ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Tuesday, October 18, 2016

माळ स्त्रीसामर्थ्याची - माळ तिसरी

*नमस्कार!!*

सृष्टीतील सर्व रंग आपल्या अंतरंगात रंगलेले असतात. आपल्याला रंगांची ओळख चित्रकलेमुळे होते आणि मग चित्रात रंग भरणे सुरु होते. वेडेवाकडे वळण घेत घेत शेवटी सुरेख रंग संगती जोडत जोडत रंग भरले जातात. हे रंग केवळ चित्र सुंदर दिसावे म्हणून नाही तर ते चित्र बोलके व्हावे म्हणून भरले जातात. अशा वेळी हे रंग भाषेच्या रंगात रंगतात!!!

*🌹आजचा रंग: पांढरा*
हा रंग पावित्र्याचा,बुद्धिमत्तेचा,सुसंस्कारांचा द्योतक आहे. नितळतेचं, निरागसतेचं आणि स्वच्छतेचं प्रतिक म्हणून गणला जातो. सर्वगुणसंपन्न अशा देवी पार्वतीचे प्रतिक म्हणजे पांढरा रंग!!!

🌹 *या रांगाचे वैशिष्ट्य घेऊन येणारी आजची तिसरी माळ गुंफुया!!*

⚡ *तिसरी माळ स्त्री-सामर्थ्याची*⚡

⚡ *सौ. सुयोगा सुनील जठार*

*परिचय:*

💠बारावी सायन्स, डी. एड्,  बी. ए., बी एड्.

💠मु. पोस्ट :- तारळ ता.  राजापूर जि. रत्नागिरी *सध्या वास्तव्य राजापूर*

💠नोकरी सुरवात तारीख 10/09/84

💠5 डिसेंबर 2011 केंद्रप्रमुख पद प्राप्त
केंद्रात त्यावेळी 42 शिक्षक होते. 11 जि. प. मराठी माध्यमाच्या शाळा. 2 हायस्कूल आहेत पण अनधिकृत.

💠केंद्र  राजापूर नं 2

💠केंद्रात 11 पैकी 6 प्राथमिक आणि 5 पूर्ण प्राथमिक शाळा आहेत.

💠 सध्या वर्षभर बीट विस्तार अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहे. (शिवाय केंद्रप्रमुख आहेच)

💠बीट राजापूर जि. प. शाळा 42
     हायस्कूल 3

💠शाळेत अध्यापन करत असताना मुलांना (माझ्या आणि दुसऱ्या शाळेतल्या पण) शिष्यवृत्ती आणि नवोदय प्रवेश परीक्षा मोफत मार्गदर्शन केलेलं आहे. काही मुलांची निवड होऊन नवोदय विद्यालयात शिक्षण पूर्ण केले आहे.

💠आवडता विषय गणित व मराठी शिकवायला जास्त आवडतात

💠नावडता विषय स. शास्त्र

💠 इतर - आमचं एक मंडळ आहे समर्थ महिला त्या मार्फत आम्ही भजन करतो. विविध भजन स्पर्धेत भाग घेतलेला आहे. दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रम करतो. त्यामध्ये एकांकिका पासून नमनापर्यंत कार्यक्रम करतो. मुलगी वाचवा पर्यावरण रक्षण पाणी व्यसनमुक्ती याविषयीचे कार्यक्रम समावेश असतो. मी स्वतः भाग घेतेच.  पण काही कार्यक्रम दिग्दर्शन आणि लेखनही केले आहे.

💠 *आई रिटायर होते* *तीन चोक तेरा* *गेला माधव कुणीकडे* वाऱ्या वरची वरात मधलं *रविवार सकाळ* अशा नाटकांमधून (हौशी) कलाकार म्हणून काम केलेलं आहे.

💠 4/5 मुलींना स्वतः खर्च करून शिकवले आहे. *आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही अशा*

💠महिलांसाठी विविध स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीसे मिळाली आहेत.

💠गाणी म्हणण्याची आवड आहे आणि संधी मिळाली तर त्यातलं शिकायची पण इच्छा आहे.

💠 अजून 4 वर्षे नोकरी शिल्लक आहे. (58 म्हटलं तर) त्यामध्ये शाळा आणि मुलांसाठी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे.. पाहू..

आणखीन एक सांगायचं राहिलं मी टायपिंग इंग्रजी 30/40/50/80 परीक्षा आणि मराठी 30/40 पास आहे. पण आता❌😊😀

    
◾ *सुचिकांतजी*
सुयोगा ताई,  *#माळ_स्त्रीसामर्थ्याची* मध्ये मी सुचिकांत तुमचे स्वागत करतो.💐💐💐

*सुयोगा ताई:*
धन्यवाद 🙏🏻

◾ *सुचिकांतजी:*
🙏आज आपण नेहमी प्रमाणे मुलाखतीची सुरुवात न करता, एका वेगळ्या प्रश्नाने सुरुवात करणार आहोत. तुम्ही या समूहात आल्यापासून सतत सहभाग दर्शवला आहे.नेहमीच तुमच्या बुद्धिमत्तेची चमक दिसून येत होती. त्यामुळं समूहात कधी आलात आणि कधी या समुहाच्या झालात हे कळलंच नाही. याबद्दल तुम्हाला काही सांगावेसे वाटते का?

