ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Tuesday, October 25, 2016

माळ_स्त्रीसामर्थ्याची - माळ आठवी

*नमस्कार!!*

रंगांची संगती लावतानाच रंग बहरत जातो. हा रंग स्वतःबरोबर रूप,गंध,आकार,वेळ,स्थळ सर्व घेऊनच बहरतो. हे रंग क्षणभराचे तर कधी आयुष्यभराचे सोबती बनून बहरत जातात आणि जगण्याची नवी जाणीव करून देतात!!

*🌹आजचा रंग: मोर हिरवा (मोरपिसी)*

मोरपिसी रंगाने सजलेले मोरपीस श्रीकृष्णाचे प्रतिक आहे.सौम्य निळा आणि हिरवा रंग मिळून तयार झालेला हा रंग दोन्ही वैशिष्ट्यासह येतो. सृजनशीलतेला शांत शीतलतेची कमान देऊन मनमोहून टाकणारा हा रंग आहे!!नवचैतन्याची आणि प्रकृतीच्या गहनतेचे प्रतिक म्हणजे हा रंग!!


🌹 *या रंगाचे वैशिष्ट्य घेऊन येणारी आजची आठवी माळ गुंफुया!!*

⚡ *आठवी माळ स्त्री-सामर्थ्याची*⚡

⚡ *अमरजा जोशी*⚡

🌹 *परिचय:*

◾शिक्षण- बी. ए. डी. एड.

◾शालेय शिक्षण पंढरपूर इथे झालं

◾डी. एड. सोलापूरला

◾पंढरपूर मधेच ७ वर्षे औपचारिक पठडीबद्ध मराठी शाळेत काम केले
नंतर पुण्यात ग्राममंगल या संस्थेत ७ वर्षे काम केले

◾२०१३ ला आम्ही ७ जणांनी एकत्र येऊन "आनंदक्षण लर्निंग स्पेस" या ट्रस्ट ची स्थापना केली आणि त्याच वर्षी आनंदक्षण हि मराठी माध्यमाची प्रयोगशील शाळा सुरु केली.

◾मुलांच्या बरोबर काम करायला खूप आवडतं. आता भूगोल हा विषय पाचवीच्या  पुढच्या  मुलांना आणि गणित हा विषय चौथी पर्यंतच्या मुलांना शिकवते.आणि मी शिकवते म्हणण्यापेक्षा मीच खरं तर खूप शिकते त्यांच्याकडून....

🌹 *आनंदक्षण शाळेविषयी..*

◾अमरजा जोशी,आरती गोखले,शाल्मली जोशी,आणि प्राजक्ता कुलकर्णी आम्ही चौघीनी मिळून हि शाळा सुरु केली.
आनंदक्षण हेच नाव ठेवण्यामागे उद्देश हा होता कि नावावरूनच शाळा मराठी मराठी माध्यमाची आहे हे लक्षात यावं आणि इथे येणाऱ्या मुलांचं शिकणं हे आनंददायी च असणार म्हणून हेच नाव योग्य वाटलं.
सगळ्यांनाच दहावी पर्यंत शिकवण्याचा अनुभव असल्याने पहिल्या वर्षापासूनच दहावीचे विद्यार्थी आनंदक्षण मध्ये होते. बाहेरच्या कोणत्याही शिकवण्या न लावता आणि शाळेच्या सर्व उपक्रमात छान सहभागी होऊनही विद्यार्थ्यांना उत्तम गन मिळाले.

◾ मुलांचे वक्तृत्व,सादरीकरण यासारखी कौशल्ये विकसित होण्यासाठी गेली 3 वर्ष सातत्याने वेगवेगळे उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करत आहोत.

◾पाठयपुस्तकातील अभ्यासक्रम तर घेतला जातोच पण त्याच बरोबर अवांतर माहिती कशी शोधायची,सांगायची,मिळवायची यावर हि तितकेच काम केले जाते.

◾मुलांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवा यासाठी व्यावहारिक प्रयोगशाळा देखील सुरु केल्या आहेत,जसे स्वयंपाक,बँक,शेती,कला इ.इंग्लिश भाषा म्हणून समृद्ध व्हावी यासाठी शिकवताना listing,reading,speaking,writing यावर भर दिला जातो. तसेच भाषा समृद्धीसाठी वाचनकट्टा हा उपक्रम सुद्धा राबवतो.

◾समाजाशी मुलांना जोडण्यासाठी म्हणून भात लावणी,रक्तदान शिबीर असे कार्यक्रम आयोजित करतो.

