ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Sunday, July 30, 2017

आवाहन..

येत्या १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र होऊन ७० वर्षे होतील. इंग्रजांपासून आपल्याला मुक्ती मिळाली पण अजूनही आपल्यावरून इंग्रजीचा पगडा काही कमी होत नाही...आणि म्हणूनच इंग्रजी शाळांचे अंधानुकरण केले जात आहे. समाजाची हीच मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने ज्ञानभाषा मराठी आणि मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत गट काम करत आहेत.

'ज्ञानभाषा मराठी' आणि 'मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत' गट इंग्रजी भाषेच्या विरुद्ध नाही, केवळ अंधानुकरणाच्या विरुद्ध आहे मातृभाषेतून शिक्षणाच्या आणि मराठी भाषा सक्षमीकरणाच्या बाजूने आहे
आता इंग्रजीला भूलणाऱ्या मानसिकतेविरुद्ध अटीतटीची लढाई सुरु झाली आहे..यात आपला सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे! आपणच आपल्या मातृभाषेला म्हणजेच मायमराठीला अधिकाधिक सक्षम करायचं आहे!!!

ज्ञानभाषा मराठी whatsapp गट - ५५ गट - ३००० ते ४००० सदस्य (गडचिरोली ते कोकण)
ज्ञानभाषा मराठी फेसबुक पान - ९००० अनुसरणकर्ते
ज्ञानभाषा मराठी ट्वीटर हँडल - ३००० अनुसरणकर्ते
मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत, फेसबुक गट - ४०००० सदस्य.

यांच्यामार्फत आपण अनेकांपर्यंत आपले मुद्दे पोहोचवत आहोत. आपल्याला महाराष्ट्रातील एकूण एक व्यक्तीपर्यंत पोहोचायचे आहे..मग ज्ञानभाषा मराठी whatsapp गटात सामील होताय ना?
गटाची नियमावली वाचा, आणि नियमावली मान्य असल्यास गुगल फॉर्म भरा :


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

Monday, July 24, 2017

२३ जुलै,२०१७

ऑनलाईन वाचनकट्टा
दिनांक:-२३जुलै,२०१७

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचा ऑनलाईन वाचनकट्टा!!!

आपण ऐका आणि इतरांना हि ऐकवा!!वाचकांचे भरभरून कौतुक करा आणि तुम्ही ही सामील व्हा!!!

⏺ भोलानाथ कट्टा(लहान गट)⏺
https://goo.gl/abnUH5 भोलानाथ कट्टा, लेख-अहिराणी कथा-वाचक-ऋतुजा येलगट्टे

⏺ सावरकर-अत्रे कट्टा (मोठा गट)⏺
https://goo.gl/zf6o1U सावरकर अत्रे कट्टा, कवी व वाचक:डॉ अमेय गोखले, कविता:संकेत या जगाचे
https://goo.gl/YAcuxu सावरकर अत्रे कट्टा, लेख:हि तर केवळ झलक(लोकसत्ता जुलै२०१७), लेखक:योगेंद्र यादव, वाचक:निवेदिता खांडेकर
https://goo.gl/hLWeWX सावरकर-अत्रे कट्टा, विचार जागृती-लेख-सामाजिक दृष्टीकोन, वाचक-गोपाल पंजाबी
https://goo.gl/xMZ2WX सावरकर-अत्रे कट्टा, बालभारती संस्कार कथा-बंडलबाज ज्योतिषी, वाचक-रोहिणी बागुल
https://goo.gl/LsVbqz सावरकर-अत्रे कट्टा, शिक्षण संक्रमण-लेख-वाचन एक जीवनप्रवास, वाचक-मिताली तांबे
https://goo.gl/J6VBHX सावरकर-अत्रेकट्टा,दत्त बोधावली, वाचक-सुदर्शन कपाटे महाराज
https://goo.gl/XEQ989 सावरकर-अत्रेकट्टा, अहिराणी उतारा, वाचक-वैभव तुपे
https://goo.gl/Yh6bz2 सावरकर-अत्रेकट्टा, लेख-भारतीय शिल्पशास्त्र, वाचक-वृषाली गोखले
https://goo.gl/b9rvnw सावरकर-अत्रेकट्टा,कविता वाचन-शब्दफुलें, गायन-श्री.शंकर पाटील
https://goo.gl/WSqPm6 सावरकर-अत्रेकट्टा, लेख-D for digital.. ऑफ पिरियड, वाचक-अरविंद शिंगाडे

