ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Monday, May 30, 2016

कृ.ब.निकुंब - माहिती

कृष्ण बलवंत निकुंब
जन्म-९अॅागस्ट १९२०.
शिक्षण-एम.ए.मुंबई विद्यापीठ.
व्यवसाय- प्राध्यापकी.
नाशिक,धारवाड,बेळगाव ह्या ठिकाणी वास्तव्य.
काव्यरचनाकाल- १९३४ पासून पुढे.
काव्य - 'उज्ज्वला १९४५,
उर्मिला -१९५४
अनुबंध - १९६५
सायसाखर(बालगीते)- १९५४
मृगावर्त - खंडकाव्य १९७०.
अभ्र - १९७५
पंखपल्लवी - १९८९.

काव्यसमीक्षा -
१- पारख १९७३
२- फणसाचे पान (गोविंदाग्रजांच्या कवितांचे संपादन)१९७०.
३- काव्येतिहास:१९७५ ते १९२० या कालखंडातील काव्याचा इतिहास-१९७३.

Friday, May 20, 2016

# संस्कृत सुभाषितमाला---------डॉ.प्रज्ञा देशपांडे

८)  षट्कर्णो भिद्यते मन्त्र:,चतुष्कर्णो स्थिरो भवेत्।
     द्विकर्णस्य च मन्त्रस्य ब्रह्माप्यन्तं न गच्छति।।


अर्थ -सहा कानांना कळलेले गुपित फुटते (सार्वजनिक होते) चार कानांमध्ये स्थिर रहाते . दोन कानांमधले गुपित ब्रह्मदेवाला ही कळत नाही ।
___________________________________

९) सदाचारेण सर्वेषां शुद्धं भवति मानसम्।
     निर्मलं च विशुद्धं च मानसं देवमंदिरम्।।


अर्थ - सदाचाराने सर्वांचे मन शुद्ध होते , निर्मळ आणि विशुद्ध मन म्हणजे देवाचे देऊळ 
___________________________________

१०)  चन्दनं शीतलं लोके चन्दनादपि चन्द्रमा:।
      चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसंगति:।


अर्थ - या जगात चंदन शीतल आहे ,चंदनाहू न सुद्धा चंद्र शीतल आहे . चंद्र आणि चंदनाहूनही सज्जनांचा सहवास अधिक शीतल असतो ।
________________________________


११)  दधि मधुरं मधु मधुरम्
      द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव।
      तस्य तदेव हि मधुरं
      यस्य मनो यत्र संलग्नम्।।


अर्थ -दही गोड वाटते,मध गोड आहे ,द्राक्ष गोड वाटतात
अमृत सुद्धा गोडच आहे ; त्याच्या साठी ते गोड असते जिथे त्याचे मन जुळले असते 😊!
म्हणजे जे मनाला भावते ते सर्व छानच वाटते ॥

________________________________________-












# संस्कृत सुभाषितमाला -------डॉ.प्रज्ञा देशपांडे

५)  सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिन:
      तत्र सौरभनिर्माणे चतुश्चतुरानन:।।
अर्थ -सोन्याची कमळाची फुले निर्माण करायला शिल्पकार अनेक आहेत तेथे सुगंध निर्माण करण्याचे कौशल्य मात्र ब्रह्मदेवातच आहे . ( मनुष्यनिर्मित किती ही चांगलं असलं तरी निसर्गनिर्मित कुशलता अशक्यच आहे)
_______________________________________

६)  अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविन: 
     चत्वारि तस्य वर्धन्ते, आयुर्विद्या यशो बलम्।।
      पाली -
      अभिवादनशीलिस्स निच्च बुड्ढोपसेविनो
      चत्तारि धम्म वध्धन्ते आयु-विज्जा-यसो-बलम्।।
अर्थ - नेहमी नम्र असलेला व ज्येष्ठांची सेवा करणा-याच्या चार बाबी वाढत रहाता ,१) आयुष्य २) विद्या ३) यश ४) बळ .
______________________________________

७)  कल्पद्रुम: कल्पितमेव सूते
      सा कामधुक् कामितमेव दोग्धि ।
      चिन्तामणि: चिन्तितमेव दत्ते
      सतां तु संग: सकलं प्रसूते ।।