    *॥ज्ञानभाषा मराठी॥*
*॥माझी शाळा📚माझी भाषा॥*

◾ *सुचिकांतजी:*
सर्वांना नमस्कार,

मी *सुचिकांत,*  || ज्ञानभाषा मराठी || समूहाच्या #माळ_स्त्रीसामर्थ्याची  या उपक्रमांतर्गत आज आमरजा जोशी यांचे स्वागत करतो💐💐

*अमरजा ताई:*
🙏🏼🙏🏼🙏🏼 धन्यवाद

◾ *सुचिकांतजी:*
ताई, सर्वप्रथम आनंदक्षणचे आजपर्यंतच्या वाटचालीसाठी अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा....

*अमरजा ताई:*
👍🏼👍🏼👌🏼👌🏼खूप खूप धन्यवाद

◾ *सुचिकांतजी:*
ताई, तुम्ही मूळ पंढरपूरच्या आहात, तुमच्या शैक्षणिक कार्याला सुरुवात तिथूनच झाली .. पहिली ९ वर्षे तुम्ही चाकोरीबद्ध शाळेतच काम केलंय.. तिथल्या कामाच्या अनुभवाबद्दल सांगाना थोडं ..

*अमरजा ताई:*
हो नक्कीच!! मी 20 व्या वर्षी D, ed झाले आणि त्याच वर्षी शाळेत कामाला सुरुवात केली.पठडीबद्ध शाळा असल्याने ठरलेल्या साचातच काम करावे लागत असे त्यातून शाळेत येणारी मुले पण चांगल्या आर्थिक परिस्थिती असलेल्या घरातील नव्हती त्यामुळे सगळ्याच गोष्टीत तडजोड करावी लागायची. फी पासून ते खाण्यापर्यंत त्यामुळे आपणच थोडे जास्त कष्ट घेऊन शिकवणे हाच पर्याय होता.

◾ *सुचिकांतजी:*
यासंदर्भातच पहिला प्रश्न आलाय .. - औपचारिक पद्धतीने शिकवताना शिक्षक म्हणुन मर्यादा काय जाणवल्या? - वृषाली गोखले

*अमरजा ताई:*
हो त्या पद्धतीत खूपच मर्यादा होत्या तेव्हा. आता तरी खूपच बदल झाले आहेत..जसे गणित शिकवताना आता आम्ही बाहेर परिसरात मुलांना घेऊन जातो किंवा विज्ञान पण तसेच घेतो

*सुचिकांतजी:*
अच्छा

*अमरजा ताई:*
पण तेव्हा शाळेच्या बाहेर मुलांना घेऊन जायचेच नाही. त्या एकाच वर्गात बसून सगळे विषय शिकवायचे

*सुचिकांतजी:*
होना .. मुलांना बांधल्या सारखं वाटत राहतं...

*अमरजा ताई:*
पुस्तकाच्या बाहेरचे काही घ्यायचे स्वतःच्या म्हणण्याने तर परवानगीची गरज

*सुचिकांतजी:*
आम्हाला देखील शाळेत असताना, एखाद्या तासाला बाहेर नेलं की .. मस्त वाटायचं ..

*अमरजा ताई:*
अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि इतर सरकारी काम खूपच!!

*सुचिकांतजी:*
खरंय ..यामुळे शिकवण्याकडे नक्कीच दुर्लक्ष होत असणार ..

*अमरजा ताई:*
जन गणना, प्रौढ शिक्षण वर्ग
यासारखे उपक्रम पण राबवले जायचे त्यामुळे त्यामध्येच जास्त वेळ  त्यामुळे मुलांना शिकवण्याचे समाधान नाही

◾ *सुचिकांतजी:*
खरंय ..ताई, शिक्षक व्हायचं तुम्ही अगोदरपासूनच ठरवलं होतं? की एखादा प्रसंग/घटना घडली आणि तुम्ही शिक्षण क्षेत्राकडे वळालात?

*अमरजा ताई:*
नाही मला आधी शिक्षक होण्याची अजिबातच इच्छा नव्हती 🙂🙂🙂 मला वकील व्हायचे होते

*सुचिकांतजी:*
👍👍

*अमरजा ताई:*
पण घरातील आर्थिक परिस्थिती आणि आई वडील यांचा आग्रह होता कि D. Ed झाल्यावर लगेच नोकरी लागते. मग पुढचा खर्च वाचेल आणि मला बोलण्याची आवड जास्त त्यामुळे नाराजीनेच DEd केले. पुढे नोकरी पण लागलीच

*सुचिकांतजी:*
👍

*अमरजा ताई:*
पण त्या शाळेत काम करताना खूपच शिकायला मिळाले.

◾ *सुचिकांतजी:*
तुम्ही सरकारी मध्ये होता तिथे की खाजगी, अनुदानित ?

*अमरजा ताई:*
खाजगी शाळा होती पण अनुदानासाठी संस्था प्रयत्न करत होती त्यामुळे खूप गोष्टींची (सरकारी) माहिती झाली

◾ *सुचिकांतजी:*
छान!! पुढचा प्रश्न घेतो
असं कोणतं कारण घडलं ज्यानंतर तुम्ही स्वतःची शाळा काढायचा निर्णय घेतला? किंवा त्यादृष्टीने विचार करायला सुरुवात केली?