⏺ चावडी वाचन (शालेय विद्यार्थी व शालेय शिक्षक)⏺

https://goo.gl/ccQHuU चावडी वाचन, वाचक आणि कवी: प्रथमेश चव्हाण, कविता:माझी शाळा, ६ वी, रा. वि. नेरुरकर शाळा
https://goo.gl/u7dsVa चावडी कट्टा,गोष्ट-कष्टाला पंख फुटले, वाचक-किरण मोकळे,औरंगाबाद
https://goo.gl/6phzaW चावडी कट्टा,उतारा-स्वावलंबन,वाचक-रेणुका रिठे,औरंगाबाद
https://goo.gl/vxsev6 चावडी कट्टा,भाषण-मातृभाषेतून शिक्षण असायला हवे का?, सहभाग-अनुष्का आपटे
https://goo.gl/t3FL2T चावडी कट्टा,गोष्ट-देवाचा राक्षस,वाचक-साक्षी पगडे, औरंगाबाद
https://goo.gl/2NESwg चावडी कट्टा,लेख-एक आला पाहिजे दरवेश, वाचक-स्वाती गवई,औरंगाबाद
https://goo.gl/YqLrhC चावडी कट्टा, कथा-अंधार दूर झाला, वाचक-निकिता पठाडे,औरंगाबाद
https://goo.gl/Y4Giox चावडी कट्टा,कथा-अरे हा कसला धर्म, वाचक-ऋतुजा जाधव,औरंगाबाद
https://goo.gl/z3yHpV चावडी कट्टा,उतारा-आम्हाला ही हवाय मोबाईल,वाचक-सायना सय्यद

चांदोबा कट्टा (१९६० पासून चे चांदोबा वाचन)⏺
https://goo.gl/h8hgw6 १९६०चांदोबा कट्टा, भाग २रा,कथा-महाभारत, वाचक-दीप्ती पुजारी
https://goo.gl/ioVyQo चांदोबा वाचनकट्टा १९६०, ३रा महिना,कथा-महाभारत, वाचक-दीप्ती पुजारी
https://goo.gl/Lbvsiu चांदोबा वाचनकट्टा, लेख:पाऊस, वाचक: मंगला बोपचे

सर्व वाचकांचे आभार!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

Sunday, July 23, 2017

#संकटसमयीमातृभाषाच

#संकटसमयीमातृभाषाच

 तुम्ही कुठेही असा ... आपली मातृभाषा-मराठी हृदयाला साद घालते, हेच खरं. त्याला वयाचं बंधन नाही.
मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवा! त्यांना शिक्षणाचा आनंद घेउद्या, दडपण नको असं आपण नेहमीच म्हणतो. पण मोठ्या माणसांनादेखील मराठीतून सूचना दिल्या तर त्यांच्यावरील ताण कमी होतो, हे खालील पोस्ट वाचून तुम्हाला समजेल.
_______

विमान प्रवासातील थरारावर मराठीचा उतारा

विमान क्रमांक ६ई८१ इंडिगो एअरलाईन्स मुंबई-मस्कत. काल मुंबईहून निघताना खूप पाऊस पडत होता, हवामान चांगलेच ढगाळ होते. विमान जवळपास ४५ मिनिटे उशीरा निघाले. उडाल्या नंतर २०-२५ मिनीटांनी विमान थरथरू लागले, नंतर हलू लागले. थोडे फार थरथरत असतेच पण बाहेरील वातावरणामुळे जरा जास्तच हलत होते.

