ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Saturday, October 15, 2016

साप्ताहिक राज्यस्तरीय ऑनलाईन चावडी वाचन

⚡जबरदस्त उपक्रम⚡

📖साप्ताहिक राज्यस्तरीय ऑनलाईन चावडी वाचन📖

तुम्ही म्हणाल 'चावडी वाचन' मध्ये नवीन असं काय आहे?

थांबा, समजावून सांगतो, हा साधासुधा 'चावडी वाचन' उपक्रम असणार नाही तर, 'राज्यस्तरीय ऑनलाईन चावडी-वाचन' उपक्रम असणार आहे.

चावडी-वाचन केवळ तुमच्या एका शाळेपुरता मर्यादित उपक्रम न ठेवता, इतर अनेक शाळांना बरोबर घेऊन, आपण हा उपक्रम राबवू शकतो.

::: स्वरूप :::

तुम्ही (शिक्षक/पालक), तुमच्या विद्यार्थ्याकडून/पाल्याकडून, मराठी मजकूर/उतारा/पुस्तकाचा अंश/धडा दर आठवड्याला वाचून घ्यायचा, आणि आम्हाला Whatsapp च्या Voice Note मार्फत, त्याचे ध्वनिमुद्रण पाठवायचे. आम्ही अशी असंख्य ध्वनीमुद्रणे एकत्र करून अधिकाधिक शिक्षक आणि शाळांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. हा उपक्रम मुख्यत्त्वे मराठी शाळांकरता असला तरी आपण त्यात लवचीकता ठेवून, इतर माध्यमाच्या शाळांनादेखील यात समाविष्ट करत आहोत.

::: फायदे  :::

- लहान वयापासूनच वाचनाची गोडी लागायला मदत.

- मराठी बालसाहित्याचा प्रचार, प्रसार,

- मुलांच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी मदत,

- उत्तम वाचक, उद्याचे उत्तम लेखक होऊ शकतात,

- मराठीत उपलब्ध ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार

- विश्लेषणात्मक विचारसरणी घडायला मदत,

- लक्ष केंद्रित व्हायला/एकाग्रचित्त व्हायला मदत,

- मनोरंजन इ.

::: काय वाचावे ? :::
मराठी भाषेतील,धडे, कविता, गोष्टी, वर्तमानपत्र, मासिकातले लेख. वाचताना मूळ लेखक/प्रकाशकाचे ऋणनिर्देश करायला विसरू नका.

::: तुमची जबाबदारी :::

खाली दिलेल्या गुगलफॉर्मवर, योग्य पर्याय निवडून, तुमची/तुमच्या शाळेची नावनोंदणी करा, आणि दर आठवड्याला रविवारच्या अगोदर, विद्यार्थ्यांच्या आवाजातील ध्वनीमुद्रणे आमच्यापर्यंत पोहोचवा.

नोंदणी करा - https://goo.gl/hAoCGz

>>> संदेश किमान १० शाळांना पाठवा >>>

      || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

No comments:

Post a Comment