. तर कधीकधी एक रंग स्वतःच्या संवेदनेबरोबर दुसऱ्या रंगाच्या *संवेदना जपत जपत* स्वतः रंगतोच अन् दुसऱ्याला ही  रंगवतो!!!

*🌹आजचा रंग गुलाबी*

महिलांना विशेष भावणारा हा रंग सृजनतेचे,भावनांचे,सर्जनशीलतेचे,प्रेमाचे,जिव्हाळ्याचे प्रतिक आहे.

🌹 *या रंगाचे वैशिष्ट्य घेऊन येणारी आजची अकरावी माळ गुंफुया!!*

⚡ *अकरावी माळ स्त्री-सामर्थ्याची*⚡

⚡ *राखी गोविंदराव चव्हाण*⚡

🌹 *परिचय:*

◾जन्म - चंद्रपूर
◾शिक्षण - बी.ए., एम.ए.(अर्थशास्त्र), जनसंवाद(mass communication) पदवी
◾वडील जिल्हा परिषदेत अधिकारी होते. आई-गृहिणी, मोठा भाऊ बिझनेसमन
-बारावीपर्यंतचे शिक्षण चिमूर, ब्रम्हपूरी यासारख्या छोट्या गावांमध्ये(वडिलांच्या बदल्यांमुळे)

🌹 *व्यवसाय*

◾जनसंवाद पदवीनंतर लोकसत्ता वर्तमानपत्रातून पत्रकारितेला सुरूवात
-सुरूवातीची दोन वर्ष चंद्रपुरला.

◾नोव्हेंबर २००७ पासून आजतागायत नागपुरात दरम्यानच्या काळात दिड वर्ष महाराष्ट्र टाइम्सला, पण भाषेअभावी लोकसत्तात परत.

◾ ई टीव्ही मराठी आणि झी २४ तास ची आॅफर, पण पिंड लिहिण्याचा असल्याने आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये बातमी कमी आणि झगमगाट अधिक असल्याने नकार दिला.

◾सुरूवातीपासून जंगल, वन्यजीव, पर्यावरण यावर लिखाण.

◾बातम्यांमुळे वनखात्याला अनेक निर्णय बदलावे लागले .

◾लोकरंग, चतुरंग पुरवण्यांमध्ये त्यावर अनेक लेख, तर पहिल्या बातम्यांचा चांगला परिणाम.

◾वर्षभरापूर्वी मुंबईला लोकसत्तातर्फे  आयोजित  "बदलता महाराष्ट्र" या पर्यावरण विषयक  परिषदेची संपूर्ण जबाबदारी, परिषदेला प्रचंड प्रतिसाद आणि पर्यावरण क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती.

◾सी-६० या नक्षलविरोधी पथकातील गडचिरोली जिल्ह्यातील पहिली महिला कमांडर कमला आलाम हिची लोकसत्ताला मी घेतलेली मुलाखत संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. त्यावेळी तिला मराठी भाषा येत नव्हती. माडिया भाषा येत होती. मोडक्या-तोडक्या भाषेत आमचा संवाद रंगला.
या मुलाखतीनंतर ती महाराष्ट्राला परिचित झाली आणि "अनन्य सन्मान", "हिरकणी सन्मान" आदि पुरस्कारांची मानकरी ठरली.

◾अजूनही कमला प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करते, तोच माझ्यासाठी मोठा पुरस्कार.

◾सिंदेवाहासारख्या लहानश्या गावातील पॅथाॅलाॅजिस्ट भारती या महिलेने जनावरांच्या शरिरात आढळणारा जिवाणू मानवी रुग्णाच्या शरिरात शोधला, त्यावेळी तिच्या संशोधनाची दखल विदेशात  घेतली गेली.

पण नागपुरातील काही प्रसिद्ध वैद्यकांना हे रुचले नाही आणि तो रूग्ण  नागपुरात उपचारासाठी आणल्यावर तिला प्रचंड त्रास देण्यात आला. तिचा संपूर्ण प्रवास लोकसत्ता मधून अवघ्या महाराष्ट्रासमोर गेला तेव्हां तिला नागपूर विद्यापीठाने पुढील संशोधनासाठी पूर्ण मदत देऊ केली, पण तिने नाकारली. हा माझ्यासाठी दुसरा पुरस्कार होता.

🌹 *आवड*

◾मला जंगलात पायी भटकंती करायला खुप आवडते आणि तशी भटकंती मी करतेसुद्धा. याव्यतिरिक्त गाणी ऐकायला आवडतात, नृत्य बघायला आवडतं.