प्रवासी थोडे फार चिंताग्रस्त झाले. काही पहिल्यांदा येणारे तर खूपच घाबरले. पण तेवढ्यात विमानाचे कॅप्टन सुभाष पाटील यांनी प्रवाश्यांच्या परीस्थीतीचा अंदाज घेऊन मराठीमधे सुचना द्यायला सुरूवात केली -विमान कीती उंचीवर आहे, कशामुळे थरथरते आहे हे सर्व मराठीत समजावले. विमान वेळेत आणि सुरक्षित पोहचवण्याची खात्री दिली. त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी भाषेत समजावले. पण त्या आधीच, मराठीत समजावल्याचा प्रभाव इतका छान झाला होता की क्षणात सर्वांच्या चेहऱ्यावरील चिंता दूर झाल्या.
विमानात जवळपास ६०% मराठी लोक आहेत हे त्यांना ( कॅप्टन पाटीलांना) माहीत होते, त्यामुळे त्यांनी मातृभाषेमधे संवाद साधल्याने तणाव कमी झाला. अटी-तटीच्या प्रसंगात मातृभाषा का व किती महत्त्वाची आहे ह्यामुळे चांगलेच अधोरेखीत झाले.

आंतरराष्ट्रीय विमानप्रवासात मराठीत सुचना ऐकून माझ्या अंगावर तर शहारे आले. नंतर त्यांना भेटून मला कॅप्टन पाटीलांचे आभार मानायचे होते, पण सुरक्षेच्या कारणास्तव केबीन मधे जाता आले नाही. इथूनच त्यांचे आभार.

कॅप्टन पाटीलांच्या उद्घोषणेची क्लीप इथे ऐका https://goo.gl/4xy2LJ

अभय कुलकर्णी, मस्कत
गट - कोल्हापूर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

Saturday, July 15, 2017

भूगोल चाचणी १ - हंगाम ५ वा - निकाल आणि उत्तरपत्रिका

निकाल पुढीलप्रमाणे :

*१. विवेक पुरेकर* - 7/16/2017  9:18:04 PM - बंगळूर - १४ गुण

*२.  हर्षल पुरव* - 7/16/2017  9:34:13 PM - मुंबई​ उपनगर - १३ गुण

*३. संदेश काटकर* - 7/16/2017  9:52:26 PM - सातारा - १३ गुण

उत्तरपत्रिका :

१) जिप्सम उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे?
अ) राजस्थान✔
ब) गुजरात 
क) महाराष्ट्र
ड) आंध्रप्रदेश 

२) प्रवाळ व मोतीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
अ)रामनाथपुरम
ब) मन्नारचे आखात✔
क) एर्नाकुलम
ड) नागपट्टणम

३) औष्णिक विद्युत केंद्र चोला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
अ) चंद्रपूर
ब) अकोला
क) ठाणे✔
ड) नागपूर

४) भारतीय महावाळवंटातील  महत्त्वाची नदी कोणती?
अ) सिंधू
ब) सतलज
क) लुनी✔
ड) गारो

५) आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोठे आहे?
अ) काठमांडू
ब) बिकानेर✔
क) कंदाहार
ड) बीजिंग

६) गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील उंच व दाट गवताळी पट्ट्यास काय म्हणतात?
अ) सुंदरबन
ब) खारफुटी
क) केवडबन
ड) केनब्रेकस✔

७) गंगा नदी म्हणजे ..
अ) अलकनंदा व भागीरथी यांच्या संगमानंतरचा प्रवाह✔
ब) यमुना व सरस्वती यांच्या संगमानंतरचा प्रवाह
क) कोसीची उपनदी
ड) यापैकी नाही

८)महाराष्ट्र व गुजरात यांना वेगळे करणारी नदी कोणती?
अ) तेरेखोल
ब) तानसा
क) दमणगंगा✔
ड) हिरण्यकेशी

९) खालीलपैकी कोणता क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे असे म्हणता येईल?
अ) आंबोली, फोंडा, कुंभार्ली, आंबा
ब) आंबोली , फोंडा,  आंबा , कुंभार्ली✔
क) आंबा, आंबोली, फोंडा, कुंभार्ली
ड) फोंडा, आंबा, कुंभार्ली, आंबोली

१०)खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दर हजारी पुरुषामागे महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
अ) रत्नागिरी✔
ब) सिंधुदुर्ग
क) मुंबई 
ड) गडचिरोली