*अमरजा ताई:*
मी लग्न होऊन पुण्यात आले आणि माझ्या मुलीसाठी जेव्हा शाळा शोधायला सुरुवात केली तेव्हा मी ज्या पद्धतीत शिकले तशी शाळा नको होती

*सुचिकांतजी:*
अच्छा

*अमरजा ताई:*
म्हणून बरेच शोधकार्य केले..तेव्हा ग्राममंगल विषयी समजले.आणि कल्पना पण आवडली.म्हणून मी स्वतःच त्यांचे training पूर्ण केले आणि मी आणि माझी मुलगी दोघींही तिथे एकदमच गेलो

◾ *सुचिकांतजी:*
अच्छा!!त्यांचे training?

*अमरजा ताई:*
हो!!

◾ *सुचिकांतजी:*
थोडं सांगाना त्याबद्दल

*अमरजा ताई:*
ग्राममंगल मध्ये शिक्षकांचे training घेतले जाते..त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे ती शिकवली जाते.ते पालकांना पण हे करायला सांगतात

*सुचिकांतजी:*
माझ्यासाठी नवीन आहे .. पालकांसाठी ट्रेनिंग !

*अमरजा ताई:*
त्या मध्ये बऱ्याच नवीन गोष्टी शिकले आणि शिक्षणाबद्दलच दृष्टिकोनच बदलला.आम्ही पण आता पालकांना training देतोच.कारण शिकवण्याची पद्धत खुपच वेगळी आहे त्यामुळे पालक व शाळा यामध्ये मुलांनाच गोंधळ वाढतो शिकण्यातला!!

◾ *सुचिकांतजी:*
मग आनंदक्षणच ठरवल्यावर, आर्थिक नियोजन कसं केलं?  काय महत्वाच्या अडचणी आल्या?
------- सुयोगा जठार, अमोल शिंपी

*अमरजा ताई:*
सर्वात मोठी अडचण हि आर्थिकच आणि जागेची होती. सुरुवातीला आम्ही चौघीनी पदाराचेच पैसे घातले प्रत्येकाला जसेशक्य आहेत तसे!! आणि अगदीच 2 खोल्यांची जागा घेतली

*सुचिकांतजी:*
अच्छा ..

*अमरजा ताई:*
६ च मुले होती पहिल्यावर्षी.आणि आम्ही चौघीही अजूनही पगार असा घेतच नाहीत.म्हणून इतर सर्व खर्च भागवू शकतो.कारण बाहेरून येणारे ताई दादा याना काहीतरी मानधन द्यावेच लागते

◾ *सुचिकांतजी:*
आता एकूण किती शिक्षक आहेत तिथे ?

*अमरजा ताई:*
आता पूर्णवेळ ८ आणि तासिकेवर येणारे ८ आहेत

*सुचिकांतजी:*
छान नियोजन आहे ..

*अमरजा ताई:*
पण सगळेच जण खूप मनापासून आणि आनंदाने काम करतात पैशाकडे न बघता! सगळ्यांचाच खूप हातभार असतो कामात व आर्थिक पण

◾ *सुचिकांतजी:*
- तुम्ही मराठी माध्यमाची शाळा काढताना तुम्हाला कुणी उपदेशाचे डोस दिले का ? उदा. मराठी कशाला, इंग्रजी शाळा काढा वगैरे?

*अमरजा ताई:*
त्याच्या तर खुपच आठवणी आहेत आमच्या!! आम्ही शाळा सुरु केल्यावर मान्यता मिळवण्यासाठी खूप वेगवेगळ्या लोकांकडे जात होतो. तेव्हा एकदा ZP च्या ऑफिस मध्ये सगळी चौकशी करायला आणि काय करावे लागते मान्यतेसाठी ते विचारायला गेलो. तेव्हा तिथले मोठे अधिकारीच आम्हाला म्हणाले कि काय मॅडम कशाला मराठी शाळा काढताय आणि अशी किती फी घेणार तुम्ही तिथे आणि काम कशी होणार????? त्यापेक्षा इंग्लिश शाळा काढा भरपूर फी घेता येते.तुम्हाला पण खूप मिळतील!!

*सुचिकांतजी:*
अरेरे .. दुर्दैवी प्रकार ..

*अमरजा ताई:*
हो ना  फारच वाईट वाटले

◾ *सुचिकांतजी:*
मग अशा वातावरणात स्वतःला कसं स्टेबल ठेवलत ?

*अमरजा ताई:*
आम्ही असे ठरवलेच होते कि कितीही अडचणी आल्या तरी माध्यम बदलायचे नाही मग मान्यता नसली तरी चालेल.. अजूनही मान्यता मिळालेली नाहीच

◾ *सुचिकांतजी:*
काही टक्के अनुदान वगैरे .. की काहीच नाही ?