अर्थ - कल्पवृक्ष कल्पिलेलेच निर्माण करतो, ती कामधेनु कामना केलेलेच देते,चिंतामणी चिंतिलेलेच देते पण चांगल्या लोकांच्या सहवासाने आपोआपच सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. (न मागताच सगळे मिळते . )

# संस्कृत सुभाषितमाला ------डॉ. प्रज्ञा देशपांडे

1) नमस्कृत्य वदामि त्वां ,यदि पुण्यं मया कृतम्।
    अन्यस्याम् अपि जात्यां त्वमेव जननी भव ।।


  1. अर्थ - (शेवटच्या वेळी दुर्योधन गांधारीमातेला म्हणतो) तुला नमस्कार करून मी सांगतो ,की जर काही पुण्य मी केले असेल तर अन्य जन्मांमध्ये सुद्धा तूच माझी आई हो ! प्रत्येक मातृभक्त याहून वेगळे काय मागेल ?

__________________________________
2)  प्रथम वयसि पीतं तोयमल्पं स्मरन्त: 
     शिरसि निहित भारा नारिकेला नराणाम्।
      ददति जलमनल्पं स्वादुमाजिवितान्तं
      न हि कृतमुपकारो साधवो विस्मरन्ति।।।

अर्थ - मानवाने नारळाच्या झाडाला (रोपटे होते तेव्हा) जे थोडे पाणी दिले होते त्याची परतफेड ते नारळाचे झाड आयुष्यभर डोक्यावर ओझे बाळगत ,भरपूर,स्वादिष्ट पाणी देत करत असतो. खरोखर सज्जन लोकं केलेले उपकार कधी ही विसरत नाहीत _____________________________________.
३)  अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्
      अयोग्य पुरुष: नास्ति योजकस्तत्र दुर्लभ:।।

 अर्थ -मन्त्राच्या योग्यतेचे नाही असे एकही अक्षर नाही , ज्यात औषधितत्त्व नाही असे एकही मूळ नाही ; कोणतीही व्यक्ती अयोग्य नसतेच ,(त्याचा योग्य रितीने उपयोग करून घेणारा) योजक त्या ठिकाणी लाभणे दुरापास्तच आहे .
_______________________________________

 ४)  स जातो येन जातेन याति वंश: समुन्नतिम्
      परिवर्तिनि संसारे मृत: को वा ज्ञायते ।।१।।

अर्थ - तोच खरा जन्मला ज्याच्यामुळे वंशाची उन्नती झाली ,नाही तर या सतत बदलणा-या जगात कोण मेले तरी कळत नाही .
________________________________________


Sunday, May 15, 2016

⚗साधे प्रयोग🔬 - 💡बसल्या बसल्या वीज💡

🔵साहित्य – प्लॅस्टिकची खुर्ची, कृत्रीम धाग्याचे कापड, एक व्यक्ती.

🔵कृती – एका व्यक्तिला एका प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसवा. एक कृत्रिम धाग्याने बनवलेला – नायलॉन, टेरिलिन, पॉलिइस्टर यांपैकी – कापडाचा मोठा तुकडा घ्या. सदरा, साडी काहीही चालेल. त्या कापडाने खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला वारा घाला. कपडा व्यक्तिच्या जवळून नेताना विजेच्या ठिणग्या पडलेल्या दिसतील. हा प्रयोग अंधारात केल्यास ठिणग्या स्पष्ट दिसतील. कधी कधी ठिणग्यांचा झटका बसतो, सावधपणे प्रयोग करा.कृत्रिम धाग्याच्या कपड्याच्या हालचालीने स्थिरविद्युत निर्माण होते. तिच्या प्रभावाने प्लॅस्टिकमध्ये प्रवर्तीत वीज तयार होते. दोन्ही विरूद्ध भाराच्या वीजा निर्भारीत होताना ठिणग्या पडतात.