११) महाराष्ट्राच्या कोणत्या भागात जांभा खडक आढळतो?
अ) नैऋत्य ✔
ब) दक्षिण
क) पूर्व 
ड) आग्नेय

१२) नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवितो?
अ) पूर्व
ब) पश्चिम
क) उत्तर✔
ड) दक्षिण

१३)खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नाही?
अ) कोराडी
ब) पारस
क) एकलहरे
ड) खोपोली✔

१४) हुंडरू हा धबधबा कोणत्या नदीवर आहे?
अ) पेरियार
ब) सुवर्णरेखा✔
क) तापी
ड) कावेरी

१५) पृथ्वी ४मिनिटात १°फिरते. जर ग्रीनिज या ठिकाणी सकाळचे दहा वाजले असतील तर ३०°पूर्व याठिकाणी किती वाजले असतील?
अ) सकाळचे दहा
ब) दुपारचे बारा✔
क) सकाळचे आठ
ड) रात्रीचे बारा

१६) महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत?
अ) ३५५✔
ब) ३६५
क) ३४५
ड) ३६०

१७) केरळच्या किनारी भागात कोणते खनिज सापडते?
अ) युरेनियम
ब) स्ट्रॉन्शिअम
क) थोरियम✔
ड) बेरियम

१८) दक्षिण किनाऱ्यावरील हे सर्वात मोठे खाजण सरोवर आहे?
अ) वेंबनाड✔
ब) चिल्का
क) सांभार
ड) लोणार

१९) खालीलपैकी कोणती खिंड सिक्कीम राज्यात आहे?
अ) झोजीला
ब) थांगला
क) नीतीला
ड) नथुला✔

२०) भारतातील सर्वात पूर्वेकडील ठिकाण व सर्वात पश्चिमेकडील ठिकाण यांच्या वेळेतील फरक किती आहे?
अ) १तास ५७ मिनिटे
ब) १तास ५६ मिनिटे✔
क) १ तास ५५ मिनिटे
ड) १ तास ५४ मिनिटे

Saturday, July 8, 2017

मराठी चाचणी १ - हंगाम ५ वा - उत्तर पत्रिका

१) सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असणारा समास खालीलपैकी कोणता ?
अ) तत्पुरुष
ब) अव्ययीभाव ✔
क) कर्मधारय
ड) बहुर्वीही

२) युवती या शब्दाचे अनेकवचन काय आहे?
अ) युवत्या
ब) व्युवत्या
क) युवती✔
ड) यापैकी नाही

३) बारा राशी यामधील विशेषणाचा प्रकार ओळखा
अ) क्रमवाचक
ब) संख्यावाचक✔
क) गुणवाचक
ड) क्रियाविशेषण

४) कथेकरी याचा अर्थ?
अ) कथा सांगणारा✔
ब) कथा ऐकणारा
क) दिग्दर्शक
ड) यापैकी नाही

५)स्वल्प चा शब्दविग्रह काय होईल?
अ) स्व + अल्प
ब) स + उ + अल्प
क) स्व: +अल्प
ड) सु + अल्प✔

६) पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा
अ) चिखलात माखलेला
ब) चिखलात पडलेला
क) चिखलात जन्मलेला✔
ड) चिखलात उभा असलेला

७) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा
अ) नीलिमा✔
ब) निलिमा
क) निलीमा
ड) नीलीमा

८) थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीतून खालीलपैकी कशाचे महत्त्व अधोरेखित होते?
अ) मेहनत
ब) बचत..✔
क) पाणी
ड) पैसे

९) खालीलपैकी कोणते क्रियापद नाही?
अ) पेरणे
ब) वेचणे
क) उफणणे
ड) उपरणे✔

१०) आडकाठी चा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
अ) अडथळा
ब) मोकळीक✔
क) सहजसोपे
ड) विरोध

११) तिन्ही बाजुंनी पाणी अथवा समुद्र असलेला भूप्रदेश म्हणजे?
अ)द्वीपकल्प✔
ब) बेट
क) खाडी
ड) खंड