*अमरजा ताई:*
अजुन काही वर्ष स्वतःचे पैसे घालावे लागले तरी चालेलं... मान्यताच नाही तर अनुदान लांबच!! आणि जागेची अट मोठी आहे

*सुचिकांतजी:*
हो ते पण आहेच ..

*अमरजा ताई:*
एक एकर जागा असल्याशिवाय चालतच नाही.. नियमच केला आहे.

◾ *सुचिकांतजी:*
- तुमची ७ जणांची टीम आहे, कधी मतभेद होतात? कशाप्रकारे मार्ग काढता?

*अमरजा ताई:*
हो मतभेद होतात पण फार नाही बकारण एकाच विचाराने एकत्र आलो आहोत. पण जेव्हा होतात तेव्हा आपला मूळ उद्देश काय यावर एकत्र विचार होतो.आणि मग निर्णय घेतला जातो. आणि खूप वेळा चौघीच्याही मनात एकच विचार एकाचवेळी येतो हा पण एक योगायोग आहेच

◾ *सुचिकांतजी:*
पहिल्या वर्षी किती मुलं, कोणत्या वर्गात घेऊन शाळा सुरू केली? ती मुलं शाळेत यावी म्हणून कसे प्रयत्न केलेत? - निवेदिता खांडेकर

*अमरजा ताई:*
सुदैवाने हा प्रश्नच आला नाही कारण आमची स्वतःचीच मुलं घेऊन आणि एक बाहेरची मुलगी अशी शाळा सुरु केली २चौथीत...३ सहावीत...आणि एक 10 वीत
अशी ६ मुले होती.आणि आमचीच मुले असल्याने इतरांना ठामपणे सांगू शकत होतो.हा फायदा झाला

◾ *सुचिकांतजी:*
--- आता एकूण पट किती आहे?

*अमरजा ताई:*
आता बालवाडी ते ९ पर्यंत 36 मुले आहेत

◾ *सुचिकांतजी:*
ही एकूण किती वर्षातली प्रगती ?

*अमरजा ताई:*
३ वर्षातली आता चौथे वर्ष चालू आहे

◾ *सुचिकांतजी:*
- अभ्यासक्रमात शासनानी आखून दिलेल्या गोष्टींव्यतिरिक्त अजून काय काय घ्यायचं हे कसं ठरवलं?
- निवेदिता खांडेकर

*अमरजा ताई:*
आताच अभ्यासक्रम पूर्ण घ्याचाच पण मुलांना तेच शिक्षण व्यवहाराला कसे जोडता येईल कृतीतून आणि प्रत्यक्ष अनुभवातून कसे काम करता येईल यावर आम्ही खूपच विचार केला आणि करतो आहोत

◾ *सुचिकांतजी:*
👏👏 यालाच अनुसरून एक प्रश्न आहे ---  - कोणते उपक्रम घ्यायचे हे कसं ठरवता?

*अमरजा ताई:*
त्यातूनच नवनवीन कल्पना सुचतात तसेच आम्ही इतर संस्थांचे training पण घेतोच स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी

◾ *सुचिकांतजी:*
एखादे उदा .. देऊ शकाल का ?

*अमरजा ताई:*
मुलांच्या बरोबर चर्चा अनेक वेळा अनेक विषयांवर चालू असते. त्यातूनच विषय मिळत जातात.. मुलं कुठे कमी आहेत किंवा कशाची गरज जास्त जाणवते आहे हे बघतो आणि वेगळा विषय निवडतो
बरेचदा मुलांकडून खूप छान कल्पना येतात
आणि आम्ही पण काही ठरवलेल्या असतात
जसे भातलावणी किंवा वारीला पायी चालत जाणे. आता मुलेच स्वतःहून हे ठरवतात

◾ *सुचिकांतजी:*
सरकारी मदत नसताना स्वबळावर तुम्ही शाळा चालवता. तरीही कुठे सरकारी आडकाठी आली का?
- निवेदिता खांडेकर

*अमरजा ताई:*
अजुन तरी नाही... कारण संख्या कमी आहे पण जिथे शाळा आहे त्या परिसरातील लोक मात्र यावरून खूप त्रास देतात.आवाजाचा वाहनांचा त्रास होतो असे म्हणतात.. पोलीसात तक्रार जण्यापर्यंत गेले आहे..त्यामुळे या गोष्टींचाच त्रास जास्त होतो

◾ *सुचिकांतजी:*
कठीण आहे .. एक शाळा चालवणे म्हणजे दिव्यच आहे ..इथे एसएससी विरुद्ध सिबीएससी चढाओढ सुरु असताना, आपल्या "आनंदक्षण" या प्रयोगशील शाळेबद्दल लोक ऐकतात तेव्हा लोकांची नेमकी प्रतिक्रिया काय असते? आणि येणाऱ्या चौकशीचे परिवर्तन प्रवेशप्रक्रियेत होण्याचे प्रमाण कितपत आहे? - राहुल वेळापुरे

*अमरजा ताई:*
हो खरंय सध्या लोकांनाच ओढा Cbse कडेच आहे पण मातृभाषेतून शिक्षण घेणे कसे आणि किती चांगले आहे योग्य आहे हे खूप समजून सांगावे लागते
आणि तरीही प्रत्यक्षात काम कसे घेतो हे पण सांगावे लागते!!