🔵मराठी विज्ञान परिषद🔵                                                            

        ||ज्ञानभाषा मराठी||                                                                                
||माझी शाळा 📚 माझी भाषा||

       ⏩पुढे पाठवा⏩

⚗साधे प्रयोग🔬 - 💡सूर्यावरचे डाग घरात पहा💡

🔵साहित्य-  आरसा, कागद, कात्री, पट्टी,पेन्सिल,कंपास                                                                                                                            

🔵कृती – एका ए4 आकाराच्या कागदावर मध्यभागी एक सेंटिमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ कात्रीच्या सहाय्याने कापून घ्या. तो कागद एका आरशावर चिकटवा. आरसा घराबाहेर उन्हात ठेवा. वर्तुळाकार भोकातून येणारा कवडसा भिंतीवर पडू द्या. आरसा भितीपासून दूर असेल तेवढा कवडसा मोठा पडेल. कवडसा वगळता बाकी येणारे उजेड कमीतकमी करा. कवडशामध्ये काही काळसर ठिपके दिसतील ते सूर्यावरचे डाग आहेत. कवडशात ढगही हालताना दिसतील. आरशावरून परावर्तित झालेला सूर्यप्रकाश कमी प्रखर होतो, तो भिंतीवर पडून परावर्तीत होताना त्याची प्रखरता आणखी कमी होते आणि बारकावे दिसायला लागतात.

🔵मराठी विज्ञान परिषद🔵

        ||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

⚗ *साधे प्रयोग* 🔬 - 💡 *संत्र्याची आतषबाजी*💡

🔵 *कृती* – संत्र्याची साल सोला. आतल्या फोडी खाऊ शकता. एक मेणबत्ती काड्यापेटीने पेटवा. तिची ज्योत स्थिर राहू द्या. संत्र्याच्या सालीचा एक तुकडा अंगठा आणि मधले बोट यांच्या पकडीत धरा. मेणबत्तीच्या ज्योतीजवळ नेऊन साल उभ्यात दाबा. सालीतून उडालेले शितोंडे प्रखर उजेड पाडत पेटतील.संत्र्याच्या सालात ज्वालाग्राही तेल असते. दाबल्यावर त्याचे तुषार उडतात. मेणबत्तीच्या ज्योतिमुळे पेटतात व संपून विझतात.


🔵 *मराठी विज्ञान परिषद*🔵                                                                    

        || *ज्ञानभाषा मराठी* ||
|| *माझी शाळा*📚 *माझी भाषा* ||

        ⏩ *पुढे पाठवा* ⏩⁠

⚗साधे प्रयोग🔬 - 💡 मऊ काजू करा टणक💡

🔵 साहित्य – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते, फ्रिज

🔵 कृती – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते वगैरे तेलबिया खायला मजा येत नाही. ते पूर्ववत कडक करण्यासाठी मऊ सुकामेवा एका बशीत पसरून ठेवा. ती बशी फ्रिजच्या आत ठेवा. काही तासांनी बशी बाहेर काढून पहा सुकामेवा पुन्हा टणक झालेला असेल.पाणी आत शिरल्याने सुकामेवा मऊ होतो. फ्रिजमध्ये हवा गार आणि कोरडी असते. कोरड्या हवेमुऴे सुक्यामेव्यातला दमटपणा बाहेर फेकला जातो.

🔵 मराठी विज्ञान परिषद🔵  

         || ज्ञानभाषा मराठी ॥
||  माझी शाळा📚माझी भाषा  ||

⚗ साधे प्रयोग🔬 - 💡आम्लतादर्शक पट्टी💡

🔵 साहित्य – साधा वहीचा कागद, सदाफुलीची फुले, कात्री, लिंबू, सोडा.

🔵 कृती – साधा – गुळगुळीत नसलेला – वहीचा कागद घ्या. कागदावर शाई फुटत असेल तर तो या प्रयोगासाठी उत्तम कागद. सदाफुलीच्या फुलाच्या पाकळ्या कागदावर चोळून कागद रंगीत करा. कागद ओलसर झाला तरी चालेल. कागद कडक होईपर्यंत वाळवा. यातला एक तुकडा घेऊन त्यावर लिंबाच्या रसाचा थेंब टाका. कोणता रंग येतो? अशाच दुसर्‍या तुकड्यावर ओलसर करून सोड्याची चिमूट टाका. कोणता रंग येतो पहा. दोन रंग वेगळे आले की आपली आम्लतादर्शक पट्टी तयार झाली. न झाल्यास आणखी पाकळ्या चोळून कागद वाळवा. कात्रीने कागदाच्या अर्धा सेंटिमीटर रुंदीच्या पट्ट्या करा.सदाफुलीच्या पाकळीतील रंगद्रव्य आम्लतेनुसार रंग बदलते.