*सुयोगा ताई:*
हो नक्कीच.. मलाही आठवत नाही पण समूहांमध्ये आल्याशिवाय चैन पडत नाही  हे एक आणि दुसरं मी खूप शिकतेय इथे.. त्याचा मला माझ्या दैनंदिन व्यवसायात फायदा होतोय.

आमच्या समूहांमध्ये ही मी छोट्या प्रमाणात असे उपक्रम सुरू केलेत.

◾ *सुचिकांतजी:*
खूप छान ..

*सुयोगा ताई:*
एक शिक्षक रोज माझी जन्मठेप चे एक पान इमेज टाकतात.कोडी/वाचन इ. इ.

आपल्या या इथल्या गोष्टी खात्रीलायक माहिती असतात.

◾ *सुचिकांतजी:*
ताई, हे बिट म्हणजे नक्की काय असत हो? बिट - नाव का पडलं असावं ?

◾ *सुयोगा ताई:*
बीट म्हणजे तालुक्यातील शैक्षणिक कामासाठी विभाग पाडलेले असतात त्यातला एक विभाग म्हणजे बीट. त्यालाच प्रभाग म् हणतात

◾ *सुचिकांतजी:*
👍👍👍 बिट विस्तार अधिकारी झालात .जबाबदारी वाढली ..तेव्हाची तुमची प्रथम प्रतिक्रिया काय होती?

* सुयोगा ताई:*
मला आवडलं कारण ते काम मी करतच होते  7 लोक हवेत तिथे एक आहे. गटशिक्षणाधिकारी पद रिक्त आहे म्हणून अधिकृत चार्ज आला त्यामुळे हक्काने काम करता येतं. काम करण्याबद्दल मला कंटाळा नाही

*निवेदिता ताई:*
वाह ...

◾ *सुचिकांतजी:*
मस्त ! या कामातली आव्हाने काय आहेत ?

*सुयोगा ताई:*
मला महत्वाचे आव्हान म्हणजे मुलांची शैक्षणिक गुणवत्ता हे वाटतं पण मी ते पेललंय माझ्या शिक्षकांना सोबत घेऊन 100% प्रगत बीट जाहीर केलं कालच.

◾ *शंकर भाऊ:*
ऐकून आनंद झाला.
आपण गटशिक्षणाधिकारी आहात.

*सुयोगा ताई:*
गटशिक्षणाधिकारी नाही शिक्षण विस्तार अधिकारी. इतर 3 केंद्रप्रमुख आहेत सोबत.

*सुचिकांतजी:*
अभिनंदन 💐💐💐

*सुचिकांतजी:*
एवढ्या मोठ्या पदावर काम करत असून down to earth आहेत केवढ्या ..

*सुयोगा ताई:*
माझा फोकस मुलांकडे असतो कायम.

◾ *सुचिकांतजी:*
तुमची कारकीर्द फुलायला, तुमच्या घरातून तुम्हाला कशाप्रकारे मदत मिळाली?

*सुयोगा ताई:*
मदत अशी नाही पण काही कठीण प्रसंगात मार्गदर्शन आणि कोणत्या गोष्टीला विरोध न करणं ही मदत खूप मोठी आहे

*सुचिकांतजी:*
खरं आहे ..👏👏


*सुयोगा ताई:*
प्रत्यक्ष कामात मदत नाही कारण क्षेत्र वेगळी. मिस्टर राजकारण आणि मी शिक्षण 🙄😊

*सुचिकांतजी:*
अरे वा!

निवेदिता ताई:
हो? अगोबाई!!

◾ *सुचिकांतजी:*
त्यांच्याबद्दल सांगाल थोडं ?

*सुयोगा ताई:*
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आहेत. माहिती अधिकार मानवाधिकार आणि खूप काही.

◾ *सुचिकांतजी:*
🙏 म्हणजे माहिती अधिकारासंबंधी आपल्याला त्यांची मदत मिळू शकते तर 👏

*सुयोगा ज्ञान:* 🙏
🏻केव्हाही सांगा. कुठे काम होत नसलं तर लोकं आमच्याकडे येतात.

*सुयोगा ताई:*
त्यांच्या समाजकार्याचा मला फायदा होतो मी अनेकांची कामे त्यांच्या मदतीने करून घेते. अगदीच तोंडपाठ सगळं

◾ *सुचिकांतजी:*
असो, पुढचा प्रश्न घेतो ..
आज पर्यंतच्या कारकिर्दीत विद्यार्थ्यांबाबतचा मनाला चटका लावणारा आणि मनाला खूप आनंदित करून गेलेला प्रसंग सांगाल का ?

*सुयोगा ताई:*
चटका लावणारे खूप आहेत पण एक सांगते.

माझा एक विद्यार्थी सतत गाणी म्हणणे बेंच वाजवणे असं करत असायचा मे महिन्यात तो काजूच्या झाडावरून पडून गेला आणि हे जूनमध्ये शाळेत आल्यावर कळलं खूप रडलो आम्ही.. आत्ता ही डोळ्यासमोर उभा रहातो तो

*सुचिकांतजी:*
ओह ..

*सुयोगा ताई:*
आनंद देणारे पण खूप आहेत

◾ *सुचिकांतजी:*
एखादा सांगा ना ...

*सुयोगा ताई:*
रिक्षात बसल्यावर एखादा पुरुष म्हणतो बाई आओळखलं नाही का?  मी तुमचा विद्यार्थी बाई तुम्ही मला असं म्हणायचात.

*सुचिकांतजी:*
हा हा हा .. माझे आई बाबा शिक्षक असल्याने मला असे प्रसंग माहिती आहेत ..असे झाल्यावर खासकरून महिला शिक्षक गोंधळून जातात .. 😄

*सुयोगा ताई:*
एक आणखी एक राजापूर सभापती माझी विद्यार्थिनी आहे हे मला एका कार्यक्रमात कळलं.तिने विचारलं ओळख आहे का? मी म्हटले हो!!मी तुमची विद्यार्थिनी आता तिने नाव सांगितले आणि मी ओळखलं ती बॉस आहे आमची!! पण व्यासपीठावर असली तरी उभी राहून नमस्कार करते पायाला हात लावून. कसं भाषण केलं विचारते.. हे माझे भाग्य आहे!!

*सुचिकांतजी:*
मस्तच .. 💐

◾ *सुचिकांतजी:*
माझ्यातर्फे शेवटचा प्रश्न ... नंतर आपण सदस्यांचे प्रश्न घेऊ ..

तुमच्या बीटमध्ये असलेल्या शाळांसमोर इंग्रजी शाळांचे किती मोठे आव्हान आहे? आणि तुम्ही ते कशा प्रकारे हाताळत आहात ?

*सुयोगा ताई:*
माझ्या बीटमधे 2 इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. पण तसं फार आव्हान नाही. हळूहळू कल वाढतोय आपल्याकडे.

*सुचिकांतजी:*
झकास, शिवाय तुमच्या सारखे अधिकारी असल्यावर काळजी नसावी 😎

*सुयोगा ताई:*
मी अधिकारी म्हणून समजत नाही स्वतःला.त्यामुळे खूप दिवस झाले की लोकं विचारतात कधी येता आमच्याकडे.

मी शिक्षिका आहे हे लक्षात घेऊन वागते. त्यावरच मी इथवर आले.

*सुचिकांतजी:*
👍मस्तच.निवेदिता ताई, विचारा ...

◾ *निवेदिता ताई:*
आपल्या आजवरच्या प्रदीर्घ वाटचालीत शिक्षण क्षेत्रातल्या काही गोष्टी खटकल्या असतीलच ज्या करता पूर्ण system change करणं जरूरी आहे असं वाटतं. अश्या वेळी त्यावर तोडगा कसा काढला / काढता? 'व्यवस्थेशी लढा' कसा दिलात?

*सुयोगा ताई:*
छान.. बर्‍याचदा अधिकारी यांना काही माहिती नसतं ते उगा काहीतरी बोलत असतात. खास करून मुलांच्या बाबतीत.. मी स्वतः वर्ग ताब्यात घेतल्यानंतर मुलांची अभ्यासाची चाचणी घेऊन त्यानुसार शिकवायचे म्हणजे कोणि म्हटलं की मुलांना येत नाही तर वर्गात आला तेव्हा काय आणि आत्ता काय हे लिहिलेलं त्यांच्या पुढे ठेवलं की आवाज बंद होतो.. तेच मी माझ्या शिक्षकांना सांगते

अभ्यासक्रम किंवा अध्यापन पद्धती हे बदलणं आपल्या  हातात नाही पण शळेपुरता विचार केला तर असं वागलं की आपल्याला *चांगल* ओळखतात😀 त्यामुळे बोलून घेण्याचे प्रसंग अजिबात नाही.

◾ *सुचिकांतजी:*
👌... वृषाली ताई विचारा ..

*वृषाली ताई:*
अत्यंत गाजलेल्या नाटकांमधुन हौशी कलाकार म्हणुन काम करताना चा अनुभव कसा वाटला?
तिथे मिळालेला व्यावसायिक अनुभव कसा होता?

2}——निवृत्तीनंतर "बालरंगभुमी" साठी नाट्यलेखन करायची इच्छा किंवा तसे नियोजन आहे कां?

*सुयोगा ताई:*
खूपच छान.. दुःखातही तालमी आठवून आठवून हसू येतं त्याबद्दल मोठ्या प्रमाणात लेख लिहावे लागतील.

बालरंगभूमी म्हणजे मुलांसाठी काहीही करायला मी तयार आहे. म्हणजे मी फक्त वेळ देऊ शकेन आत्ता  तरी!! आवडेल खूपच.

◾* मृणाल...मृण्मयी:*
कोणती सृष्टी आवडते..नाट्य कि चित्रपट

*सुयोगा ताई:*
अर्थात नाटक.

*मृणाल...मृण्मयी:*
👍डॉ.सरोळकरांकडे भेट झाली तेव्हा मी पाहिलं आहे तुम्ही प्रत्यक्ष मुलांचे अगदी बारीक निरीक्षण करून खूप हसत होतात. रमला होतात त्यांच्यात👍

◾ *वृषाली ताई:*
especially.....आई रिटायर होतेय...चा अनुभव बाल..गोपालांसाठी...तुमचं मन ओढ घेतं हे विशेष!👍🙏🏾

*सुयोगा ताई:*
त्यात मी मुलगी झाले होते माझे भाऊ जे प्रत्यक्षात अविवाहित होते ते आपल्या बहिणीच्या बाळंतपणासाठी कसं वागतात हे सगळं त्यांना आणि आम्हाला हसण्यासारखं वाटे नाटक गंभीर पण आम्ही हसायचो आणि दिग्दर्शक शिव्या घालायचे.

◾ *सुचिकांतजी:*
- "करियरमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने विचारलेला अंतर्मुख व्हायला लावणारा प्रश्न कुठला?"

- "गरीब पण असामान्य बुद्धिमत्तेच्या मुलांना तुम्ही काय सल्ला देता/मदत करता?"
------ सुशील सोनार

*सुयोगा ताई:*
मी परवाच एकदा सांगितले की उच्चार किंवा आचार यावरून आम्ही मुलांना सांगतो आदर्श वागा पण काही वेळा आमच्या कडून जर तसं घडत नसेल तर नक्कीच मुलं विचारतात आणि काही बोलू शकत नाही आपण उदा. तंबाखू खाऊ नये.. मग ते गुरूजी का खातात?  काय बोलणार??

*वृषाली ताई:*
आव्हानच हे!

*सुचिकांतजी:*
हो ना ..

*सुयोगा ताई:*
मी नेहमीच मुलांना सांगते कपडे पैसे हे कधी ना कधी आपल्याला सोडून जातात पण विद्या नाही.

*मृणाल...मृण्मयी:*
कठीण होत असेल अशा वेळी सामोरे जावे

*सुचिकांतजी:*
खूप छान समजावता ...

*सुयोगा ताई:*
अर्थात हे त्यांना उदाहरणे देऊन सांगायला लागत.

◾ *सुचिकांतजी:*
माझे आई बाबा प्राथमिक शिक्षक असल्याने या क्षेत्राची थोडीफार माहिती आहे.त्या अनुषंगाने हे विचारायचं होत की शासकीय प्राथमिक शाळा या Z P मार्फत चालवल्या जातात,इथे शिपाई,लेखनिक वगेरे लोक नसतात.सगळी कामे त्या शिक्षकास करावी लागतात.अगदी शालेय पोषण आहाराच्या (ग्राम मिलिग्राम मध्ये असतात)नोंदी,मुलांच्या शैक्षणिक प्रगती नोंदी,वगेरे वगेरे सगळं.हि सगळी काम करायची,वर वेगवेगळ्या गणना असतात,निवडणुका असतात,त्याची कामं करावी लागतात.हे सगळं करत शैक्षणिक कार्यासाठी मुलांना वेळ द्यावा लागतो.त्यात हल्लीच्या खासगी शाळा वगेरे मुळे क्रीम लेयर सगळा तिकडे तर गरीब,कष्टकरी,जेमतेम परिस्थिती असलेल्या घरातील मुलं आपल्याकडे येतात.ज्यांच्या मागच्या पिढ्यांमध्ये शिक्षणाबाबतीत उदासीनता दिसून येते.अश्या वेळी बऱ्याचदा शिक्षण तरीही उठावदार काम करतात.(माझे आई वडील शिक्षक असल्याने त्यांच्या पातळीपर्यंतच्या अडचणी व उपाय मी समजून घेऊ शकतो)

या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही एक केंद्रप्रमुख म्हणून कोणकोणत्या अडचणींना सामोरं जाता.एक वर्ग सांभाळताना तारेवर कसरत करणारा शिक्षक पाहिलाय,असे संपूर्ण केंद्र सांभाळणारा केंद्रप्रमुख कोणत्या अडचणींतून जातो.?
- स्वप्नील पाटील

*निवेदिता ताई:*
ग्रामिण व निमशहरी भागातलं चपखल वर्णन 👍🏻

*सुयोगा ताई:*
शिक्षकांना motivation देणं हेच काम कठिण आहे. पण multitasking हे आपण करत असतो. आई पोळ्या करताना गाणं म्हणेल मधेच मुलाचा अभ्यास घेते मधेच भाजी ढवळते बाबाशी बोलते
शिक्षकांकडे खूप साहित्य असेल आणि कल्पकता असेल तर ते अजिबात ओझं वाटत नाही

आत्ता ज्ञानरचनावाद हा उत्तम उपाय आहे त्यावर!! केंद्रप्रमुख हा मृदंग आहे. प्रशासन शाळा शिक्षक पालक सगळेच बडवतात😀

शापोआहारासाठी अॅप आहे. त्याचा वापर करून त्वरित हिशेब मिळेल

*माधुरी ताई:*
सगळे बडवत नाहीत तर कें. प. मुळे सगळे तालावर राहतात मॅडमजी😊😊🙏🏻

◾ *मृणाल...मृण्मयी:*
या खुर्च्यांना काटे आहेत असे म्हटले जाते हे कितपत खरे?

*श्रुती पानसे ताई:*
खराय प्रश्न..

*सुयोगा ताई:*
मला नाही टोचत कधी मृणाल..  कारण ते काटे बाजूला ठेऊन बसणं हे महत्वाचे.. काट्यावाचून गुलाब नसतो ना..

*मृणाल...मृण्मयी:*
मस्त!!

◾ *सुचिकांतजी:*
शिक्षण कुठे झालं? शाळेतले अनुभव कसे होतो? त्या अनुभवांचा उपयोग नोकरीमध्ये करता आला का? एखादा किस्सा?----- श्रुती पानसे

*सुयोगा ताई:*
शिक्षण ७वी पर्यंत जिप शाळा. नंतर 8 ते 11 राजापूर हाय.

*श्रुती पानसे ताई*:
वाह.. जि.प. शाळा.

*सुयोगा ताई:*
आम्ही 9 भावंडं आहोत खोली घेऊन जेवण स्वतः करुन शिकलो 8 वी पासून12 वी खारेपाटणला पेईंग गेस्ट
मी 8 नंबर भावंडात. इयत्ता 8वीत जाईपर्यंत पायात चप्पल घातलेली नाही.. भावंडांच्या जुन्या वस्तू वापरणे.. दिलेल्या पैशातच महिना काढणे हे सगळं तेव्हा केलंय.

*सुचिकांतजी:*
निःशब्द 🙏💐

*मृणाल...मृण्मयी:*
तावूनसुलाखून निघालेले हिरे💐💐🌹🌹🌹

*सुयोगा ताई:*
याचं वैषम्य नाही किंवा कळलंही नाही की हे बरोबर/चूक कारण नाइलाज. हे सांगितलं की माझी मुलं भावनाविवश होतात.

*सुचिकांतजी:*
होणारच .. आम्ही देखील झालो आहोत.

*निवेदिता ताई:*
खरंय ... multi tasking ...

◾ *सुचिकांतजी:*
मग आमची पिढी खूपच भाग्यवान आहे . पुढचा प्रश्न घेतोय ....
प्रगत शैक्ष.महाराष्ट्राबद्दल काय सांगाल? -------- माधुरी देशपांडे

*सुयोगा ताई:*
प्रगत शैक्ष. महाराष्ट्र आले आणि शाळा शिक्षक बदलले. गुणवत्ता वाढली हे नक्की.

◾ *सुचिकांतजी:*
पहिल्या धोरणात आणि यात काय फरक होता ?

*सुयोगा ताई:*
शैक्षणिक क्षेत्रात वरपासून खालपर्यंत एका पातळीवर सर्व काम करू लागले.

*वृषाली ताई:*
अजि आज कैसा जाहला की "सुयोग"....हे खरं केलंत,सुयोगाताई....

◾ *सुचिकांतजी:*
की इथे क्लोज monitoring झाले ?

*श्रुती पानसे ताई :*
फरक शिक्षकांमध्ये की धोरणांमध्ये?

*सुचिकांतजी:*
हो तेच विचारायचं होतं मला .. शिक्षक - धोरण - की execution आणि moniroting ?

*सुयोगा ताई:* 
हो नक्कीच.. तुम्ही करा च्या ऐवजी आपण करूया.. तुम्ही करू शकता हा फरक वाटला मला.

◾ *प्रभू खाडीलकर:*
सुयोगाताई, आपण केवळ शिक्षिका नाही, आपण उत्तम टंकलेखन करू शकता.
साधी राहणी व उच्च विचार ही आपली विशेषता म्हणावी लागेल.

आपण रंगभूमीवर सहजतेने वावरू शकता. त्यात आपले बालरंगभूमीवरचे प्रेम पाहून वाटले की आपली मला या समूहाच्या चर्चेतून झालेली ओळख फार अपुरी होती.

हा माझा प्रश्न नाही, केवळ माझे मत. पाहिजे तर त्याला अभिप्राय म्हणा.

तरीही विचारू ?

1) आपण लिहीले आहे तसे नोकरीच्या उरलेल्या 4 वर्षात वेगळे काहीतरी करणार आहात. त्याचे स्वरूप काय असेल?

2) तुम्ही म्हणता तसे अभ्यासक्रम न अध्ययन पध्दत बदलता येत नाही असे आपणास का वाटले? तसे असेल तरी आपण त्यात थोडा बदल यापुढे करून  त्यातून मुलांच्या कौशल्ये व क्षमता वाढविण्यासाठी काही करू शकाल असे मला वाटते.

उर्वरीत कार्यकालातील उत्तम कामासाठी शुभेच्छा.

*सुयोगा ताई:*
हो.. काका मला काहीतरी करायला आवडेल म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने आणि मी ठरवलेलं की निवासी शाळा काढायची.. कारण शाळेत शिकवत असताना संध्याकाळ झाली तरी आम्हा दोघींना आणि आमच्या मुलांना घरी जावंसं वाटेना.. त्यातून कल्पना आली की असं काहीतरी करूया..  मुलांना सुसंस्कृत सुसंस्कारित बनवूया.. पण ती कल्पना सत्यात उतरणं जरा अवघड आहे.. कारण आर्थिक बाजू कशी पूर्ण होणार?  पण संधी मिळाली तर नक्की इच्छा आहे. 🙏🏻

◾ *माधुरी ताई:*
ज्ञानरचनावाद सगळ्यांना उमजला .व शिक्षक खरंच सुलभक झालाय. बरोबर ना ताई?

*सुयोगा ताई:*
अजिबात नाही..* माणूस* जुनं सोडायला तयार नसतो.  बरेच लोक हर्बार्ट पंचपदी घट्ट धरून आहेत. त्यांच्या पचनी पाडणं आव्हान!!

*सुचिकांतजी:*
😄👍 खरंय ..

◾ *सुचिकांतजी:*
गाण्याची आवड आहे तर शास्त्रीय पण शिकलात का? - माधुरी देशपांडे

*सुयोगा ताई:* 
नाही.. इथे सोय असती तर नक्कीच.. माझे वडिल भजनं म्हणायचे..  सगळे भाऊ गाणी म्हणतात हार्मोनियम तबला वाजवतात.

◾ *सुचिकांतजी:*
ISO/शाळा सिध्दी/लोकवर्गणी यासारखी कामं करत असताना
शिक्षकांना खरच खूप कष्ट उपसावे लागतात.
वरिष्ठ कार्यालयाकडून तुम्ही कशी साथ देता.
--  शंकर पाटील

*सुयोगा ताई:*
ISO च्या वाटेला जायचं नाही हे मी नक्कीच ठरवलेलं आहे.  शाळा समृद्धी लोकवर्गणी इथे मी पालक सभेला किंवा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी जाऊन पालकांना समजावून सांगते.

◾ *सुचिकांतजी:*
ISO का नको असं वाटतं तुम्हाला ? काही ठिकाणी मी ऐकलं की, शिक्षकांना ISO साठी बरच दडपण आणत आहेत ..

*सुयोगा ताई:*
मोठमोठ्या लोकांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार करायचा आणि 100 रुपयांची शाल देऊन 10000 मिळवायचे हा फंडा कधीकधी वापरायचा.

◾ *निवेदिता ताई:*
आत्तापर्यंतच्या उत्तरांवरून एक लक्षात आलं की सुयोगाताई सगळ्या प्रश्नांनी नेमकी, मोजक्या शब्दात उत्तरं देतायत. आणि तरीही आशयपूर्ण उत्तरं आहेत.Brevity यालाच म्हणतात. वाह
सुयोगाताई .. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

*सुयोगा ताई:*
🙏🏻🙏🏻लाजवू नका.

◾ *सुचिकांतजी:*
अजून कोणती कारणे वाटतात iso ला नको म्हणायची ?

*सुयोगा ताई:*
आमच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचा विरोध आहे कारण 20000 रूपये असतिल तर ते कठीण नाही.

◾ *सुचिकांतजी:*
अच्छा ..

*सुयोगा ताई:*
मुलांना येणं/गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचं.. भौतिक गोष्टीत अडकणं नाही.

*सुचिकांतजी:*
👍👍👍

◾ *शंकर भाऊ:*
इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील या झगमगाटालाच पालक भूलतात की!!

*सुयोगा ताई:*
तो फार वेळ नाही टिकणार आता डोळे उघडले आहेत.

*स्वप्नील पाटील:*
प्रत्येक शाळा,तिथले शिक्षक ज्या परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करत असतात तेथील मुलं, पालक व त्या गावाचे कौतुकाचे शब्द iso मानांकित असतात शिक्षकांसाठी..

*सुचिकांतजी:*
खरं आहे स्वप्नील 👍 पुढचा प्रश्न घेतो .. संदर्भात प्रश्न वर येऊन गेलेला आहे .. तरी तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल ...

सध्याची पिढी ही नाटकांच्या पासुन दुर जात आहे ? आसे आपणांस वाटते का ? - राहुल कोल्हटकर

तसेच महाविद्यालयातील आणि शालेय नाट्य किंवा एकांकिका स्पर्धाच्या माध्यमातून आपण पुन्हा नाट्यसंस्कृती आणि आपली मराठी भाषा समृद्ध करु शकतो का ? आपले मत.

राहुल स्वतः मनसे कार्यकर्ता आहेत, शिवाय तुमच्या घरात मनसे पदाधिकारी असल्याने, मराठीसाठीची राहुलची तळमळ तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने जाणवेल ..

*सुयोगा ताई:*
हो नक्कीच..टीव्ही आणि मोबाईल अतिरेक हेही कारण आहे एक..मी मालिका बघत नाही.
शाळेत पण मुलं रेकॉर्ड डान्स करण्यासाठी उत्सूक असता
आपण हे नक्कीच करु शकतो नियोजनपूर्वक केलं तर..

मनसेच्या माध्यमातून एकांकिका स्पर्धा घ्या.. सगळीकडे क्रिकेट शिवाय बात नही.. स्पर्धा ही सुरुवात असेल

◾ *सुचिकांतजी:* 
गोपाल कपाटे बुवांचा एक प्रश्न आला आहे ..ताई तुम्ही हा शिक्षणाचा महामेरु वागवत असताना आयुष्यात असा काही प्रसंग कोणता आला का ? की बुध्दी व ह्रदय समोरासमोर उभे राहीले ?
आला असेल तर तुम्ही कशाला प्राधान्य दिले बुध्दी की ह्रदयाला

जर कधी आला तर कशाला प्राधान्य द्याल ----- गोपाल कपाटे

*सुयोगा ज्ञान:* 
कठिण आहे सांगणं पण मी बॅलन्स व्यक्ती आहे म्हणून मी सुवर्णमध्य काढते.फक्त बुद्धी किंवा मन असं नाही..

◾ *राहुल कोल्हटकर:*
👍🏻👏🏻 धन्यवाद ताई पण शालेय शिक्षणासोबतच सध्या विविध शाळा ह्या विद्यार्थी यांना खर्चीक प्रोजेक्ट बनविण्यासाठी सांगतात त्यांने पालक वर्ग नाराज / वैतागून गेला आहे ? शाळांनी असे करणे आपणांस योग्य वाटते का ?

*सुचिकांतजी:*
हे इंग्रजी माध्यमात होते राहुल ..

*सुयोगा ताई:*
सुयोगा ज्ञान: ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आम्ही नाही.. प्रकल्प करण्यामागे त्यांनी कसा सुशोभित केला हे बघणं नसतं तर मुलांना निरीक्षण योग्य रीतीने मांडणी हे कळणं आणि स्वतः करण. पालकांनी सतर्क राहून विरोध केला पाहिजे पण पालकांची चढाओढ लागते.. बरोबर ना?

◾ *सुचिकांतजी:*
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) च्या सदस्या आहात का?
त्या अंतर्गत कोणकोणत्या उपक्रमात सहभागी होतात
- मृणाल पाटोळे

*सुयोगा ताई:*
डाएट चा स्टाफ वेगळा असतो. पण ते शैक्षणिक गुणवत्ता संदर्भात कोणतेही उपक्रम राबवू शकतात. ते शिक्षणाधिकारी यांनाही आदेशित करू शकतात

*मृणाल...मृण्मयी:*
अच्छा!!

*सुयोगा ताई:*
त्यांच्या कोणत्याही उपक्रमात आम्ही असतोच.

*सुचिकांतजी:*
१० मिनिट नेहमीप्रमाणे मुलाखत लांबेल .

*सुयोगा ताई:*
👍🏻👍🏻चालेल

◾ *सुचिकांतजी:*
कोकण बोर्डाची स्थापना झाल्यापासून कोकण राज्यात अव्वल येत राहिल्याचा इतिहास आहे. तेथील यंत्रणा यासाठी काही विशेष प्रयत्न करते का ?
कोकण पॅटर्न असा काही आहे का ? - अमेय गोखले

*सुयोगा ताई:*
महत्वाचे म्हणजे कॉपीमुक्त अभियान राबविण्याची गरज कोकणाला नाही. अत्यंत प्रामाणिक आणि 35% मिळाले तरी स्वकष्टाचे हा खरा कोकण पॅटर्न आहे.. मला समजलेला.... त्यामुळे परीक्षा पद्धत बदलली तरी आमच्या मुलाला फरक नाही

*सुचिकांतजी:*
छान 

*वृषाली ताई:*
"मुलाखत रंगणे"..म्हणजे काय!..ते अनुभवले.

*राहुल कोल्हटकर‬:*
ताई आपली इच्छा पुर्ण होणार 👍🏻👏🏻

*सुयोगा ताई:*
अभ्यासक्रम बदलता येत नाही पण अध्यापन पद्धती बदलण्याचा मी प्रयत्न करत असते.

*सुचिकांतजी:*
खूप छान ..

*निवेदिता ताई:*
ती मुलं फार भाग्यवान असतील

◾ *सुचिकांतजी:*
एक प्रश्न विचारु ?

*सुयोगा ताई:*
हो!!

*सुचिकांतजी:*
तुमची भाषा लय गॉड हा..आमकां आवडता.आमकां शिकवशाल??

*निवेदिता ताई:*
लगेच नवा विद्यार्थी मिळाला हो

*सुयोगा ताई:*
हो केव्हाही.. माझ्या सासरी आणि माहेरी वेगवेगळ्या भाषेत /बोलीत बोलतात.. सासरी मालवणी आणि माहेरी साधारण संगमेश्वरी😀😂😎

◾ *सुचिकांतजी:*
😆😂 आता शेवटचा एकदम जब्रा ....

तुम्ही ज्यावेळी शिक्षण क्षेत्रात आला तेव्हा तुम्हाला वाटल होत का की एक दिवस, ज्ञानभाषा मराठी मध्ये तुम्हाला मुलाखत द्यायची संधी मिळेल?

*स्वप्नील पाटील:*
कॉमेडी मोमेंट्स विथ ज्ञानभाषा मराठी...

*निवेदिता ताई:*
अरे वा!!

*सुयोगा ताई:*
नाही.. टेन्शन आलं होतं.. पण जमलं असं वाटतं.. जमलं ना? * पहिली मुलाखात है ये गाणं आठवलं🙄🙄

हल्ली शाळेत मुलं मुलाखत घेतात तेवढाच काय तो सराव 😀😀🤗🙏🏻🙏🏻

*निवेदिता ताई:*
जम्या!!

*स्वप्नील शिंगोटे:*
खुप छान झाली मुलाखत 👍🏾👏🏼👌🏽

*सुयोगा ताई:*
धन्यवाद.. काही चुकलं असेल तर🙅🏻

*सुचिकांतजी:*
खूप मनमोकळेपणाने उत्तरे दिलीत ताई .. 🙏💐

*डॉ अमेय:*
खूप छान ! 👌🏻💐

*सुयोगा ताई:*
प्रश्न विचारण्याचे कौशल्य चांगले आहे सर्वांचे आणि सर्व प्रश्न मुक्तोत्तरी. 😀

*माधुरी ताई:*
👏🏻👏🏻👍🏻मस्त आज तिसऱ्या रत्नाची प्रभा फाकली.लयच तेजस्वी👌🏻👌🏻

*प्रीती एरंडे:*
अप्रतिम मुलाखत , अचुक प्रश्न व प्रत्येक प्रश्नाला सुयोग्य उत्तर.

*मृणाल...मृण्मयी:*
ताईंना भेटल्यावर कळतं.. साधी राहणी आणि उच्च विचार!!

*शंकर भाऊ:*
उत्तरे देण्याची खूप छान कला👍🏽

*वृषाली ताई:*
after all you are stage artist...you know......
उत्स्फुर्तपणा असणारच!

*मृणाल...मृण्मयी:*
सुयोगा with सुयोग्य ans

*वृषाली ताई:*
मी सकाळीच म्हटलं ना...
राजापुरचे निर्मळ वारे!
सुखद केले "कुटुंब" सारे!
...कोकणकन्या ,भारीच👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼

*मृणाल...मृण्मयी:*
माझी आणि ताईंची 2 वेळा भेट झाली आहे. त्या जशा बोलतात अगदी तशाच आहेत.खूप खेळकर आणि शांत आणि मनमिळावू🙏

*सुचिकांतजी:*
मी कोकणात गेलो की त्यांना आवर्जून भेटणार आहे ..

*मृणाल...मृण्मयी:*
नक्की भेटा!!

*काळपांडे काका:*
मस्तच झाली मुलाखत. प्रश्नाचा गाभा लक्षात घेऊन नेमक्या शब्दांत दिलेली सुयोग्य उत्तरे. असे शिक्षक आणि असे विद्यार्थी असल्यावर कोकण बोर्ड अव्वल नसेल तरच नवल! किती स्पष्ट कल्पना आहेत,आपल्या कामाबद्दल, शिक्षणाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल!

*वसंत देशपांडे सर:*
अगदी मनातल बोललात काळपांडेसाहेब.

*किरण बोडके*:
एवढी चर्चा / मुलाखत आज पर्यंत मी फक्त टीव्हीवरच बघितली आहे. व्हाट्स ऍप वरही असे काही होते हे मला आज कळाले. खूप काही शिकायला भेटेल मला तुमच्या कडून. मृणाल ताई धन्यवाद मला ह्या ग्रुप मध्ये घेतल्या बद्दल...आणि सुयोगा ताईंनी जवळ जवळ सर्व प्रश्नांची मस्त उत्तरे दिलीत.👌👍

*प्रसाद सिनकर*:
छान झाली मुलाखत जठार मॅडम👍🏼

◾ *सुचिकांतजी:* *#माळ_स्त्रीसामर्थ्याची* या उपक्रमात आज  आपण *सौ. सुयोगा जठार*  यांच्याशी संवाद साधला. अजूनही अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत .. पण वेळेअभावी आपण घेऊ शकलो नाही... आपल्याकडे दैनंदिन चर्चा चालू असतात अशा वेळी, असे प्रश्न विचारू शकता ...

◾ *सुयोगा ताई:*
धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!!! सर्वांना.. 💐🙏 *काळपांडे काका* तुमची प्रतिक्रिया म्हणजे मोठ्ठा पुरस्कार आहे माझ्यासाठी🙏🏻🙏🏻🙏🏻

     *॥ज्ञानभाषा मराठी॥*
*॥माझी शाळा 📚 माझी भाषा॥*

No comments:

Post a Comment