*सुयोगा ताई:*
तुमच्या शिक्षणातून ते कळेलच.. 🙏🏻

*अमरजा ताई:*
एका पालकाबरोवर १ ते दिड तास जातो

*सुचिकांतजी:*
तुलनात्मक पण दाखवावे लागते का ?

*अमरजा ताई:*
हो ते तर करावेच लागते
आणि एवढे करूनही 10 मधले 3 पालक प्रवेश घेतात

◾ *सुचिकांतजी:*
तुमच्यातील शिक्षकाला जाणून घ्यायचा प्रयत्न करू ... अमरजा ताई, तुम्हाला वैयक्तिकरीत्या, कोणते विषय शिकवायला आवडतात आणि का?

*अमरजा ताई:*
सुरुवातीला मला कोणता विषय घेता येईल याचाही अंदाज नव्हता पण नंतर भूगोलातील गोडी वाढली आणि तोच विषय आवडू लागला. नंतर मुलीला गणित शिकवण्याच्या प्रयत्नात प्राथमिकचे गणित छान शिकले मी!! आणि मग तेही घ्यायला सुरु केले

◾ *सुचिकांतजी:* - तुम्ही १० वी पर्यंतच्या मुलांना शिकवले आहे, शिकवता ... विविध वयोगटातील मुलांची तुम्हाला वाटलेली खास वैशिष्ट्ये कोणती? काही उदाहरणे द्याल?

*अमरजा ताई:* हो नक्कीच!! चौथी पर्यंत मुलांना भूगोल शिकवताना माझी मदत थोडी जास्त लागते. पण एकदा संकल्पना स्पष्ट झाली कि मुले खिपच आवडीने शिकतात मग माझी मदत 30% च लागते. सगळं स्वतःचे स्वतः काम करतात आणि छोट्या मुलांनाही समजावून सांगतात. असे काम आनंदक्षण मध्ये बरेचदा होते. मोठी मुले काही संकल्पना छोट्या मुलांना व्यवस्थित समजावतात. त्यामुळे त्यांचे पण दृढीकरण होते

◾ *सुचिकांतजी:*
म्हणजे काही काही ABL सारखं ?
अमरजा ज्ञानभाषा: नाही समजलं

*सुचिकांतजी:*
Activity Based Learning

*अमरजा ताई:*
हो तसेच

*सुचिकांतजी:*
जशी केंजळ ची शाळा आहे ...

*अमरजा ताई:*
बहुदा ती मी पहिली नाही पण ऐकले आहे

◾ *सुचिकांतजी:*
- नियमांच्या बाबतीत तुम्ही किती कडक आहात? मुलांना तुमची भीती वाटते? तुम्ही मुलांना शिक्षा करता का?😬

*अमरजा ताई:*
नाही आम्ही मुलांना शिक्षा करत नाहीत

*सुचिकांतजी:*
मग शिस्त कशी लावता ?

*अमरजा ताई:*
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलांकडून वारंवार होणाऱ्या चुका कमी करण्यासाठी त्यांची बालसभा घेतो आणि यावर काय उपाय करू या असे त्यांनाच विचारतो. ते जो उपाय सांगतील तसे करतो म्हणजे पुन्हा तक्रार येत नाही 😊😊 पण काही गोष्टी या ठरवल्याप्रमाणे व्हायलाच हव्यात हे पहिल्याच दिवशी चर्चेतून ठरवतोच

◾ *सुचिकांतजी:*
- प्रत्येक ठिकाणचे पालक वेगळे असतात. सोजर ताईंना ग्रामीण भागातील पालकांचे आव्हान आहे तर तुम्ही सुशिक्षित पालकांशी नेहमी संपर्कात असता, या २ टोकाच्या अवस्था आहेत. माझा मित्र त्याच्या मुलीच्या शाळेतील शिक्षकांना नेहमी उपदेशाचे डोस पाजून येतो. असे काही पालक असतात का? तुम्ही त्यांना कसे हाताळता?