🔵 मराठी विज्ञान परिषद🔵  

         || *ज्ञानभाषा मराठी* ॥
||  *माझी शाळा📚माझी भाषा*  ||

Tuesday, May 3, 2016

::: हरवत चाललेल्या म्हणी - ४ ::: फुकट बिसनी अन तंबाखू उसनी

बिसनी म्हणजे पदराला खार न लावता फुकट चैन करणारा फाकडा. प्रत्येक गोष्ट फुकटावारी खाणारा. फुकट्या माणूस तंबाखू सारखी मूल्यशून्य बाब देखील फुकट खातो. फुकट नाही मिळाली तर उसनी खाईल. तंबाखू साठीही खर्च करायला तयार नसलेला हा फुकट बहाद्दर, पानसुपारीसाठी कशाला पैसे खर्च करेल?

अनेक लोक स्वतः जवळ फक्त चुन्याची डबी ठेवतात. नखावर चुना घेऊन गावभर तंबाखू मागत फिरतात, यालाच म्हणतात, 'फुकट बिसनी अन तंबाखू उसनी'.

     ||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

        ⏩पुढे पाठवा⏩

लीळाचरित्र - २

आज ज्ञानभाषा मराठी समुहात, दिवसभर विविध मराठी पाककृतींवर चर्चा चालू होती. चर्चेच्या शेवटी, समुहातील सदस्य गोपालराज कपाटे बुवांनी लीळाचरित्रातील एक लीळा प्रस्तुत केली.
____________________________

लीळाचरीत्र हा महानुभाव संप्रदायाचा मुळ ग्रंथ त्यात आलेली ही छोटीशी लीळा प्रस्तुत विषयाला अनुरूप
सर्वज्ञांचे महाराष्ट्रातील परिभ्रमण चालु होते . सर्वज्ञांचा मुक्काम एका गावी झाला . सर्वज्ञांची शिष्या साध्वी साधाईसा यांना सर्वज्ञांना लाडू तयार करुन अर्पण करावयाची इच्छा उत्पन्न झाली मग सर्व साहित्य जमा करुन त्यांनी लाडु तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली . लाडू तयार करण्यासाठी शेव तळली आणि पाक तयार करण्यासाठी चुलीवर ठेवला आणि पाक तयारहोण्यासाठी थोडा वेळ लागणार होता तेवढ्या वेळात आपण भिक्षा( भिक्षा - हा महानुभाव संप्रदायातील साधकाने आचारावयाचा प्रमुख विधी आज समाजात बहुतेक ठिकाणी महानुभाव साधक ओली भिक्षा ( माधुकरी ) मागताना दिसतील परंतु अन्न मिळत नाही भिक मागणे वेगळे आणि ही भिक्षा आचार आहे म्हणुन महानुभाव साधक भिक्षा मागतात) मागुण येउ हा विचार करुन ही साधाईसा ( नावाप्रमाणे साधीभोळी ) भिक्षा करण्यासाठी निघाली पण भिक्षा विधी नियोजित कालावधी पेक्षा अधिक कालावधी लागला आणि इकडे पाक लागला पण तरीही या मातेने त्याचे लाडू तयार केले व नंतर ते लाडू घेऊन सर्वज्ञांच्या दर्शनासाठी आली सर्वज्ञांना तीने लाडू समर्पित केले पण लाडूंची अवस्था अशी झाली होती की लाडू मुसळनेही फुटेणात यावेळी सर्वज्ञ गमतीने त्या मातेस म्हणतात "बहुते सुगरणी देखील्या परी पाकु चुलीवरी ठेऊनी भिक्षेसी जाये ऐसी सुगरण कही देखीलीची नाही"तीला मात्र वाईट वाटले की मी सर्वज्ञांच्या ठिकाणी चांगला पदार्थ अर्पण करु शकली नाही सर्वज्ञ पुन्हा म्हणतात "बहुते सुगरणी देखील्या परी दहा वीस मुसळे मारुनी लाडू फोडीजे ऐसी सुगरण कही देखीलीची नाही" मग सर्वज्ञांच्या सन्निधानी असणाऱ्या बाईसानी त्या सर्व लाडूंची चुरी करुन ते उपयोगी लावले
- गोपालराज कपाटेबुवा

