ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Friday, October 21, 2016

माळ स्त्रीसामर्थ्याची - माळ सहावी

नमस्कार!!

 दशदिशांतरी सौंदर्याने बहरलेल्या या सृष्टी नित्यनियमित आनंद,उल्हास भरलेला असतो. सृष्टी हे रंग भरभरून लुटू देण्यात कुठेच कमतरता ठेवत नाही. दोन्ही हात मोकळे सोडून सदैव उल्हासाचेच रंग उधळत असते. बाह्यसौंदर्याबरोबर आंतरिक सौंदर्याची,मनभावन कल्पकतेची महती सांगणारे हे सृष्टीतील रंग बघून कोणी हरखून जाणार नाही असे होणारच नाही!!!

🌹आजचा रंग: पिवळा

स्वयंस्फूर्तीचे, उद्योगशीलतेचे, कल्पकतेचे, व्यापकतेचे,उल्हासाचे,आनंदाचे द्योतक असलेला हा पिवळा रंग!!ज्ञानदेवता सरस्वतीचे प्रतिक असलेला हा रंग आहे!!!


🌹 या रंगाचे वैशिष्ट्य घेऊन येणारी आजची सहावी माळ गुंफुया!!

⚡ सहावी माळ स्त्री-सामर्थ्याची⚡

⚡ श्रद्धा संजय सांगळे⚡

🌹 परिचय:

◾माहेर फलटण व सासर मुंबई

◾शिक्षण- रसायन शास्त्रात  बीएस्सी.

◾बालसंगोपन केंद्राचा पर्यवेक्षक कोर्स.
◾गाईड विभाग हिमालय वुड पूर्ण.
◾योग विशारद.
◾लोक नॄत्याचे शिक्षण.

🌹 नोकरी,व्यवसाय

◾शिक्षक म्हणून ११ वर्षाचा अनुभव (मॅक्सिन मावशींच्या शाळेमध्ये)

◾ मावशींची कर्मभूमी असलेली आपली शाळा (झोपडपट्टी भागात)काम करत असताना अनेक उपक्रम राबवावे लागले.मुलांना शाळेत पाठवणे,वयात येणाऱ्या मुलामुलींचे समुपदेशन इ.

◾जिल्हा स्तरावर गाईड विभागात सहा वर्षे काम बघितले.

◾ बहुभाषिकतेत संशोधन केले(टाटा ट्रस्टची फेलोशिप)

◾ नर्मदा बचाओ आंदोलनातील शिक्षक व धनगर वस्तीमध्ये काम करणारे शिक्षक यांच्या बरोबर काम करताना खुप वेगळे अनुभव आले.

◾ शैक्षणिक सल्लागार म्हणून काही शाळा बरोबर काम करत असताना मातॄभाषेतून शिक्षण व शिक्षित वातावरण याचे महत्व रुजविण्याचा प्रयत्न करत आहे.

◾ सवंगडी खेळघर संचालिका, पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम चालू आहे.

 ◾Emergent literacy in childhood work as resource person (अंकुरती साक्षरता)

◾ संस्कॄती देवाणघेवाण कॅम्प मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.

◾ गाईड विभागात ठाणे जिल्ह्यात शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम चालू आहे.

     ॥ज्ञानभाषा मराठी॥
॥माझी शाळा📚माझी भाषा॥

◾ सुचिकांतजी:
 सर्वांना नमस्कार,

 मी सुचिकांत,  || ज्ञानभाषा मराठी || समूहाच्या #माळ_स्त्रीसामर्थ्याची या उपक्रमांतर्गत आयोजित मुलाखतीत सौ. श्रद्धा सांगळे यांचे स्वागत करतो. 💐

मृणाल...मृण्मयी:
 ताई,🙏💐

श्रद्धा ताई:
 🙏🏻

◾ सुचिकांतजी:
 ताई, तुम्ही मूळ फलटणच्या आहात, मुलाखतीच्या सुरुवातीला आम्हाला, फलटणबद्दल काय सांगाल?