*अमरजा ताई:*
हो असेच पालक जास्त येतात
पण त्यांना सतत आपली कामाची पद्धत समजून सांगायला लागते. कारण सगळेच उच्च शिक्षित असतात ना!!!😊😊😊

*सुचिकांतजी:*
होय!! शिवाय गुगल वाले 😬

*अमरजा ताई:*
मग 4 वेळा सांगूनही फरक पडला नाही तर ठाम राहून निर्णय घ्यावा लागतो. थोडा वाईट पण येतो पण एवढी मुले सांभाळायची तर तो कोणालातरी घ्यावा लागणारच. आणि शिवाय काम करण्याची पद्धत वेगळी म्हणून जास्तच अपेक्षा असतात

◾ *सुचिकांतजी:*
- असे कोणते पालक आहेत का, ज्यांचा फोन आला, संदेश आला तरी दडपण येतं ? वैताग वाटतो ?

*अमरजा ताई:*
नाही असे कोणी नाहीत पण काहींच्यासाठी थोडी मोर्चे बांधणी करावी लागते

◾ *सुचिकांतजी:*
- पालकांना, पाल्यांबरोबर अभ्यासात गुंतवणे, मुलांच्या अभ्यासात लक्ष घालायला लावणे, यासाठी कसे प्रोत्साहित करता?

*अमरजा ताई:*
आम्ही पालकांसाठी जे training घेतो त्यामध्येच बऱ्याच गोष्टींची कल्पना देतो कि मुलांबरोबर काय काय करायचे ते आणि मग जशी गरज पडेल तसे प्रत्यक्ष कामे दाखवतो

◾ *सुचिकांतजी:*
तुम्ही मुलाखत पण घेता का पालकांची ?

*अमरजा ताई:*
नाही!! पण त्यांना हि संकल्पना समजली पाहिजे यावर भर देतो.

◾ *सुचिकांतजी:*
एक महत्त्वाचा प्रश्न आला आहे, प्राची साठे यांच्याकडून .....

कमी मुलांमध्ये समाजिकीकरण होते का
शाळा म्हणजे जास्त मुलं असतील तर समाजिकीकरण होऊन मुलं शिकतात असे आजचे शिक्षण शास्त्र सांगते ..आपला अनुभव काय

*अमरजा ताई:*
आमचा अनुभव खूपच छान यामधला.. सर्व वयोगटाची मुले खूप वेळा एकत्र काम करतात त्यामुळे बालवाडीपासून ते 10 पर्यंत सगळ्यांनाच एकमेकांशी जुळवून घ्यावे लागते. ते पण प्रत्येकाच्या मर्यादा लक्षात घेऊन.. त्यामुळे समाजिकीकरण जास्त छान होते.. शिवाय आम्ही त्यांना बरेच उपक्रम असे देतो कि ज्या मध्ये त्यांना प्रत्यक्ष लोकांना भेटूनच काही कामे करायची असतात.. त्यामुळे ते कसे करायचे याचा विचार त्यांनीच करायचा असतो.

◾ *प्राची ताई:*
आपल्या शाळेचा pattern मोठ्या शाळेत नेण्यासाठी काही मार्गदर्शन करू शकाल का?

*अमरजा ताई:*
आम्ही इतर शाळांना तो कसा राबवायचा याचे training पण देतो

◾ *सुचिकांतजी:*
एक पालक म्हणून होम स्कुलींग बद्दल तुम्हाला काय वाटते ?
म्हणज त्यातील फायदे व तोटे - श्रद्धा सांगळे

*अमरजा ताई:*
होम्सकूलिंग हे छान आहे पण त्यालाही काही मर्यादा आहेत.

*अमरजा ताई:*
मुलांचे काही विकास हे त्याच्या वयोगटातच होतात. ते घरात होत नाहीत

◾ *सुचिकांतजी:*
शालेय जीवनाच आपलं एक सौंदर्य आहे हो ना ?

*अमरजा ताई:*
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलांना काही शिष्टाचार,काही पद्धती समजायला शाळाच हवी असते

◾ *सुचिकांतजी:*
- मुलांना शिकवताना तुम्हाला वाटणारी सर्वात आव्हानात्मक गोष्ट कोणती?

*अमरजा ताई:*
मुलांपेक्षा पालकच जास्त आव्हानात्मक असतात 😊😊
पण तरीही एखादा कंटाळवाणा धडा किंवा निरास अभ्यासक्रम हे समजवण्याला फार कसब लागते.. गणितात म्हणाल तर अपूर्णांक

◾ *सुचिकांतजी:*
- तुम्ही मुलांचं मूल्यमापन कोणत्या निकषांवर करता? तिथे काही वेगळी पद्धत?

*अमरजा ताई:*
त्यासाठी आम्ही परीक्षा घेतो पण गुण देत नाहीत ८ वि पर्यंत

◾ *सुचिकांतजी:*
मग पालकांना प्रगती कशी समजते ?