लीळाचरित्र - १

आज ज्ञानभाषा मराठी समूहातील Vrushali Gokhale यांनी, नवरसांवर चर्चा सुरु केली. दिवसभर सदस्यांनी आपापली मते मांडल्यावर शेवटी, गोपालराज कपाटे बुवांनी, लीळाचरित्रातील वीररसावर आधारित लीळा प्रस्तुत केली.
___________________________
नवरसांच्या चाललेल्या प्रस्तुत विषयानुरुप वीररसाच्या संदर्भातील लीळाचरित्रातील एक विशेष प्रसंग
सर्वज्ञांच्या परिभ्रमणात सर्वज्ञांचा मुक्काम एळापुर (सांप्रत नाव वेरुळ लेणी ) याठिकाणी चार महिने होता. सर्वज्ञांचे वास्तव्य गावातील चतुर्विधाच्या मठात होते. सर्वज्ञांचे प्रतिष्ठाण (सांप्रतचे पैठण) येथील भक्त सारंगपंडीत व त्यांचे कटकीचे (कटक- राजधानी, त्याकाळची देवगीरी) मित्र गोपाळपंडीत हे दोघेजण सर्वज्ञांच्या दर्शनासाठी ऐळापुर या ठिकाणी आले. सर्वज्ञांची व गोपाळपंडीताची ही प्रथम भेट, ते सर्वज्ञांच्या समोर मोठ्या ऐटीत बसले सर्वज्ञांनी त्यांना प्रश्न केला "आपणास कवणा ठाइ परीचयो" म्हणजेच तुम्ही कोणत्या कलेत प्रविण आहात. त्यांनी सांगितले की मी पारधी विद्येचे थोडेफार ज्ञान आहे. सर्वज्ञ विचारतात की "काइ शास्त्राधार की उबेणे" म्हणजे अभ्यास केला आहे की ऐकीव ज्ञान आहे. त्यांनी सांगितले की मला ऐकीव ज्ञान आहे. सर्वज्ञ त्यांना म्हणतात की सावजाचा यावा ( सावजाचा यावा -शिकारीसाठी गेल्यावर शिकारी सावज आकर्षित होण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात त्याचे ज्ञान ) धुरेचा लाठु ( धुरेचा लाठु - सोबत्यांच्या अंगी विरश्री संचरण्यासाठी एक प्रकारचे उत्साहवर्धक बोल त्याचे ज्ञान ) म्हणुन दाखवा . त्यांनी सावजाचा यावा व धुरेचा लाठु सर्वज्ञांच्या समोर सादर केला पंरतु त्यात कोणत्याही प्रकारचा रस उत्पन्न झाला नाही. यावर सर्वज्ञ म्हणतात "पारधी तो काइ इतुकाची ?" मग मात्र ते शांत बसुन राहतात . सर्वज्ञांनी मग पारधी विषयाचे निरुपण सुरु केले . सर्वज्ञ सांगतात पारध्यांच्या प्रमुख चार जाती आहेत . जाड, वाड, कोड, कवतिक अश्या प्रमुख जाती तर यापैकी जाड पारधी हे रानडुक्कर हत्ती आदी प्राण्यांची, वाड पारधी हे वाघाची कोड पारधी हे हरणा रोहीया चितळांची मेंदडाची तर कवतिक पारधी ससेयांची तीतरांची लावेयांची मासेयांची यानंतर सर्वज्ञांनी सावजाचा यावा बोलण्यास सुरवात केली , आणि सर्वज्ञांच्या आवाजाच्या दिशेने सावज आकर्षित होउ लागले. ते पाहुन सर्वज्ञांच्या सन्निधानी आसणार्या बाईसा मुख्य करुन सर्व भक्तजण मठाच्या आतमध्ये पळून गेले समोर प्रतिष्ठित दरबारातील राणेराउत बसलेले होते तेही आपली बैठक सोडून पळण्याच्या तयारीत आले त्या नंतर सर्वज्ञानी धुरेचा लाठु म्हणावयास प्रारंभ केला आणि त्या ठिकाणी विररस प्रभवला दरबारी राणेराउतांचे हात तलवारी वर गेले यात नवल काय पण बाईसादी स्रीयानीही काठी हातात घेतली एवढा आवेश सर्वांच्या ठिकाणी उत्पन्न झाला यावर खजील झालेले गोपाळपंडीत सर्वज्ञांना म्हणतात 'हे देवा आजपर्यंत आम्ही हे ऐकलेलेच नव्हते त्यामुळे सांगण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही तेंव्हा देवा हे तुम्हीच सांगावे आणि तुम्हीच ऐकावे'.