  
◾ *सुचिकांतजी:*

सर्वांना नमस्कार,

मी *सुचिकांत*,  *|| ज्ञानभाषा मराठी ||* समूहाच्या *#माळ_स्त्रीसामर्थ्याची* या उपक्रमांतर्गत आयोजित मुलाखतीत *राखी चव्हाण* यांचे स्वागत करतो.

*राखी चव्हाण:*
धन्यवाद 🙏🏻

*मृणाल...मृण्मयी:*
🙏

◾ *सुचिकांतजी:*
नमस्कार राखी ताई
विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.💐
जंगल आणि वन्यजीव या विषयवरील वैविध्यपूर्ण लेखनाबद्दल तुमचे अभिनंदन, करून आजच्या मुलाखतीची सुरुवात करतो.

*राखी चव्हाण:*
धन्यवाद

◾ *सुचिकांतजी:*
सर्वप्रथम आम्हाला, तुमचे मूळ गाव आणि शालेय जीवनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल...

*राखी चव्हाण:*
मुळ  गाव चंद्रपूर.. प्राथमिक शिक्षण चिमूर..त्यानंतर  ब्रम्हपूरी

◾ *सुचिकांतजी:*
चिमूर, ब्रम्हपुरीच्या काही छान आठवणी आहेत ?

*राखी चव्हाण:*
ब्रम्हपूरीला खूप आठवणी आहेत.

*राखी चव्हाण:*
अगदी माझं  टोपण नाव त्या गावातच पडलं

◾ *सुचिकांतजी:*
काय आहे तुमचं टोपण नाव ?😄

*राखी चव्हाण:*
बोद्या म्हणायचे सगळे मला😜
एवढी गुबगुबीत होते.बाबांचे मित्र  होते डाॅक्टर, त्यांच्यामुळे ते नाव!!

◾ *सुचिकांतजी:*
मस्त ...पहिल्या प्रश्नाकडे वळूया ..

तुम्ही एम् ए (इकॉनॉमिक्स) असून व त्यामध्ये अनेक संधी असतानाही पत्रकारीतेकडे कश्या वळल्या? - निवेदिता खांडेकर

*राखी चव्हाण:*
मी ठरवून असे काहीच केले नाही, त्यावेळी मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं.मित्रमंडली वळली, म्हणून!!पण लिखाणाची आवडे होती

◾ *सुचिकांतजी:*
तुम्ही कोणत्या विषयात लेखन करायचा ?त्यावेळी आवडीचे विषय कोणते असायचे ?

*राखी चव्हाण:*
जंगल आणि  निसर्ग...सुरूवातीपासूनच लळा होता.चंद्रपूरला तसेही जंगल भरपूर

*मृणाल...मृण्मयी:*
😀वाघाचा

*राखी चव्हाण:*
हो

◾ *सुचिकांतजी:*
वा मस्तंच ...तुम्हाला पाळीव प्राणी आवडतात? की फक्त जंगलातले?

*राखी चव्हाण:*
खरं  सांगू , पाळीव प्राणी  अजिबात आवडत नाही😜पण जंगलातल्या प्राण्यांचा लळा जास्त!

*शंकर सर:*
आवड किती वेगळी👌🏽✔

*राखी चव्हाण:*
हो, लळाच, कारण कधीही जंगलात जाते

*मृणाल...मृण्मयी:*
रानपरी!!

◾ *सुचिकांतजी:*
पर्यावरणावर लिखाण/लेख करताना काय विशेष अभ्यास व पूर्वतयारी करावी लागते? - राहुल वेळापुरे

*राखी चव्हाण:*
तज्ज्ञांशी बोलावें लागतं.कारण आपण जे लिहिणार ते वाचकांसमोर जाणार असतं.ते चूक नको जायला.

◾ *सुचिकांतजी:*
इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर तुम्हाला या गोष्टींची काळजी करावी लागते? तुम्ही मार्गदर्शन घेता ?

*राखी चव्हाण:*
वर्ष कितीही झाली तरी माणूस कायम शिकत  असतो.लहानांकडूनही बरंच शिकायला मिळतं.मोठ्यांकडूनही अनुभव मिळतो.त्यातून आपल ज्ञान वाढतं.

◾ *सुचिकांतजी:*
तुमच्या पूर्ण प्रोफेशन मध्ये .. अनेकवेळा तुम्हाला जंगलांना भेटी द्याव्या लागतात, रानावनात फिरावे लागते.. यात गाईड, वाटाडे,  स्थानिक रहिवासी यांच्याकडे कशा पद्धतीने बघता ? किती महत्त्वाची भूमिका पार पाडतात हे लोक ?

*राखी चव्हाण:*
खुप मोठी भुमिका आहे त्यांची!!कारण जंगलाचं जेवढं  ज्ञान,अभ्यास त्यांचा असतो तेवढा अधिकार्यंचा सुद्धा नसतो.अधिकारी शहरात वातानुकूलित कार्यालयात बसतात, पज्ञ ती माणसं कायम जंगलात पाया भटकंती करतात!!

*सुचिकांतजी:*
जंगल तोंड पाठ झालेलं असत ..

*राखी चव्हाण:*
फार कमी अधिकारी आहेत, जे आपल्या स्टाफसोबत पायी फिरतात
अलिकडे जंगल तोंडपाठ असणारे पण कमी झालेत.

*राखी चव्हाण:*
मला तो अनूभव नागझिरा जंगलात आला

◾ *सुचिकांतजी:*
त्यावर सांगाल ?

*राखी चव्हाण:*
प्राणी गणना सुरू असताना वनरक्षक रस्ता विसरला.

*राखी चव्हाण:*
आणि मग आम्ही  पहिल्याच दिवशी १७ किलोमिटर भटकलो.६ दिवस दररोज १५ किलोमिटर  पायी फिरायचो

◾ *सुचिकांतजी:*
इकडे सिंहगडच्या जंगलात पण लोक रस्ता भटकतात .. मग तिकडे काय अवस्था झाली असेल हो तुमची !!!

*राखी चव्हाण:*
खुप घनदाट जंगल आहे नागझि-याचे.मध्येच वाघाते पगमार्क दिसायचे.२७ जणांमध्ये मी एकटी मुलगी

◾ *सुचिकांतजी:*
पोटापाण्याचं काय केलं ६ दिवस ?

*राखी चव्हाण:*
आम्ही शिधासामान नेलेले सोबत.खानसामा करून द्यायचा गरमगरम जेवण

◾ *सुचिकांतजी:*
रडू फुटलं तुम्हाला ? की धीर धरला होता ?

*राखी चव्हाण:*
अजिबात रडले नाही.मुंबई हून २ मुली आलेल्या, दुस-याच  दिवशी परत

◾ *सुचिकांतजी:*
हा हा .. मग त्यांना कसा रस्ता सापडला ?

*राखी चव्हाण:*
मी मानद वन्यजीव रक्षक कुंदन होते यांच्यासोबत गेलेले.आज मी जेवढं  काही जंगल  जाणते ते त्यांच्यामुळे!!एकदा तर आम्हाला सलग एकापाठोपाट तिन अस्वलींचा सामना करावा लागला.वनखात्याची माहितीवर पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही!!त्यासाठी आपलें दुवे पण कामी लावावे लागतात.

*मृणाल...मृण्मयी:*
तीन स्त्री पत्रकार समूहात पण सगळ्यांचा बाज वेगळा आणि आपापल्या क्षेत्रात माहीर!!🙏🙏

◾ *सुचिकांतजी:*
पुढचा प्रश्न घेतो ... राखीताई,
व्याघ्रगणना किंवा इतर प्राणी, पक्ष्यांची गणना होते तेव्हा एक पत्रकार म्हणून वनखात्याकडून मिळालेल्या संख्येला प्रमाण मानून तुम्ही ती बातमी देता की त्यासाठी तुम्ही वैयक्तिक पातळीवर शहानिशा करून शोध घेता?
वनपरिक्षेत्रात येणाऱ्या नैसर्गिक संपत्तीची तस्करी होते, त्यासंदर्भात आपले काही अनुभव असतील तर ऐकायला आवडतील.
डॅा.अमृता इंदूरकर.

*राखी चव्हाण:*
तस्करीचे खुप किस्से आहेत.
सापाचे विष लाखो रूपयांना विकले जाते. असेच  काही तस्कर वनखात्याने पकडले, पण आरोपींना ठेवण्यासाठी अजूनही वनखात्याकडे कोठडी नाही, मग वनाधिका-यांनी रात्रभर कुठे ठेवावे तर वनमंत्र्यांच्या कॅबीनमध्ये.त्यावेळी लोकसत्ताने तो विषय खूप चालवला.एकदा अशाच तस्करांच्या विरोधात  बातमी चालवली तर तब्बल  १५ दिवस धमक्यांचा सामना करावा लागला

◾ *सुचिकांतजी:*
बेकायदेशीर शिकारी थांबण्याकरता आपल्याकडे कडक कायदे आहेत का? त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते आहे असं तुम्हाला वाटतंय का?

*राखी चव्हाण:*
कायदे आहेत, पण मुळात अधिका-यांची काम करण्याची वृत्ती  अंमलबजावणीच्या आड येते.गस्त ही एक समस्या आहे.आपल्याकडे जंगलातील गस्त केवळ वनरक्षकाच्या भरवश्यावर सोडली जाते, जेव्हा की वरिष्ठांनी जाणेसुद्धा अपेक्षित आहे.Petroling म्हणजे  पायदळ गस्त!!सरकारने जंगलाच्या सुरक्षेसाठी विशेष व्याघ्र संरक्षण दल दिले आहे

◾ *सुचिकांतजी:*
दहशत असते का, तस्करांची ?

*राखी चव्हाण:*
दहशत नाही

◾ *सुचिकांतजी:*
नागपूर, सातपुडा, मध्यप्रदेश भागात अनेक व्याघ्रप्रकल्प आहेत. तुमचं निरीक्षण काय सांगतं ? मध्यप्रदेश सरकार वन्यजीवांच्या बाबतीतल, जंगलांच्या बाबतीत अधिक संवेदनशील आहे की, महाराष्ट्र सरकार?

*राखी चव्हाण:*
पण त्या जवानांना ईतर कामात  गुंतवलं जातं..आधी जंगल संवर्धन बाबत महाराष्ट्र आघाडीवर होता, आदर्श होता, आता मध्यप्रदेश

*राखी चव्हाण:*
त्यांची यंत्रणा खुप छान काम करते

◾ *सुचिकांतजी:*
१-२ गोष्टी ज्या तिथे आहेत, आणि आपल्याकडे नाहीत ?

*राखी चव्हाण:*
आपण वाघावरून राजकारण  करतो.प्रादेशिक  आणि वन्यजीव विभागातील दुफळी वन्यजीवांच्या शिकारिवर बेतत  आहे

◾ *सुचिकांतजी:*
म. प्र. तील पेंच मध्ये फिरायचे असल्यास, वनविभागाची गाडी लागते. तेच ताडोबात, वैयक्तिक सुमो फिरतात. हे चित्र तर मला खूपच दुखद वाटते ...

*राखी चव्हाण:*
माॅनिटरिंगच्या बाबतीत मध्यप्रदेशची तारीफ करावी लागेल.यंत्रणा खुप छान आहे त्यांची वाघ माॅनिटरिंगची
वाघाच्या प्रत्येक हालचालिंवर त्यांचं लक्ष असतं.त्यांचा कोणता वाघ कुठे आहे हे माहिती असतं.

*सुचिकांतजी:*
सहीच ..

*राखी चव्हाण:*
आज आपण एक वाघ सहा महिन्यापासून बेपत्ता असून शोधूनि शकलो नाही.रेडिओ काॅलर केलेल्या जगप्रसिद्ध वाघाबद्दल ही स्थिती!!

◾ *सुचिकांतजी:*
अवघड आहे खूपच आपलं 😒 बफर, मुख्य, आणि घनदाट असे ३ भाग केले तर तुम्हाला कोणत्या भागात फिरायला अधिक आवडतं? किंवा जैवविविधतेच्या दृष्टीने प्रत्येक भागाचे वैशिष्ट्य काय सांगाल ?

*राखी चव्हाण:*
माझ्या भटकंतीला सीमा नाही, जंगल बफर असेल, गाभा क्षेत्रातले असेल वा साधे गावालगतचे।
जंगल माझ्यासाठी आॅक्सिजन आहे
बफरमूळे गावकर-यांचां पूनर्वसन करावं  लागतं  आणि गावकरी व वनविभाग यात  दरि निर्माण होते, त्याचा परिणाम जंगल संवर्धन वर होते.मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होतात.

*सुचिकांतजी:*
अच्छा ,, म्हणजे बफर मुळे ... अशा घटना ऐकू येतात नेहमी ...

*राखी चव्हाण:*
आज "जय" नामक वाघ गमावलाय तो त्यामुळेच

*गणेश हजारे सर:*
"जय" बेपत्ता आहे,  हे मुलांना सुद्धा माहित आहे. खूप वाईट वाटतय बर्‍याच लोकांना नागपूरला. 🙁

◾ *सुचिकांतजी:*
काय झाली घटना ?

*राखी चव्हाण:*
थोडं लांब  होईल उत्तर  चालेल , की मुलाखतीनंतर ती स्टोरी  पोस्ट करू

◾ *सुचिकांतजी:*
आपल्या चुकीमुळे एखादा वाघ किंवा वन्यजीव गमावल्यानंतर खूप वाईट वाटतं ...हो ... नक्की

जंगलतोड , याबाबत नेहमी वाईट बातम्या कानावर येतात. पण अनेक संस्था, जंगल प्रेमी, सकारात्मक कामे देखील करत असतात.. तर, जंगल वाढीसाठी उचलली गेलेली काही सकारात्मक पाऊले सांगाल?