*अमरजा ताई:*
आणि त्यात्या विषयांच्या क्षमता काढलेल्या आहेत त्यामध्ये मूल कुठे आहे ते 5 point scale वर नोंद करतो. ते पालकांना देतो

◾ *सुचिकांतजी:*
- आनंदक्षणची मुले कोणकोणत्या मुख्य स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत? तिथल्या कामगिरीबद्दल सांगाल ?

*अमरजा ताई:*
आनंदक्षण मध्ये एकही स्पर्धा होत नाही १००% सहकार्यावर शाळा चालते
त्यामुळे बाहेरच्या कोणत्याही स्पर्धेला मुले पाठवत नाहीत. इतरांशी स्पर्धा नाही स्वतःचीच स्वतःशी स्पर्धा.. त्यामुळे कसल्याच स्पर्धा नाही

*सुचिकांतजी:*
पण जशा नाट्यवाचन स्पर्धा, नाट्यसंगीत, चित्रकला .. इथे पुण्यातल्या बहुतेक सर्व शाळा भाग घेतात.. स्पर्धांमध्ये भाग घेतला नाही तर कुठे मागे राहणार नाही ?शिवाय खेळाच्या स्पर्धा ... तर महत्त्वाच्या असतात ..

*अमरजा ताई:*
नाही स्पर्धेमुळे कौशल्य वाढत नाही तर ईर्ष्या वाढते

*अमरजा ताई:*
खेळ रोज मुले खेळतात त्यांच्यात ती चुरस असते पण आम्ही बाहेर स्पर्धेसाठी पाठवत नाहीत. प्रत्येक मूल वेगळं त्यामुळे कोणाशीच बरोबरी नाही

*अमोल शिंपी:*
पण स्पर्धेमुळे, गुणवत्ता, चिकाटी व जिद्दही वाढते असं वाटतं.

*अमरजा ताई:*
आम्हाला त्याचा अनुभव थोडा वेगळा आहे. गुणवत्तेत फार फरक नाही पडत.

◾ *सुचिकांतजी:*
प्रमिला नजन यांचे १-२ प्रश्न आहेत ते घेऊ ... अध्यापनाशी संबंधीत तयारी करण्यासाठी शेवटचे घड्याळी १ ते२ तास शिक्षकांसाठी ठेवणे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये शक्य आहे का?
याचा विद्यार्थी व शिक्षकांना फायदा या यादृष्टीने आपले मत काय? - प्रमिला नजन

*अमरजा ताई:*
शिक्षकांनी आधीच नियोजन केले असेल तर त्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज वाटत नाही पण काही वेगळा उपक्रम घ्यायचा असेल तर त्याच्या तयारीसाठी लागणार वेळ दयायलाच हवा. त्याचा दोघांनाही चांगला फायदा होतो

◾ *सुचिकांतजी:*
- पौगंडावस्थेतील मुलांसाठी शाळांमध्ये जाऊन, समुपदेशन करण्यासाठी खास समुपदेश्कांची नेमणूक झाली तर शाळांना त्याचा कितपत फायदा होईल असे आपणास वाटते? - प्रमिला नजन

*अमरजा ताई:*
आमच्या इथे तर एक ताई पूर्ण वेळ त्यासाठीच मुलांना उपलब्ध करून दिली आहे तिच्याशी मुलं मोकळेपणाने बोलतात
सगळे प्रश्न विचारात

*सुचिकांतजी:*
खूपच छान कल्पना आहे ..

*अमरजा ताई:*
त्यामुळे मुले मानसिक रित्या खूप relax रहातात. विशेषतः 7वी पासून पुढची.. आणि मुलांना तर खूपच प्रश्न असतात या संबंधी

*सुचिकांतजी:*
अशी व्यक्ती तुम्ही नेमून दिल्याने मुलं मोकळेपणे बोलत आहेत .. हे खूप छान आहे ..

*अमरजा ताई:*
हो त्याचा फायदा अभ्यासातही होताना दिसतो

◾ *सुचिकांतजी:*
- व्यावहारिक प्रयोगशाळा ही संकल्पना कशी काय मनात आली? - वृषाली गोखले
या प्रयोग शाळेत ऐकणे,वाचणे,बोलणे,लिहीणे ही कौशल्ये शिकवण्यांसाठी कोणता कृती आराखडा { action plan  } तयार केलाय?

*अमरजा ताई:*
काही मुलांना अभ्यासातील संकल्पना वेगळ्या पद्धतीने शिकवल्यातर जोडत छान समजतात आणि काही काही मुलांकडे काही वेगळी कौशल्ये उपजतच असतात. त्यांना त्या प्रमाणे वाव दिला तर मुलांना त्याचा फायदा जास्त होतो. म्हणून हि कल्पना डोक्यात आली. आत्ता मुले अनेक वस्तू बनवतात विकण्यासाठी.. त्यातून येणारे पैसे जमावण्यासाठी त्यांची एक बँक सुरु केली आहे त्यांनीच बँक हीच एक व्यावहारिक प्रयोगशाळा आहे. त्यामधूनच त्यांना गणितशी जोडले आहे.. त्यांनीच या बँकेचे पासबुक slip सगळे तयार केले आहे

*अमरजा ताई:*
त्यातूनच मग व्याज कर्ज हे शिकतील. आणि खूप आवडत आहे त्यांना

*अमोल शिंपी:*
आपण हा प्रश्न खुपच संवेदनशीलपणे व कुशलतेनं हाताळलात. त्याबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन.