Monday, May 2, 2016

✍🏽 " थेट विश्वकोशातून " ✍🏽 - १

🏰"भारतीय संस्थाने"🏰

     बंगाल-बिहार-ओरिसाचे महसूल हक्क (दिवाणी) मोगल बादशाह दुसरा शाह आलम याजकडून १७६५ मध्ये रॉबर्ट क्लाइव्हने मिळविल्यानंतर ब्रिटिश ⇨ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात दृढमूल झाली. त्यानंतर कंपनीने राज्यविस्ताराचे धोरण आरंभले. त्यातून १८५८ पर्यंत जी एतद्देशीय राज्ये बचावली, त्यांना भारतीय संस्थाने असे म्हणतात. त्यांपैकी बऱ्याच संस्थानिकांचा दावा घराणे फार प्राचीन असल्याचा असला, तरी किमान आठशे वर्षे राजसत्ता असलेली त्रावणकोर-उदयपूरसारखी संस्थाने तुरळकच होती. बहुसंख्य राज्ये ही मोगल, मराठे, हैदर-टिपू किंवा शीख यांसारख्या प्रबल सत्तांची मांडलिक होती आणि बहुशः या प्रमुख सत्तांच्या ऱ्हासामुळेच त्यांचे बळ वाढले होते. अठराव्या शतकापर्यंत कंपनीचा राज्यविस्तार कोर्ट ऑफ डायरेक्टरच्या जवळजवळ नकळत झाला.

      एकोणिसाव्या शतकात तो त्यांच्या संमतीने आणि उत्तेजनाने झाला. हा राज्यविस्तार करण्यात वॉरन हेस्टिंग्ज, रिचर्ड वेलस्ली, मार्केज ऑफ हेस्टिंग्ज आणि जेम्स डलहौसी या गव्हर्नर्स जनरलचा मुख्य भाग होता. वॉरन हेस्टिंग्जने तहनाम्यांच्या द्वारे शेजारील राज्यांच्या सरहद्दी बळकट करून मराठे-हैदरविरुद्ध तट उभारला (रिंग फेन्स). वेलस्लीने देशी राज्यांना तैनाती फौजांचे संरक्षण देऊन कंपनीचे प्रभुत्व स्थापले; तर मार्केज ऑफ हेस्टिंग्जने तह करताना राज्यांच्या परराष्ट्रीय धोरणावर संपूर्ण नियंत्रण आणले. तह व करारनामे सुरुवातीला कंपनीने मित्रत्व आणि समानता या भूमिकेतून केले; पण एकोणिसाव्या शतकापासून त्या जागी ब्रिटिश सार्वभौमत्वाची भूमिका आली. त्याला कायद्याचा कोणताच आधार नव्हता. तहानाम्याच्या शब्दानुसार उदा., हैदराबाद, अयोध्या (औध) ही राज्ये त्यांच्या प्रदेशात संपूर्ण सार्वभौम होती.

        या उलट कंपनीने सार्वभौमत्वाच्या भूमिकेतून टोंकसारखे नवे संस्थान निर्माण केले. याच भूमिकेतून ज्यांच्याशी कंपनीचा कोणताही संबंध नव्हता, अशा राज्यांतूनही कंपनीने हस्तक्षेप केला. जवळपासचे अधिकारी आणि गव्हर्नर जनरलची मर्जी व राजकीय गरज यापलीकडे या हस्तक्षेपात कोणतेही तत्त्व नव्हते. पुढे पुढे करार करताना जुलमी कारभारविरुद्ध हस्तक्षेप करू, असे एक कलम मात्र प्रत्येक तहात येऊ लागले.