श्रद्धा ताई:
हो मी फलटणची .माझे नावरस नाव जीजाबाई म्हणून बहूतेक सईबाईंच्या माहेरात माझा जन्म झाला 😊 योगायोगच हं!!
फलटणला ऐतिहासिक व राजकीय महत्व आहे याचा अभिमान आहे

◾ सुचिकांतजी:
 👍 फलटणमधली प्रेक्षणीय स्थळे कोणती?

श्रद्धा ताई:
 राजवाडा ,सध्या वेगवेगळ्या मालिका व सिनेमात बघतो.

सुचिकांतजी:
 मस्त ..

श्रद्धा ताई:
 काही ऐतिहासिक खुणा आहेत.
 मलठणमधील बुरंज,बाणगंगा(सध्या गटार गंगा),सिता वणवासात असताना सितामाईच्या डोंगरावर रहात होती असे म्हणतात

◾ सुचिकांतजी:
 फलटणची कोणती आठवण तुमच्याबरोबर कायम असते?

श्रद्धा ताई:
 खुप आठवणी आहेत पण सर्वांत जवळची म्हणजे मावशींबरोबरचे क्षण!!

◾ सुचिकांतजी:
 मस्त ..मग सर्व प्रथम मावशीबद्दलच बोलू ....

श्रद्धा ताई:
नक्कीच

◾ सुचिकांतजी:
 मॅक्सिन मावशींबरोबर काम केल्याच्या अनुभवाबद्दल सांगा ... एखादी संस्मरणीय आठवण..

श्रद्धा ताई:
 माझी आई गेल्यानंतर मावशींनी मला जवळ घेतले ,मावशी म्हणाल्या तुमच्यात म्हणतात नं माय मरो मावशी जगो,तसे मी आहे नं तुझी मावशी

सुचिकांतजी:
 🙏👏👏

श्रद्धा ताई:
 आज देखील ते नाते आमच्या मध्ये आहे.

सुचिकांतजी:
 खूपच छान ..

मृणाल...मृण्मयी:
 मस्तच नं!!

श्रद्धा ताई:
 माझ्या प्रत्येक उपक्रमाचे मावशींना कौतुक, व मला तसा धाकही होता😊मी मुलांचे निरीक्षण कसे करते याचे मावशींनी अनेक वेळा कौतुक केले

सुचिकांतजी:
सहीच ..

श्रद्धा ताई:
 मुलांना पुस्तकासारखे वाचता यायला हवे असे माझे मत याबद्दल मावशी सगळ्यांना सांगायच्या त्यावेळी मुठभर मास चढायचे.म्हणूनच जाड झाले😀

निवेदिता ताई:
 👏🏻👏🏻पुस्तकासारखे वाचणे ...सुंदर!!

◾ सुचिकांतजी:
हा हा .. त्यांची कार्यपद्धती, मराठीतून शिक्षणासाठी चे त्यांचे प्रयत्न, त्यातील तुमचा सहभाग इ. याबद्दल थोडं सांगाल ? - अभि खांदेवाले

श्रद्धा ताई:
 मावशींनी,मुलांसाठी आपण वाचू या,प्रकट वाचन पध्दती तसेच वस्ती शाळांसाठी अनेक उपक्रम राबविले

सुचिकांतजी:
 अच्छा

श्रद्धा ताई:
 शिक्षक ज्या भागात किंवा परिसरात काम करतो तर त्याचा पेहराव व भाषा ही परिसराला अनुरूपच असायला हवी याबद्दल मावशींचा आग्रहच होता.

सुचिकांतजी:
 खूप छान मुद्दा ..

श्रद्धा ताई:
 मावशींनी मंगळवार पेठेत(दलित वस्तीत)शाळा सुरू केली.माझे जास्तीचा काम याच भागात झाले.पुरक वर्ग,बालवर्ग.मुलांना घरी जाऊन घेऊन यावे लागायचे.

◾ सुचिकांतजी:
 लोकांचा प्रतिसाद कसा असायचा? ..आजही हे चित्र काही भागात आहे ..

श्रद्धा ताई:
 पालकांचा खुप त्रास होता!शाळेच्या परिसरात घाण करणे,चोरी करणे चालूच असायचे.

◾ सुचिकांतजी:
 याच्याशी संबंधित 👇
- झोपडपट्टी  विभागात काम करीत असतांना कोणकोणते विशेष उपक्रम राबविलेत? आणि कसे अनुभव आलेत?🙏🏻  --- माधुरी देशपांडे

श्रद्धा ताई:
 मुल शाळेत येण्यासाठी, टिणविण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागले.एक गंमत सांगते. गैरहजर राहणाऱ्या मुलांच्या घराजवळ राहणारी मुले यांची मदत घेतली.गैरहजर मुलाला शाळेत घेऊन येणारी मुले त्यांना माझ्याकडून बक्षीस मिळायचे

मृणाल...मृण्मयी:
छान फ़ंडा!!

श्रद्धा ताई:
 नंतर रोज हजर असणारी मुले यांना बक्षिस!!

सुचिकांतजी:
 सहीच ..


◾ सुचिकांतजी:
 याशिवाय कोणते उपक्रम होते ?

श्रद्धा ताई:
 मी हजर आहे,हा उपक्रम मी राबविले पालकनीती मध्ये लेख लिहीला  होता.

◾ सुचिकांतजी:
 - फलटणची शाळा इतर शाळांपेक्षा कोणत्या बाबतीत वेगळी आहे असं तुम्हाला वाटतं ?

श्रद्धा ताई:
 समानता

◾ सुचिकांतजी:
 जसे की ...

श्रद्धा ताई:
 जातीपातीचे राजकारण नाही,गरीब श्रीमंत असा भेद नाही.माझी मुले याच शाळेत शिकली.म्हणजे मुलांमुळे मी या शाळेत आले.

◾ सुचिकांतजी:
 वा ..खूप छान!मॅक्सिन मावशी म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व पण कधी मावशींशी कोणत्या बाबतीत मतभेद झाले? त्यावेळी कसा मार्ग काढला?

श्रद्धा ताई:
 मावशीं बरोबर मतभेद असे नाही झाले,कारण आमच्या दोघींचे विचार व मते जुळत होती.

सुचिकांतजी:
 अच्छा

श्रद्धा ताई:
 शिकवविण्याच्या पध्दती बद्दल बोलणे व्हायचे. शिक्षकांनी मुलाप्रमाणे अनेक पध्दती वर्गात वापरून बघायला हव्यात.म्हणजे एकच पध्दत सगळ्यांना हे मला पटत नाही, याबद्दल मावशींचे अनेक प्रश्न असायचे.मला ते मावशींना उदा.सहीत समजावून सांगावे लागायचे

सुचिकांतजी:
 अच्छा ..

श्रद्धा ताई:
 आमची महत्वाची मिटींग मावशींच्या रिक्षा मध्ये 😀

सुचिकांतजी:
 हा हा ..

सुचिकांतजी:
 मला वेळ मिळाला तर रिक्षा बद्दल बोलूया ..

श्रद्धा ताई:
 मावशी चालक व मी मागे बसलेली

◾ सुचिकांतजी:
 - ताई तुम्हाला शिक्षक म्हणून तब्बल ११ वर्षांचा अनुभव आहे, शिक्षक होण्याअगोदर आणि शिक्षक झाल्यानंतर माणसाच्या आयुष्यात काय बदल घडतात? काय सांगाल यावर?

श्रद्धा ताई:
 मला शिक्षक व्हायचेच नव्हते.माझ्या मुलांमुळे मी या क्षेत्रात आले.मुलांना गरज काय याचे भान शिक्षक म्हणून आपल्याला असायलाच हवे.
मुलांच्या स्वभावातील  अथवा वागण्यातील छोटा बदल आपल्याला टिपता यायला हवा.

सुचिकांतजी:
 हो ..

श्रद्धा ताई:
 शिक्षकांवर मुलांचा विश्वास असतो त्यामुळे शिक्षकाची जबाबदारी वाढते
 मी मुलांबरोबर घडत गेले.त्यामुळे अजूनही मी विद्यार्थी आहे.मुलांबरोबर काम करताना,सगळ्या चिंता मुलांबरोबर पळून जातात.

सुचिकांतजी:
 👍👍👍

◾ मृणाल...मृण्मयी:
या निमित्ताने सवंगडी बद्दल थोडं!!

श्रद्धा ताई:
 सवंगडी माझे स्वप्न आहे.

श्रद्धा ताई:
 तुम्ही बघायला या.

मृणाल...मृण्मयी:
 नक्कीच...खेळायलाही!!

सुचिकांतजी:
 नक्कीच ..

श्रद्धा ताई:
 मुलांना आनंदी बालपण अनुभवता यावे असाच विचार सुरवातीला होता.मुंबई च्या धावपळीच्या व स्पर्धेच्या वातावरणात मुलांची मुल म्हणून गरज काय आहे याचा विचारच केला जात नाही

माधुरी ताई:
 अगदी खरयं👍🏻

◾ अमोल शिंपी: याबद्दल जरा विस्तृत सांगाल कां? अर्थबोध होत नाहीये म्हणून म्हटलं.

सुचिकांतजी:
सवंगडी खेळघर संचालिका, पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम चालू आहे.
त्यांची ओळख करून देणाऱ्या पोस्ट मध्ये माहिती आहे ...

श्रद्धा ताई:
 सवंगडी मुलांना आपलेसे वाटते,सुट्टीच्या दिवशी देखिल सवंगडीचे बंद गेट बघायला मुले येतात.

सुचिकांतजी:
 👏👏हेच यश!!

श्रद्धा ताई:
 मला शिक्षण पध्दती बद्दल जास्त काही बोलायचे नाही.परंतु मुलांचा विचार करणारा अभ्यासक्रम अजूनही राबविण्यात येत नाही याची खंत आहे!!सवंगडी मध्ये ती उणिव भरून काढण्याचा प्रयत्न करते

◾ सुचिकांतजी:
 तुमच्या प्रोफाईल मध्ये गाईड म्हणून उल्लेख आहे,- गाईड विभाग हा करियर म्हणून फार कमी लोकांना माहित आहे..तुम्ही त्याबद्दल काय सांगू शकता

श्रद्धा ताई:
 मी शालेय काळात गाईड मध्ये होते.मी शिक्षण मंत्री झाले तर स्काऊट गाईडचे शिक्षण बंधनकारक करेन.

सुचिकांतजी:
 त्याचे मुख्य काय फायदे वाटतात तुम्हाला ?

श्रद्धा ताई:
 अनुभव संपन्न शिक्षण हेच खरे शिक्षण

सुचिकांतजी:
 खरंय ..

श्रद्धा ताई:
 आपल्याला जगण्यासाठी काय लागते,-अन्न,वस्त्र,निवारा या सगळया गरजा कशा भागवणार याचे अनुभव देणारे शिक्षण
मुलांना येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ देते हे शिक्षण!!

◾ सुचिकांतजी:
 छान .. बालसंगोपनातील महत्त्वाची आव्हाने कोणती आहेत?
एखादा संस्मरणीय अनुभव सांगाना...

श्रद्धा ताई:
 आपल्या मुलांच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे व त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहणे हे घडत नाही.पालक नको त्या स्पर्धांमागे धावतात व मुलांची तसेच कुटूंबाची फरफट करतात

सुचिकांतजी:
 हो .. खरंय ...

श्रद्धा ताई:
 प्रत्येक मुल वेगळे आहे,त्या प्रमाणे त्यांच्या गरजा वेगळ्या याकडे लक्ष दिले जात नाही .मुलांच्या शारीरिक व मानसिक गरजा याकडे वेळीच लक्ष नाही दिले तर घराचे स्वास्थ बिघडायला वेळ लागणार नाही

◾ सुचिकांतजी:
 एखादा अनुभव सांगाल ? बालसंगोपनातला .. जिथे तुम्ही counseling करून पालकांना मदत केली ..

श्रद्धा ताई:
 मला फलटणचे उदाहरण द्यायला आवडेल.माझ्याकडे गाईडचे युनिट होते.आम्हाला national camp कलकत्याला जायचे होते. पालकांचा आग्रह व मुलांची तयारी यामध्ये अनेक त्रासदायक अनुभव आले.ज्या मुली पुण्याच्या पुढे कधी गेल्या नाहीत अशा मुलींना मी निवडले होते.
शाळेत पहिला नंबर येईल अशी बुध्दीमत्ता पण व्यवहारात शुन्य अनुभव!!

◾ सुचिकांतजी:
How to cut chapati in 2 pieces? असे अनुभव का ?

श्रद्धा ताई:
 हो!!या कॅंम्प मध्ये आलेल्या अनुभवातून मुलींमध्ये झालेले बदल पालकांना जाणवले.पोपटपंची व प्रत्यक्ष अनुभव सगळेच वेगळे पालकांनी या मुलींना तया परीघाच्या पलिकडे कधी जाऊ दिले नाही.मला हे पटत नाही

◾ सुचिकांतजी:
 ताई सतत आमिष दाखवून मुलांकडून त्यांचे पालक काम करून घेतात /अभ्यास करून घेतात , यावर काय सांगाल ?
तुम्ही कशा प्रकारे हाताळाल अशी परिस्थिती ?

श्रद्धा ताई:
 मुलांना आपण त्या कामाचे महत्व समजावून सांगायला हवे. मी माझ्या घरी तक्ता तयार केला होता,माझी दोन्ही मुले स्वतःच्या कामाची नोंद त्यावर करायचे.म्हणजे स्वतःच मुल्यमापन करणे😀
माझे काम सोप्पे! आपल्याला घाई असते,मुलांना आनंद घ्यायच असतो.मुलांना वेळ देऊ या,चुकांची जबाबदारी दखिल मुले स्वतः घेतात.वर्गात एकापेक्षा जास्त भाषा बोलणारी मुले असतील तर सगळ्यांचा विचार केला जात नाही.

माधुरी ताई:
 स्वयं मूल्यमापनाची सवय उत्तमच👌🏻👌🏻🌺

श्रद्धा ताई:
मातृभाषा बोलण्याचे स्वातंत्र मुलांना नाही व नविन भाषा जबरदस्तीने लादली जाते त्यावेळी मुलांची शिकण्याची इच्छाच कमी होते.

सुचिकांतजी:
 खरंय .. इंग्रजी माध्यमात तर हे सर्रास घडतं ..

माधुरी ताई:
 खरय

◾ सुचिकांतजी:
 ताई तुम्ही बहुभाषिकतेत संशोधन(टाटा ट्रस्टची फेलोशिप) केले आहे.
यावर माधुरी देशपांडे यांनी खालील प्रश्न विचारला आहे ----
श्रद्धाताई बहुभाषिकतेत संशोधन म्हणजे नेमके काय?

श्रद्धा ताई:
 प्रगत शिक्षण संस्थेच्या साईट वर सविस्तर  प्रबंध आहे.

वृषाली ताई:
 होय..तो प्रबंध खुपच सविस्तर आहे...👌🏽🙏🏾

श्रद्धा ताई:
 सर्व लिहणे शक्य नाही म्हणून 😀

वृषाली ताई:
 ती साईट उघडल्यावर सर्व वाचावेच अशी ईच्छा प्रबळ होते.

सुचिकांतजी:
 बालवाडीतील बहुभाषिकता हाच प्रबंध ना ?बालवाडीतील बहुभाषिकता: सामाजिक दरीवरील भाषेचा पूल
By: श्रद्धा सांगळे, प्रगत शिक्षण संस्था.मला वाटतं यातून बरेच मार्गदर्शन मिळेल.

सुचिकांतजी:
 पुढचा प्रश्न घेऊ
 वैभव तुपे सर विचारा ...

◾ वैभव तुपे:
 मी स्वतः एका भटक्या विमुक्त जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या आश्रमशाळेत काम करतो. 'मातृभाषेतून' शिक्षणाची आवश्यकता यावर खूप चर्चा होतात, पण प्रत्यक्ष शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रम हा प्रमाण भाषेतून आहे. माझ्या मुलांना बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे यायला खूप वेळ लागतो. त्यामुळे एकतर हि मुलं बुजरी होतात किंवा मग प्रवाहाच्या बाहेर फेकली जातात. यासाठी काय उपाययोजना करता येईल?

◾ माधुरी ताई:
 पण मग शिक्षक म्हणून आपल्याला काय करता येईल?कारण माझ्याही शाळेत पारधी,उर्दू व मराठी  बोलणारी मुले आहेतच

सुचिकांतजी:
 वैभव तुपे सरांच्या प्रश्नात उत्तर मिळेल.

श्रद्धा ताई:
 सर,खुप मस्त अनुभव येतात.आपण मुलांच्या भाषेचा आदर करायचा.मुलांची भाषा आपल्यालाही यायला हवी.मुलांमध्ये व आपल्यामध्ये त्यामुळे घट्ट बंध तयार होतो.मुलांच्या बोलीतील शब्दांना पर्यायी शब्द कोणते याची खेळातून ओळख करून द्यायची.

सुचिकांतजी:
 पुढचा प्रश्न घेऊया ... वृषाली गोखले विचारा ..

◾ वृषाली ताई:
 नमस्कार,श्रद्धाताई..😊1}
"संस्कृती देवाण घेवाण कॅम्प"..कोण आयोजित करतं आणि त्यांत प्रतिनिधीत्व कसे मिळाले?
2}बहुभाषिकते मधे तुम्ही जे संशोधन केले आहे  त्यातील काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट कराल का?

सुचिकांतजी:
 मला वाटतं की दुसऱ्या प्रश्नाच उत्तर वर दिलेल्या pdf मध्ये सविस्तर मिळेल ..

वृषाली ताई:
 होय...पहिलाच प्रश्न घेतला तरी चालेल...म्हणजे ताईंशी बोलायला वेळ मिळेल😀😊

श्रद्धा ताई:
 गाईड विभागात जिल्हा व राज्य पातळीवर तुमचे काम कसे आहे हे बघीतले जाते.प्रत्येक कॅंम्प मध्ये माझ्या युनिटच्या व माझा सहभागाची पावती आहे
कलकत्ता,हरिव्दार,राजस्थान मध्ये मी वाद्यवॄ्दांसहत सहभागी झाले.

वृषाली ताई:
 केवढा अनुभव🙊केवढ्या फिरलांत!

श्रद्धा ताई:
 कमी तिथे आम्ही,म्हणजे जिल्हा असेल किंवा राज्य आपण सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे गेले तर आपल्याला संधी मिळणारच 😊देश फिरले,आता कंटाळले.

वृषाली ताई:
 कंटाळलात तर कसे चालेल...आमचा गाईड कोण मग😀?

सुचिकांतजी:
 निवेदिता ताई विचारा.

◾ निवेदिता ताई:
 नर्मदा आंदोलनाच्या शिक्षकांसाठीचं काम नर्मदा किनारी जाऊन केलं का? तिथल्या  आदिवासी मुलांशी निगडीत तुमचे काही अनुभव सांगा please

श्रद्धा ताई:
 शिक्षक ट्रेनिंग घेण्यासाठी फलटणला आले होते.सहा महीने फलटण मुक्कामी!! शिक्षकांची जिद्द व कष्ट याचे आश्चर्य वाटायचे. समाजाचा विरोध होत असताना काम करने खुप अवघड. काही शिक्षकांना राजकीय व्यक्तींनी कोंडून ठेवले होते

सुचिकांतजी:
 बापरे

निवेदिता ताई:
🙄 कोंडून?

श्रद्धा ताई:
 वेगवेगळे शिक्षक शाळेत मार्गदर्शन घ्यायला व भेट देत.अजूनही येतात.चांगल्या कामाला कसा विरोध होईल काही सांगता येत नाही.

◾ सुचिकांतजी:
 ताई तुम्ही योगविशारद पण आहात ... त्यावरून काही प्रश्न आले आहेत ..
 नमस्कार श्रद्धाजी, तुमचा परिचय वाचत होतो तेव्हा  त्यात तुम्ही योग विशारद आहात असे समजले. माझा प्रश्न त्याच  अनुषंगाने आहे. असं म्हणतात  कि  अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. हा नियम योग साधनेला लागू होतो का? म्हणजे अति प्रमाणात योग केला तर आपल्या शरीराला ते नुकसानकारक असते का? आणि जर नुकसानकारक असेल तर या बद्दल सविस्तर माहिती देऊ शकाल का? आणि नुकसान फक्त शारीरिक होते कि  मानसिक हि?? - अभिजित शिंदे

श्रद्धा ताई:
 अती तेथे माती खरच आहे.कोणतीही गोष्ट प्रमाणे बाहेर झाली तर त्रास होणार. योग्यप्रमाणात व नियमीत करणे योग्य

◾ सुचिकांतजी:
 ताई आजचा शेवटचा प्रश्न विचारतो ... योग करून कॅलरी बर्न होतात का? मेद कमी करणे शक्य आहे का? अशा जाहिरातींवर विश्वास ठेवावा का?

श्रद्धा ताई:
 हो नक्कीच शक्य आहे पण खाण्यावर नियंत्रण असायला हवे

सुचिकांतजी:
 हो ? प्रयत्न करायला हरकत नाही मग ..

श्रद्धा ताई:
 मी प्रयत्न करते पण थायरॉईड साथ देत नाही😀

सुचिकांतजी:
 😄

श्रद्धा ताई:
 नियमीत व्यायाम व योगा आहे म्हणूनच शारीरिक व मानसिक दॄष्टीने ठणठणीत 😀

◾ सुचिकांतजी:
 उन्नत तुम्ही प्रश्न नाही विचारले काहीच ?

उन्नत:
आईची उत्तरे वाचण्यात मग्न होतो.😀

वृषाली ताई:
 उन्नत"....तुझ्यासाठी! "फलटण" चे कमला निमकर भवन !
श्रद्धेचे बळ आणि मावशींचे योगदान!
"सईबाईंनी" दिधले महत्व या ' 'पुरी' स
"कमला"व"मावशी ठरल्या आदर्श सर्वांस!
आजची "ललिता पंचमी" जाहली सरस!!
'श्रद्धा ताई'तुम्ही अहातच आमुच्या "खास"!!

या देवी भूतेषु श्रद्धा रुपेण संस्थिता
नमस्तस्यै,नमस्तस्यै,नमस्तस्यै नमो नमः

वैशाली ताई:
थक्क करणारी व्यक्तीमत्त्वे आपल्या समूहात आहेत
मुलाखतींमधून त्यांच्या कार्याची अोळख होत आहे सविनय प्रणाम॥

◾ सुचिकांतजी:

#माळ_स्त्रीसामर्थ्याची

आजच्या मुलाखतीत आपण सौ.श्रद्धा सांगळे यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून त्यांनी समुहासाठी वेळ काढला त्याकरता श्रद्धा ताईंचे समूहातर्फे खूप खूप आभार.

श्रद्धा ताई:
 मीच आभार मानायला हवेत.माझी मुलाखत घेतली याबद्दल 🙏🏻😊🙏🙏🙏
 

 ॥ज्ञानभाषा मराठी॥
माझी शाळा📚माझी भाषा॥

No comments:

Post a Comment