◾ *सुचिकांतजी:*
- या प्रयोग शाळेत ऐकणे,वाचणे,बोलणे,लिहीणे ही कौशल्ये शिकवण्यांसाठी कोणता कृती आराखडा { action plan  } तयार केलाय?

*अमरजा ताई:*
हो त्यासाठीचे नियोजन आधीच बनवले जाते यामधून काय काय पोचवायचे आहे याचे नियोजन करतो

◾ *सुचिकांतजी:*
तुम्ही वाचनकट्टा उपक्रम देखील राबवता .. त्याबद्दल सांगाल ?

*अमरजा ताई:*
हो आनंदक्षण मध्ये वाचनासाठी एक ताई येते जी वेगवेगळ्या वयोगटाच्या मुलांसाठी आधी स्वतः पुस्तके वाचते. आणि मग मुलांना ती वाचून दाखवते
तसेच मुलांनीही एक एक पुस्तक सगळ्यांसमोर वाचायचे. तसेच वर्तमापत्रातील बातम्या वाचू त्यावर चर्चा केले जाते.वाचनात येणारे नवीन शब्द ती मुलांना सांगते

*सुचिकांतजी:*
मराठी इंग्रजी दोन्ही घेता का ?

*अमरजा ताई:*
तसेच पुस्तक कसे तयार होते त्याचे लेखक यांचीही भेट घेण्यात येते. मुलं त्यांची मुलाखत घेतात

◾ *सुचिकांतजी:*
आमरजा ताई , आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया .. आजपासून २५ वर्षांनी आनंदक्षण कुठे असावी असं वाटतय? - निवेदिता खांडेकर

*अमरजा ताई:*
आनंदक्षण सारख्या वेगळा विचार करणाऱ्या अनेक शाळा असाव्यात आणि आनंदक्षण हे त्याचे मुख्य केंद्र असावे जे मुलांना कोणताही ताण न देता आनंदाने शिकण्यासाठी प्रेरणा देत राहील
मुलांची संख्या किती हे महत्वाचे नाही तर मुलं किती शिकली आणि कशी शिकली यावर आनंदक्षण चे यश आहे

*सुचिकांतजी:*
खूप छान विचार आहेत तुमचे ..

*अमरजा ताई:*
त्यामुळे इमारत आणि संख्या याचा विचार कमी आहे

*सुयोगा ताई:*
*मळलेल्या वाटेवरून न चालता वेगळी वाट चोखाळणे* यासाठी खूप धारिष्ट्य लागतं.. आपण जे करताय ते खूप प्रेरणादायी आहे.  आपल्याला खूप हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवादही.. 🙏🏻🙏🏻💐💐

*निवेदिता ताई:*
काम कमी का जास्त विचारच नको.हिंमत करून वेगळं आणि मुलांना खरा आनंद देणारं काम करताय तुम्ही.

*अमृताताई:*
अमरजाताई तुमच्या नवी मळवाट घडविण्याच्या आत्मविश्वासाला आणि जिद्दीला सलाम 👍�💐हे सर्व करायला मनाची औदार्यशीलता फार लागते जी आपल्यात आहे.😊

◾ *सुचिकांतजी:*
*#माळ_स्त्रीसामर्थ्याची*

आज आपल्या या उपक्रमात आपण *आमरजा जोशी* यांच्याशी संवाद साधला. आमरजा ताईंनी आपल्या सर्व प्रश्नांची मुद्देसूद, कुठेही न थकता उत्तरे दिली, त्याबद्दल समूहातर्फे अनेक धन्यवाद.
पुन्हा एकदा, आनंदक्षणच्या पूर्ण चमूला, भविष्यातील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा.

◾ *अमरजा ताई:* मलाही आज तुमच्याशी बोलून खूपच छान वाटले. खरं आजवर झालेल्या सर्वांच्या मुलाखती आणि त्यांची कामे यापेक्षा आमचे काम खूपच कमी आहे पण आपण सर्वांनी दिलेला स्नेह व सहकार्य आणि कौतुकाची थाप हो खूपच मोलाची आहे.त्याबद्दल सर्वांचे खूपच आभार 😃😃🙏🏼🙏🏼🙏🏼

      *॥ज्ञानभाषा मराठी॥*
*॥माझी शाळा📚माझी भाषा॥*

No comments:

Post a Comment