*राखी चव्हाण:*
सर बोलणारी स्वयंसेवी भरपूर आहेत, प्रत्यक्षात काम करणारी कमी २ कोटी वृक्षारोपण हे चांगले पाऊल आहे, जंगलवाढीसाठी.!पहिल्यांदा सरकारने नियोजनबद्ध काम केलयै!!!वृक्षारोपण यशस्वी ठरतय, वृक्ष वाढीस लागलीत। झाडांती निवड पर्यावरण पुरक  होती!!

◾ *सुचिकांतजी:*
बफर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उभा राहणारा हॉटेलिंग व्यवसाय! याबाबत तुमचे मत काय ?

*राखी चव्हाण:*
स्थानिकांना यातून काहीच फायदा नाही धनदांडग्यांचे पोट मात्र भरतय
वास्तविक जंगलालगतच्या गावक-यांवर ही धूरा सोपवायला हवी.ज्यामुळे गावकरी आणि वनखात्यातील दरी कमी होईल
पण आपल्याकडे हाॅटेल लाॅबी मोठी आहे

◾ *सुचिकांतजी:*
ताजची पण हॉटेल्स आहेत ..
कसे रोखणार यांना ?

*राखी चव्हाण:*
होय!!अगदी खरे!!ते फक्त म्हणतात गावक-यांना प्रशिक्षण देऊ, प्रत्यक्षात त्यांना नोकर  म्हणून वागवलं जातं.. ताजसारखे मोठे समूह आता जंगलात प्रवेश  करायला लागलेै. पण नागझि-याचा एक प्रयोग आम्ही हानून पाडला!!

मी लोकसत्ता ला आहे म्हणुन  नव्हे, तर बातमीचा परिणाम होतो..राज्यपक्षी ठरवताना असेच  झाले होते.. बीएनएचएस ला राज्यपक्षी रानपिंगळा हवा होता, पण तो दुर्मिळ असल्याने राज्यपक्षी केल्यानंतर आहे तो ही संपला असता

◾ *सुचिकांतजी:*
अच्छा .. असाही धोका असतो ?

*राखी चव्हाण:*
फक्त मेळघाटात तो असल्याने पर्यटक  तिकडे वळले असते.त्याला disturbances निर्माण झाले असते.मी खूप लावून धरला तो विषय, बीएनएचएस मधून बातमी मागे घेण्यासाठी फोन आले

◾ *सुचिकांतजी:*
आलं लक्षात .. किती गोष्टींची काळजी घ्यावी लागते 😊 पुढील प्रश्नाकडे वळतो ..

पर्यावरणीय प्रश्न हाताळताना जंगलात जायचे प्रसंग येतात.प्राणी निरीक्षणात काही गमतीशीर किंवा भीतीदायक प्रसंग असतील तर सांगाल का.? एखादा हिंस्र प्राणी किंवा एखाद्या प्राण्याचं अकल्पित चांगलं वागणं.. - स्वप्नील पाटील

*राखी चव्हाण:*
नागपूरजवळ एक जंगल आहे, तिथे मी कुंदन दादांसोबत माझ्या कुटूंबाला पण घेऊन गेले, आमच्यासोबत छोटी बच्चूपण, आणि  जंगलात पायी फीरत असताना वाघ समोर!!सोबतच्या गार्ड ला तो दिसला, तो धावत  सांगत आला, अवघ्या काही अंतरावर वाघोबा आळोखेपिळोखे देत पसरले होते!!

आम्ही उभे होतो तिथे रेती , ते महाशय उठले असते तर पळायची पण सोय नव्हती!!असाच प्रसंग  पोहरा मालखेडच्या जंगलात बिबट्याबाबत घडला..आयुष्यातले ते दोन प्रसंग न विसरण्यासारखे

◾ *सुचिकांतजी:*
दबावासंबंधी पुढे प्रश्न येतो आहे ....मी परवा इकडे बंगाल टायगर पाहिला ... भला मोठा असतो .. सिंहापेक्षा मोठा वाटला ..
आपले वाघ एवढेच मोठे असतात का ? कि त्यांच्यापेक्षा लहान असतात ?आज मुलाखत लांबेल .. मनसोक्त गप्पा मारा ..

*राखी चव्हाण:*
मला हरकत  नाही
खुप अनुभव सांगण्यासारखे आहेत
जे कदाचित तुम्हाला ऐकायला आवडतील
..जंगल म्हटलं की माझी गाडी सुसाट सुटते😝पण घरी आई खुप कंटाळते😜कानावर हात ठेवते ती अक्षरशः मी फोनवर जंगलाबद्दल बोलत असले  की

पोहरा-मालखेड जंगलात वन्यजीव अभ्यासक  मित्रासोबत पायी भटकंती करताना त्यागने मला अशा ठिकाणी नेले, जी बिबट्याची हमखास बसण्याची जागा आहे.
वाघ किंवा बिबट आसपास असेल तर त्याचा स्मेल  येतो.तो जितक्या जवळ, तितका स्मेल  वाढतो

◾ *सुचिकांतजी:*
आपल्याला पण त्यांचा वास येतो ?