१२) खालीलपैकी संयोगचिन्ह ओळखा
अ) ,
ब) :
क) - ✔
ड) _

१३) श्रीकृष्ण नवरा मी नवरी | शिशुपाल नवरा मी न वरी || यातील अलंकार ओळखा.
अ) अपन्हुती
ब) रूपक
क) अतिशयोक्ती
ड) श्लेष✔

१४) अकलेचा खंदक म्हणजे?
अ) अतिशय मूर्ख मनुष्य✔
ब) शहाणा मनुष्य
क) खोल खड्डा
ड) विचारपूर्वक खोदलेला खड्डा

१५) खालीलपैकी कोणता शब्द देशी आहे?
अ) मंजूर
ब) पगार
क) मास्तर
ड) लुगडे✔

१६) शब्दांच्या जाती किती?
अ) सहा
ब) आठ✔
क) दहा
ड) बारा

१७) खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
अ) नदी
ब) सरोवर
क) झरा✔
ड) कुंड

१८) ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे
अ) मासिक
ब) ष्णमासिक
क) पाक्षिक
ड) नियतकालिक✔

१९) बभ्रा करणे चा समानार्थी वाक्प्रचार ओळखा.
अ) खो घालणे
ब) आडकाठी करणे
क) डांगोरा पिटणे✔
ड) पाणउतारा करणे

२०) पोर या शब्दाचे लिंग ओळखा.
अ) स्त्रीलिंगी
ब) पुल्लिंगी
क)नपुसकलिंगी
ड) वरील सर्व✔

मराठी चाचणी १ - हंगाम ५ वा - निकाल

नमस्कार,

पूर्ण *महाराष्ट्रातून* घेतलेल्या *#मराठी* भाषेच्या ऑनलाईन चाचणीमध्ये १०० पेक्षा जास्त सदस्यांनी भाग घेतला. अजूनही अनेकजण प्रश्नपत्रिका सोडवत आहेत, परंतु निकालाकरता आपल्याला १० वाजेपर्यंतचे प्रतिसादच ग्राह्य धरलेले आहेत.

निकाल पुढीलप्रमाणे :

*१. वैशाली सरवणकर* - 7/9/2017  9:10:11 PM - मुंबई - २० गुण

*२. चंदा वाडकर* - 7/9/2017  9:14:33 PM - पुणे - २० गुण

*३. वैदेही कुलकर्णी* - 7/9/2017  9:34:39 PM - सातारा - २० गुण

*ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान* आणि *मराठी पिझ्झा* तर्फे सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा💐🎁

-----------------------------------------
*#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान*
*#मराठी पिझ्झा*
-----------------------------------------

Tuesday, July 4, 2017

पितामह!

भारतीय राजकारणाचे पितामह दादाभाई नवरोजी ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले, त्या ऐतिहासिक घटनेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव आहे. संसदीय मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवण्याबरोबरच भारतात सामाजिक व आर्थिक सुधारणाही झाल्या पाहिजेत यासाठी झटणाऱ्या पहिल्या पिढीच्या या बिनीच्या शिलेदाराच्या स्मृतींस वंदन!

ब्रिटनमधील फिन्सबरी (मध्य) या मतदारसंघातून 1892 मध्ये दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटमध्ये लिबरल पार्टीतर्फे निवडून गेले. या संसदेत निवडून जाणारे ते पहिलेच आशियाई नागरिक. फिन्सबरीला झालेल्या एका पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाल्याने त्यांना ब्रिटिश संसदेत केवळ तीन वर्षांचाच कालावधी मिळाला, पण या काळात त्यांनी आपली बुद्धिमत्ता व प्रखर भारतभक्ती यांची छाप पाडली.

ब्रिटिश संसदेत निवडून आल्यानंतर हातात बायबल घेऊन सदस्यत्वाची शपथ घेण्यास त्यांनी ठाम नकार दिल्याने खळबळ उडाली. `मी ख्रिश्चन  नाही, त्यामुळे मी बायबलची शपथ घेणार नाही,' असा त्यांचा निर्धार होता. अखेर ब्रिटिश संसद नमली व अवेस्थाची प्रत हाती घेऊन ईश्वराची शपथ घेण्याची परवानगी त्यांना मिळाली. ब्रिटिश संसदीय इतिहासात हा नवा पायंडा दादाभाई च पाडला.

संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात दादाभाईंनी ब्रिटिश सरकारच्या भारतातील भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. भारतीय एक तर ब्रिटनचे `नागरिक' आहेत किंवा `गुलाम' आहेत, असे ते स्पष्टपणे म्हणाले. भारतात निर्माण होणारी संपत्ती ब्रिटनमध्ये न जाता ती भारतातच राहून भारतीयांच्या विकासासाठी वापरली गेली पाहिजे, असे मत त्यांनी संसदेत मांडले. हे क्रांतिकारक विचार ऐकून ब्रिटिश विचारवंत व अर्थतज्ज्ञही चक्रावून गेले.

याच सिद्धांताचे अधिक स्पष्टिकरण करण्यासाठी त्यांनी Poverty and Un-British Rule in India हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व नंतर ब्रिटिश सरकार यांनी भारताची कशी लूट चालवली आहे, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. पुढे स्वदेशीच्या चळवळी सुरू झाल्या, त्याचे मूळ सूत्र या ग्रंथातच विशद केलेले आहे.

ब्रिटिश संसदेत दादाभाईंनी आयरिश होमरुल चळवळीवर भाष्य केलेच, शिवाय भारतीयांच्या परिस्थितीवरही प्रखर प्रकाशझोत टाकला. त्यामुळे अनेक ब्रिटिश संसदपटूंना सरकारच्या अंतस्थ कारवाया समजू लागल्या. ब्रिटिश संसदेत काम करताना दादाभाईंना महम्मद अली जिना मदत करत असत, हे विशेष. लोकमान्य टिळक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी या स्वातंत्र चळवळीतील नेत्यांवरही दादाभाईंचे विचार व कार्य यांचा प्रभाव होता.

नवरोजींचा जन्म मुंबईचा. पण या तरुण व तडफदार पारसी तरुणाला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्यात बोलावून घेतले व `दिवाण' केले. तिथेच त्यांनी `रास्त गुफ्तर' हा ग्रंथ गुजरातीत लिहून पारसी धर्मांच्या रुढींबाबतचे स्पष्टिकरण केले.

1855मध्ये ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये गणित व नैसर्गिक तत्त्वज्ञान या विषयांचे प्राध्यापक झाले. असे पद मिळवणारे ते पहिलेच भारतीय.

व्यापारासाठी ते लंडनला गेले खरे, पण तिथे ते लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक बनले. विशेष म्हणजे मराठीतील आद्य पत्रकार व प्रकाण्ड पंडित-समाजसेवक बाळशास्त्री जांभेकर यांनी दादाभाईना काही काळ अध्यापन केले होते, असे दादाभाइंर्नीच कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे.

त्यापूर्वी त्यांनी लंडनमध्ये स्वत:ची `दादाभाई नवरोजी अँड कंपनी' ही कापसाचा व्यापार करणारी कंपनी स्थापन केली होती. इंग्लंडमधले अशी कंपनी उभारणारे ते पहिले भारतीय उद्योजक ठरले.

`ईस्ट इंडिया असोसिएशन' या संस्थेची 1867मध्ये स्थापना करण्यात दादाभाईंचा मोठा हातभार होता. या संघटनेचेच रुपांतर पुढे 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात झाले. सर अलेक डग्लस ह्युम, सर सुरेंद्र नाथ बॅनर्जी प्रभृतींच्या साथीने भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेस काम करू लागली. दादाभाई काँग्रेसचे 1886मध्ये अध्यक्ष झाले. हे पद त्यांनी पुढे तीन वेळा भुषवले.

असे दादाभाई. वयाच्या 90व्या वर्षी 30 जून 1917 रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यांची अनेक स्मारके मुंबईत व बडोद्यात तर आहेतच, शिवाय पाकिस्तानमध्येही कराची शहरात त्यांच्या नावाचा रस्ता आहे व इंग्लंडमध्ये फिन्सबरीला ज्येष्ठ सरकारी वसाहती ज्या भागात आहेत, तिथल्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.

