ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Thursday, October 13, 2016

डास पुराण

*नक्को नक्को केलंय या डासांनी* ..
*चला तर पाहुया डासपुराण!!!*

▪ फक्त मादी डास चावतात, रक्त पितात : नर डास चावत नाहीत, शाकाहारी असतात.

▪ जगात डासांच्या ३५०० पेक्षा जास्त जाती अस्तित्वात आहेत.

▪ पश्चिम व्हर्जिनियामध्ये डासांच्या सर्वात कमी जाती सापडतात.

▪ मॉस्क्यूटो हा 'लिटल फ्लाय' या अर्थाचा स्पॅनिश शब्द आहे.

▪ डासांना दात नसतात.

▪ डास आपल्या वजनाच्या तिप्पट रक्त पिऊ शकतात.

▪ मादी डास एकावेळी ३०० अंडी घालू शकते.

▪ डास आपल्या आयुष्यातले पहिले १० दिवस पाण्यात घालवतात.

▪ डास अतिथंड हवामानात निष्क्रिय असतात.

▪ डासाचे सरासरी आयुष्य २ महिन्यांचे असते.

▪ डासांना ६ पाय असतात.

▪ नर डास हे मादी डासांना त्यांच्या पंखांच्या आवाजावरून ओळखतात.

▪ डास खूप दूरपर्यंत, आणि खूप वेगाने उडू शकत नाहीत.

▪ डास साधारणपणे २५ फुटापर्यंत उडतात - हिमालयातील काही जाती अपवाद आहेत. त्या ८००० फुट उंचीवर सापडतात.

▪ डास श्वासोच्छ्वासावरून माणसांना ओळखतात.

▪ शरीरावर येणाऱ्या घामावरून आणि तापमानावरून डास आपले सावज ठरवतात.

▪ डास रात्रंदिवस रक्त शोषण्याच्या कार्यक्रमात दंग असतात.

▪ जुरासिक काळापासून डासांचे अस्तित्त्व आहे.

▪ डासांच्या दंशात असलेल्या लाळेमुळे पुरळ उठतात.

▪ डासाने दंश केल्यानंतर, लाळेवाटे मलेरियाचे जंतू शरीरात सोडले जातात. हे जंतू डासांच्या शरीरात परजीवी म्हणून वास करतात.

▪ वेस्ट नाईल विषाणूने, १९९९ मध्ये अमेरिकेत प्रवेश केला.

▪ डास एचआयव्हीचा प्रसार करत नाहीत.

▪ डास, 'o' रक्तगट असणाऱ्यांना सर्वाधिक आणि 'A' रक्तगट असणाऱ्यांच्यापेक्षा दुप्पट चावतात.

▪ डास आपलं रक्ततर पितातच पण रक्त पिऊन झाल्यावर आपल्या शरीरावर मुत्रविसर्जन देखील करतात.

▪ डास जगात सर्वात जास्त प्राणघातक प्राणी म्हणून ओळखले जातात - दरवर्षी सर्वात जास्त ७.२५ लाख लोकांचा मृत्यू, डास चावण्याने होतो.

▪ आईसलंड आणि फारो आईसलंड असे दोनच देश आहेत, जिथे डास अजिबात नाहीत.

▪ विशिष्ट प्रकारचे वटवाघूळ एका तासात १२०० डासांना गट्टम करू शकते.

▪ डासांमध्ये जनुकीय बदल घडवून, डासांना मलेरिया पसरवण्यापासून रोखण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.

▪ शास्त्रज्ञांच्यामते पर्यावरणाला कमीत कमी नुकसान पोहोचवून आपण जगातील सर्व डास कायमचे संपवू शकतो.

▪ लाखो वर्षांपूर्वी डासांचा आकार आत्ताच्या तीनपट मोठा होता.

▪ काही डास, माणसांना चावत नाहीत, तर फक्त उभयचरांना आणि पक्षांना चावतात.

संदर्भ :
- https://goo.gl/eGKcCe
- https://goo.gl/5A4xy

*टीप - आपल्या मातृभाषेला संपन्न बनवणे, हे अविरत चालणारे काम असून ते आपले आद्य कर्तव्यच आहे. अधिकाधिक अनुवाद करून आंतरजालावरील माहिती मराठीतून उपलब्ध करून ज्ञानात भर घालूया.*

*#चला_अनुवाद_करुया*

       *|| ज्ञानभाषा मराठी ||*
*|| माझी शाळा📚माझी भाषा||*

No comments:

Post a Comment