*राखी चव्हाण:*
हो!!ज्यांना जंगल  आणि  वन्यजीवांमध्ये भटकंतीची सवय आहे, त्यांना लवकर कळतं.आम्ही अशा झाडाखाली बसलो ज्या झाडावर त्याच्या नखांचे निशान होते.मला थोडा स्मेल यायला लागल्याबरोबर मी मित्राला म्हटले निघुया का?
तर तो म्हणतो, मॅडम बिबट अजून दूर आहे.आणि काही क्षणातच स्मेल  वाढला आणि आम्ही सपाट्याने तेथून  पळालो

नागझि-याच्या अस्वलींबाबत असाच किस्सा झाला..तब्बल अर्धा तास थरार तीन अस्वली!!

*सुचिकांतजी:*
अस्वल काय फक्त गुदगुल्या करत ना .. काय घाबरायचं त्यात .. 🤓

*राखी चव्हाण:*
समोर आलं  की कळतं ना😜तो माझी पहिलीच जंगल भटकंती होती.६ दिवस  जंगलात

◾ *सुचिकांतजी:*
पुढील प्रश्न घेऊ ? वनखात्याला जेव्हा बदल घडवावे लागले तेव्हा वनखात्याकडून कधी दबाव आला का? bhns च एक उदाहरण दिलेत अजून असेच कोणते ?- राहुल वेळापुरे

*राखी चव्हाण:*
राज्यपक्षीचा किस्सा तर भारीच  होता.वनमंत्र्यांपासून तर सचिवांपर्यंत बातमी थांबवण्यासंदर्भात फोन आले
पण, आव्हाने झेलून काम करण्यात वेगळी मजा असते

*सुचिकांतजी:*
अशा वेळी योग्य गोष्टींना विरोध करणारे आपली भूमिका रेटायला काय युक्तिवाद करतात हे पाहणे रंजक ठरते

*राखी चव्हाण:*
जेव्हा आपल्या बातमीचं चीज होतं , तेव्हा वेगळाच अानंद

◾ *सुचिकांतजी:*
पेज 3, राजकीय, खेळ, संस्कृती, पर्यावरण असे अंतर्गत विभाग असतात. त्यामागे पेज3, राजकीय, खेळ या विभागामध्ये जास्त चढाओढ आणि इतर विभाग दुर्लक्षित.. असा कधी अनुभव आला का? - राहुल वेळापुरे

पर्यावरण , जंगल अशा मुद्द्यांना आजच्या वर्तमानपत्रात योग्य न्याय मिळतो का ?

*राखी चव्हाण:*
लोकसत्तात तरी असा प्रकार नाही.तिथं नेहमीच ख-या बातमीला प्राधान्य दिल्या गेलें आणि जातं..पुरावे आहेत, बातमी खरी आहे तर मग बेधड़क लिहा  असे.. त्याला जागा पण मिळते.

◾ *सुचिकांतजी:*
'भाषेअभावी लोकसत्तात परत' असा परिचयात उल्लेख आहे. त्याचा अर्थ काय? - काळपांडे सर.

*राखी चव्हाण:*
लोकसत्ता ला एका एका मराठी शब्दासाठी फटके पडतात.मराठी पक्के झाले ते लोकसत्तामूळे.

◾ *सुचिकांतजी:*
एवढे गंभीर आहेत लोकसत्ता वाले ?

*राखी चव्हाण:*
हो

*काळपांडे काका:*
अच्छा. आता आलं लक्षात

*राखी चव्हाण:*
काॅलेज लिहिलेलं चालत नाही, महावीद्यालय असंच  लिहावं लागतं

*सुचिकांतजी:*
जब्रा ..उद्यापासून लोकसत्ताचा मी नियमित वाचक होईन .. होम पेजच सेट करून ठेवतो आता ..

◾ *राहुल वेळापुरे:*
काही वृत्तपत्र तरुणाईला आकर्षित करण्यासाठी बातम्यांमध्ये इंग्रजी शब्दांचा पुरेपूर वापर करत आहे.
जिथे लोकसत्ता अनेक नवनवीन मराठी शब्दांचा वापर करत आहेत.. या दोन परस्पर विरोधी गोष्टींमध्ये ऑफिस कल्चरचा प्रभाव जास्त असतो का? -

*राखी चव्हाण:*
आॅफिस  कल्चर म्हणजे ? माफ करा नाही कळला प्रश्न..

◾ *सुचिकांतजी:*
ऑफिसमधले वातावरण .. कार्यालयीन संस्कृती ..की वर्कफ्लो मध्येच आहे तुमच्या ? कि मराठीच तुम्हाला अधिकाधिक वापरायचे आहे ?

*राखी चव्हाण:*
असे काही नाही...कार्यालयीन वातावरणाचा फरक पडतो असे नाही वाटत मला...मराठीच वापरावं लागतं

◾ *सुचिकांतजी:*
बातमीचं आयुष्य ब्रेकिंग न्यूजपुरतं मर्यादित राहिलं आहे असं बऱ्याचदा बोललं जातं.
हल्ली खूप कमी पत्रकार एखाद्या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करतात.. एक पत्रकार म्हणून, आपलं यावर काय म्हणणं आहे? - राहुल वेळापुरे

*राखी चव्हाण:*
इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये हल्ली व्हायला लागलंय असं म्हटलं तरी हरकत नाही, पण बातमी शेवटपर्यंत लावून धरणारेसुद्धा आहेत

◾ *सुचिकांतजी:*
कमांडर कमला आलाम ह्या स्रीरत्ना विषयी जास्तीत जास्त ऐकायला आवडेल! - वृषाली गोखले

*राखी चव्हाण:*
याची लिंक  पोस्ट करेल मी!!

◾ *सुचिकांतजी:*
नक्षलवाद आपण पूर्णपणे मिटवू शकतो का? नक्षली लोकांच्या प्रमुख मागण्या, प्रमुख प्रश्न नक्की काय असतात जे सरकार पूर्ण करू शकत नाही?

*राखी चव्हाण:*
नक्षलवादाचे स्वरूप आणि प्रश्न दोन्ही बदलले आता.. गेल्या ४० वर्षात  बराच बदल झालाय..समर्थन म्हणून नव्हे, पण पूर्वी आदिवासींवर होणा-या अत्याचारातून ते नक्षलवादाकडे वळत होते!!आता नक्षलवाद्यांना पैसा दिसायला लागलाय

*सुचिकांतजी:*
त्यांना मिळणारी हत्यारे, देशाचे शत्रू पुरवतात हे पण वाचनात आलं होतं ..

*राखी चव्हाण:*
ज्या आदिवासींच्या प्रश्नासाठी ते बांबू, तेंदू ठेकेदारांसोबत लंढायचे, अाज त्याच ठेकेदार कडून पैसा मिळत  असल्याने आदिवासींच्या हत्या करताहेत.. गडचिरोली सीमेवरून हा सगळा पुरवठा होतो..उच्च तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी ते परिपूर्ण आहेत!!भामरागडच्या लाल पहाडामागे त्यांचे प्रशिक्षण होते

◾ *सुचिकांतजी:*
पुढचा प्रश्न घेऊ .. स्वसंरक्षणासाठी आणीबाणीच्या प्रसंगात काय साधने वापरता ? काय काळजी घेता? - वृषाली गोखले

*राखी चव्हाण:*
जंगलात फिरताना का?

◾ *सुचिकांतजी:*
शिवाय तिकडच्या जंगलामध्ये, नक्षली लोकांचा धोका किती असतो तुम्हाला ?

*राखी चव्हाण:*
नक्षलींचा धोका गडचिरोली जिल्हात जास्त.तिथे फारसं फिरणं नाही

◾ *सुचिकांतजी:*
आणि वन्यजीवांपासून संरक्षण ?

*राखी चव्हाण:*
काही युक्त्या तळमळीने काम करणा-या वनाधिका-यांनी आणि कुंदन दादा तसेच  या क्षेत्रात  काम करणा-या मित्रांनी सांगितल्यात तेच फाॅलो करते..प्रत्येक वन्यप्राणीचा स्वभाव , वागणूक वेगळी असते.जसे अस्वलाला लवकर दिसत नाही, पण तोच  जर तुम्ही भडक  रंग घातला तर त्याला पटकन  दिसतं

◾ *सुचिकांतजी:*
जनसंवाद पदवीबद्दल मागे समूहात विचारणा झाली होती त्याबद्दल थोडक्यात सांगू शकाल का? - मृणाल पाटोळे

*राखी चव्हाण:*
हो, ते राहूनत गेलें, कामाच्या गडबडीत विसरले होते..जनसंवाद म्हणजे पत्रकारितेचे प्रमाणपत्र नव्हे, तर अनेक क्षेत्राची दारं त्यामुळे खुली होतात
जाहिरातीचे क्षेत्र, प्रत्येक विभागात अलिकडे जनसंवाद अधिकारी हवा असतो, ते क्षेत्र
अशा अनेक क्षेत्रात  शिरकाव करण्याचं ते माध्यम आहे

◾ *सुचिकांतजी:*
शेवटच्या प्रश्नाकडे वळूया ..

स्त्रीसामर्थ्याची पहिली माळ नागपुरी पत्रकार निवेदिता होती तर शेवटची दहावी सुद्धा नागपुरी पत्रकार राखी हिची आहे. या योगायोगाबद्दल प्रशासकांचे कौतुक.

राखी,
नागपुर लोकसत्ता म्हणजे लोक कमी न् काम प्रचंड ,असे असूनही तू समूहात बरीच सक्रिय असतेस.
समूहाबद्दल पत्रकार म्हणून काय वाटते ?? - डॉ. प्रज्ञा देशपांडे

*राखी चव्हाण:*
खुप काही शिकायला मिळतंय, पण एक खंतही की बरेचदा छान चर्चा सुरू असताना इच्छा असुनही चर्चेत सहभागी होता येत नाहीं
कधी कशी assignmentयेईल माहिती नसतं, वेळेत बातमी मिळवायची असते, द्यायची असते
शेवटीं इंग्रजीत एकच  सांगेल, feel proud to be a part of this group🙏🏻

*मेघा परब:*
श्रीम.राखी मॅडम यांच्या मुलाखतीत
लेखक मारूती चितमपल्ली यांच्या सोबती चा अनुभव आला. 👍🌹समूह प्रमुखांचे आभार. 👏👏👏👏...

*वृषाली ताई:*
"....ती वनमाला म्हणे ,नृपाळा{ समूहाला   }..हे तर माझे घर..."...हे गीत आठवले!

..आणि मला वैयक्तिक म्हणावेसे वाटत आहे की,...."....,भुलले तुजला ह्रदय साजणी...." .....अभ्यासू,निर्भीड पत्रकार!
जंगल ची माहितगार!
कणखर आत्मविश्वास बाळगणारी राखी ताई ,तुला माझा साष्टांग नमस्कार!

*विजया पाटील‬:*
👌🏻👌🏻सर्व मुलाखती वाचुन एक वेगळाच अनुभव घेता आला.अनेक बाबींचा खुलासा मिळुन निश्चितच ज्ञानसंवर्धन झाले...खुपच नाविन्यपुर्ण उपक्रम..👏🏻👏🏻💐💐

*अमोल शिंपी:*
राखी ताई,
माझे बंधू डॉ.बहार बाविस्कर व त्यांची पत्नी डॉ.प्रिया बाविस्कर हे सुद्धा वन्यजीव संरक्षणाचंच काम करतात नागपूरला. वाइल्ड सीईआर या संस्थेचे संस्थापक आहेत. याच नावानं फेसबुक पेजही आहे त्यांचं. चंद्रपूरला वाघांना रेडीओ कॉलर लावायचही काम करतात ते.
तो नेहमी म्हणतो मला वन्य प्राण्यांची कधीच भिती वाटत नाही. उलट मला मनुष्य प्राण्याचीच भीती वाटते. तुमची आजची मुलाखत मला त्याच्याशी झालेल्या संभाषणाप्रमाणेच वाटली. तुम्ही सर्व पॅशनेट आहात, तुमच्या कार्याबद्दल.
गौरवास्पद आहे.

*रेखा चवरे ताई:*
अशा सुंदर मुलाखतींसाठी वाटतय की नवरात्रीउत्सव अजून काही दिवस असावा !!!

*स्वप्नील पाटील:*
लवकर संपलं नवरात्र,बाहेर गरब्याची गाणी आणि इथे मुलाखती पण..

*वृषाली ताई:*
खरंच,खूप ज्ञानसंपन्न आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या सर्वांनी!

*अमृताताई:*
राखीताई आपली मुलाखत खुपच छान झाली.एक वेगळाच अनुभव देऊन

◾ *सुचिकांतजी:*

🙏🙏🙏#माळ_स्त्रीसामर्थ्याची*

आज आपण भेटलो, राखी चव्हाण यांना! २ तासांची मुलाखत गप्पांच्या ओघात ३ तासाची झाली याचे भान देखील राहिले नाही. त्यांनी देखील गेले ३ तास आपल्या मुलाखतीसाठी दिले त्याकरता त्यांचे मनापासून आभार. खूप काही शिकायला मिळालं आज.

◾ *राखी चव्हाण:*
आमच्यासारख्या पत्रकारंसाठी आपला समूह म्हणजे मराठीचे ज्ञानपीठ!!आपणा  सर्वांचे मनापासून आभार!!!

      *॥ज्ञानभाषा मराठी॥*
*॥माझी शाळा📚माझी भाषा॥*

No comments:

Post a Comment