अधिक वाचा खालील दुव्यावर:
https://goo.gl/CKYUY2

       || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा 📚 माझी भाषा ||

Sunday, May 1, 2016

मराठी विश्वकोश - अंबाडी ( Deccan hemp) - १

अंबाडी ( Deccan hemp)
https://goo.gl/vLlRFs

माल्व्हेसी कुलातील ही वनस्पती मूळची आफ्रिकेतील असून तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस कॅनाबिनस आहे. भारत, बांगला देश, थायलंड,  पाकिस्तान इ. देशांत मोठ्या प्रमाणावर या वनस्पतीची लागवड करतात. भारतात आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार व महाराष्ट्र या राज्यांत अंबाडीची लागवड होते. महाराष्ट्रात सोलापूर, धुळे व जळगाव अशा कमी पावसाच्या जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात ती लावतात. तंतुमय धाग्यांसाठी ताग या वनस्पतीखालोखाल अंबाडीचा क्रमांक येतो.

अंबाडी साधारण ३-४ मी. उंच व सरळ वाढणारे काटेरी झुडूप आहे. खोडाच्या खालच्या भागातील पाने हृदयाकृती तर वरच्या भागातील पाने हस्ताकृती, खंडित आणि दातेरी असतात. फुले पिवळी व मध्यभागी जांभळी असतात. ती जानेवारी महिन्यात येतात. बिया मोठ्या व तपकिरी असतात.

अंबाडीच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात तर बोंडांची चटणी करतात. कोवळ्या फांद्या पानांसह जनावरांना वैरण म्हणून खाऊ घालतात. गूळ तयार करताना अंबाडीचा वापर केला जातो. बी कोंबड्यांच्या आणि गुरांच्या खुराकासाठी वापरतात. काही लोक पचनशक्ती सुधारण्यासाठी बी भाजून खातात. खोड व फांद्यांपासून धागा (वाख) काढतात. दोर, पिशव्या, मासेमारीसाठी लागणारे जाळे विणण्यासाठी वाखाचा उपयोग केला जातो. अंबाडीच्या बियांपासून खाद्यतेलही काढतात. त्यात मोठ्या प्रमाणात ओमेगा-३ हे प्रतिऑक्सिडीकारक असते. या तेलाचा उपयोग जैवइंधन म्हणूनही करतात. अनेक देशांत कागद बनविण्यासाठी या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे.

संकलन :-

     ||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

::: आपले शब्द, शब्दांचे अर्थ ::: <<< खुडूक >>>

गुराढोरांबरोबरच दुधाला म्हैस, राखणीला कुत्रा, आणि घरखर्चाला कोंबडीपालन हा आपल्या कृषिजीवनाचा खास विशेष आहे.खेड्यातल्या स्त्रियांची हक्काची बँक म्हणजे कोंबडी आणि तिची अंडी. आपल्या कोंबड्यांची संख्या कमी झाली, की एखादी खुडूक कोंबडी अंड्यावर बसवली जाते. 'खुडूक' म्हणजे ज्या कोंबडीची अंडी देण्याची क्षमता संपलेली असते अशी कोंबडी. आपली सर्व अंडी घातल्यानंतर 'रिक्त' झालेल्या म्हणजे अंडी न देणाऱ्या कोंबडीला खुडूक असे म्हणतात. अशी कोंबडी दिवसभर पोटाशी घेऊन अंड्यावर बसत असल्यामुळे, पाय पोटाशी घेऊन त्यांना हातांची मिठी मारून बसणाऱ्या निष्क्रिय माणसाला 'खुडूक' असे संबोधले जाते. कोंबडीचा 'मृदू आणि हळूवार स्वर' असाही या शब्दाला ध्वन्यार्थ लाभलेला आहे.

'खुडूक' या शब्दाला 'सर्व पाने नाहीशी झालेल्या झाडाचा बुंधा' असा एक अर्थ लाभला आहे. पण प्रामुख्याने पहिल्या अर्थानेच आजही हा शब्द वापरला जातो.

कानडी भाषेत 'कुडरु' असा एक शब्द असून त्याचा अर्थ बसणे असाच आहे. या 'कुडरु' पासून मराठीत खुडूक शब्द आला.

संकलन :-

     ||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||