*लेखक - भारतकुमार राऊत*
*फेसबुक पोस्ट* - https://goo.gl/5dtQJ3
*टीप* - पोस्ट *दादाभाई नवरोजी* यांच्या फोटोसकट फिरवा

---------------------------------
*ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान*
*माझीशाळामाझीभाषा*
---------------------------------

*>>पुढच्या १० whatsapp गटात टाका>>*

Monday, July 3, 2017

नियमावली

ज्ञानभाषा मराठी :
➖➖➖➖➖➖➖

नियमावली

समुहात काय पोस्ट करू नये?

- सुप्रभात, शुभरात्री, शुभसंध्या, शुभदुपार, विनोद, सुविचार, संस्कारक्षम, आयुष्यावर भाष्य करणारे तत्वज्ञानपर संदेश  संदेश टाळा

- चतुर्थी, पौर्णिमेच्या शुभेच्छा टाळा.

- व्हिडीओ/छायाचित्रे टाकताना कॅप्शन द्या.

- फॉरवर्डेड संदेश टाळले तर उत्तम! संदेशाचा स्रोत अर्थात लेखक माहिती असेल तरच टाका, नाहीतर प्रशासकांना पाठवून परवानगी घ्या.

- धर्म, राजकारण, वाढदिवसाचे संदेश प्रकर्षाने टाळा. निवडक वेळी मान्यता देण्यात येईल एकदा प्रशासकांना विचारून मान्यता घ्या.

- सणाच्या दिवशी सूट दिली जाईल, त्यातही इतर धर्म/जात/समाजाचे लोक दुखावतील अशा पोस्ट्स टाळा.

- स्वतःची जाहिरात करणारे, नेतेमंडळींच्या वाढदिवसाचे, जयंती, पुण्यतिथीचे संदेश टाळा.

- चर्चा चालू असताना असंबद्ध पोस्ट्स टाळा.

- सर्वात महत्त्वाचा नियम - मराठीतूनच टंकन करा! रोमन लिपीतून मराठी लिहू नका.

समुहात काय पोस्ट करावे?

- ज्ञान, विज्ञानपर संदेश

- शैक्षणिक पोस्ट्स 

- ललित साहित्याशी संबंधित पोस्ट्स! त्यात छायाचित्रे, व्हिडीओ, लिखित स्वरूपातील पोस्ट्स चालतील पण कॅप्शन द्या तसेच पोस्टचा स्रोत द्या.

- चर्चा करू शकता : गॅजेट्स, छंद, तुम्ही घेत असलेले समाजोपयोगी उपक्रम, वाचलेले लेख, ऐतिहासिक संदर्भ, शैक्षणिक/रोजगाराच्या संधी इ. अगदी त्यादिवशी तुम्ही अनुभवलेला मजेदार किस्सा जरी बाकी लोकांसोबत शेअर केलात तरी हरकत नाही.

------------------------------------

- सर्वच प्रशासक तुमच्यासारखेच नोकरदार असल्याने, सतत सर्व पोस्ट्स पाहणे शक्य नाही. एखादी आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास कृपया कोणत्याही प्रशासकांना फोन करून कळवा.

- नियम न पाळणार्‍या सदस्याला अनेक वेळा सूचना देऊन देखील सुधारणा न झाल्यास, नाईलाजाने काही काळाकरता समुहातून काढून टाकण्यात येईल.

!!!Everything can not be documented!!! प्रत्येक मुद्दा लिखित स्वरूपात मांडणे अशक्य आहे!!!
त्या त्या दिवशी, जनभावना लक्षात घेऊन, दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनामार्फत कोणत्या पोस्ट्स चालतील किंवा चालणार नाहीत यावर निर्णय घेतले जातील.

समुहाचे ट्वीटर खाते - https://twitter.com/SarvatraMarathi
फेसबुक पान -
ज्ञानभाषा मराठी - https://www.facebook.com/sarvatramarathi/
जातधर्म मराठीच - https://www.facebook.com/jatdharmmarathich/

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान