ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Monday, October 17, 2016

माळ स्त्रीसामर्थ्याची - माळ दुसरी

*नमस्कार!!*

मानवी जीवनात रंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच की काय जगण्यात हि अनुभवांच्या रंगांची बरसात आहे!!हे अनुभवरूपी रंग आपल्या जाणीवा समृद्ध करतात. आयुष्यातील या रंगांना आपलसं करूया आणि भरभरून आयुष्य जगू या!!!

*🌹आजचा रंग: नारिंगी*

हा रंग  ऊर्जेचा,शक्तीचा,साहसाचा,आरोग्याचा,शुद्धतेचा,धैर्याचा आहे.

🌹 *या रंगाचे वैशिष्ट्य घेऊन येणारी आजची दुसरी माळ गुंफुया!!*

⚡ *दुसरी माळ स्त्री-सामर्थ्याची*⚡

⚡ *डॉ.प्रज्ञा शरद देशपांडे*⚡

*परिचय:*

*हडस हायस्कुल व.क.मा.वि.* येथे १९९९ पासून कार्यरत आहेत. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी शासनाच्या विविध उपक्रमांतर्गत संस्कृत प्रचार व प्रसाराची महत्त्वाची भूमिका उत्तम रीतीने पार पाडली. त्यांची *संस्कृतोपयोगी आठ पुस्तके* प्रकाशित झाली असून त्या अनेक *राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्कृत सम्मेलनात* सहभागी होत असतात.

◾ विदर्भ प्रांत विद्याभारती संस्थेची संस्कृत विभाग प्रमुख

◾संस्कृत भवितव्यम् ६५वर्षे जुने एकमेव संस्कृतसाप्ताहिकाची *प्रबंधक संपादिका*

◾विविध नियतकालिकांतून मराठीतून स्तंभ/स्फूट/ ललित/ वैचारिक लेखन

◾अभ्यासक्रम आराखडा समिती सदस्य
संस्कृत अभ्यास मंडळ सदस्य

◾आसन-प्रविण

◾प्रचलित संयुक्त संस्कृत इयत्ता १० च्या क्रमिकपुस्तकाची संपादक मंडळ सदस्य.

◾मराठी कविता ( स्वांत: सुखाय) करते.कधी कधी

◾एम ए - पाली, सुवर्ण पदक
◾एम ए - संस्कृत,  द्वितीय क्रमांक
◾ बीएससी - बायोकेमिस्ट्री
◾बीए - मराठी आणि इंग्रजी
◾ बीएड - डीएसएम
◾पीएचडी - संस्कृत

◾ *सुचिकांत:*
सर्वांना नमस्कार, आज आपण #माळ_स्त्रीसामर्थ्याची मध्ये डॉ. प्रज्ञा देशपांडे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
तुम्हा सर्वांचं या मुलाखतीत मी सुचिकांत मनःपूर्वक स्वागत करतो..
@प्रज्ञा ताई, चालू करू शकतो का मुलाखत आपण ?

◾ *डॉ.प्रज्ञा देशपांडे*
होय

◾ *सुचिकांत:*
प्रज्ञा ताई, सध्या कोणत्या लेखावर काम करत आहात?

◾ *डॉ.प्रज्ञा देशपांडे*
आताच हातावेगळा केलाय

◾ *सुचिकांत:*
कोणता विषय ?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
*संसर्ग* नावाचा

◾ *सुचिकांत:*
अच्छा ... त्याबद्दल थोडं सांगाना ..

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
सकारात्मकता वा नकारात्मकता ही संसर्गजन्यच असते . जो ज्या भावनेने जगतो त्याला तसेच दिसते आजूबाजूला
अश्या प्रकारचा  आहे.

◾ *सुचिकांत:*
तर प्रज्ञा ताई, तुमचा शाळेबद्दल थोडं सांगा .. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल ..

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
माझी भावंड घराजवळच्या मुलं मुली असलेल्या शाळेत होती पण मला खास मुलिंच्या शाळेत *लोकांची शाळा* मध्ये टाकलं कारण हस्तकला / गायन असे विषय होते

◾ *सुचिकांत:* लोकांची शाळा
हे शाळेचं नाव आहे का ?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
होय  हेच नाव आहे
लोकशिक्षन संस्थेद्वारे संचालित
*नितिन गडकरी* माजी विद्यार्थी

◾ *सुचिकांत:*
शाळेत असताना तुमचे सर्वाधिक आवडते आणि नावडते विषय कोणते? काही गमतीदार किस्से सांगाल?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
गणित  चित्रकला

◾ *सुचिकांत:*
चित्रकला - आवडत नाही ?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
सगळ्या मुलींनी क्लास लावला म्हणून मी पण लावला ६वीत .कोणाकडए तर क्रीडा शिक्षकांकडे कारण ते जे शिकवायचे म्हणजे लिहून द्यायचे तेच पेपरात यायचे
येतच नाही म्हणून

◾ *सुचिकांत:*
गणित आवडता असून मग संस्कृतकडे कधी वळलात ?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
गणित नावडता

◾ *सुचिकांत*
म्हणजे दोन्ही नावडते मग आवडायचे कोणते ?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
इतिहास  भूगोल मराठी अतिशय आवडते

◾ *सुचिकांत*
संस्कृत ?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
संस्कृत शाळेत तितके नाही आवडायचे जरी जास्त गुण मिळायचे

◾ *सुचिकांत*
मग संस्कृतची गोडी कधीपासून निर्माण झाली?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
मराठीत १०वीला DT होतं

◾ *सुचिकांत*
DT म्हणजे ?
अच्छा .. Distinction

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
BSc नंतर

◾ *सुचिकांत*
असा कोणता प्रसंग घडला ज्यामुळे तुम्ही संस्कृतकडे झुकला ?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
मला रसायनशास्त्रात पुढे शिकायचे होते.पण प्रवेश मिळाला नाही. बॉटनीत शिकायचे नव्हते
फस्ट इअर पासून आईला संस्कृत ट्युशन घेण्यात मदत करत होती
कमवा शिका असेच.
एकदा *पंडित गुलाम दस्तगीर यांची* भेटझाली

◾ *सुचिकांत*
अच्छा ..
त्यांच्याबद्दल बरेच ऐकले आहे ..

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
त्यांनी *रामकृष्ण* काव्यातील एक श्लोक सांगितला
त्याच वेळी *पेन्ना* सरांनी *नारसिंहकाव्याबद्दल* माहिती दिली

◾ *सुचिकांत* अच्छा ..

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
त्या काव्यातून चार अर्थाच्या वेग वेगळे कथानक ( ૪ट्रॅक सारखा) असतात. चार ओळींचे श्लोक आडवे दोन
उभे दोन असे वाचन करून  ते काव्य असते.
त्यांच्या चर्चेतून कळले भाषेचे सामर्थ्य .
मग वळले

◾ *सुचिकांत*
झकास ..
तुमच्या स्वभावाचा कोणता पैलू तुम्हाला सर्वात जास्त आवडतो आणि का? त्याचा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कशाप्रकारे फायदा झाला?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
अवघड आहे पण
मला *लोकसंग्रह* आवडतो.
कार्यकर्ता म्हणून जगायला आवडतं .
मला त्रास झाला तरी चालेल पण माझे कार्य व लोकं तुटू नये असा प्रयत्न असतो.
त्यामुळे मी *पालि भाषा* अभ्यासू शकली
अरेबिक/ फार्सी भाषकांमध्ये वावरू शकते

◾ *सुचिकांत*
ते कसं ?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
मी पालि एम्ए करत होते.

◾ *निवेदिता खांडेकर*
पालिमुळे? अरे वा ... हे नवीन

*डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
तेव्हा देशपांडे अन् संस्कृत शिकलेली म्हणून सर्व प्राध्यापक नि विद्यार्थ्यांना  अप्रूप होते.
बरेचदा ते माझ्या जातीचा/ संस्सकृतचा उद्धार करायचे.
कुठून प्रवेश घेतला असं सुरुवातीला वाटले

◾ *सुचिकांत*
ओह ..
मग यावर कशी मात केलीत?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
पण मग सरळ सगळ्यांशी बोल ली .
त्यांना माझी शिकण्याची आवड लक्षात आली
आता माझे सगळे मित्र मैत्रिणी आहेत.
अजूनही उद्धार करतात पणमग म्हणतात *आपको नही वो बाकी लोगोंको* बोला
आप जैसे नही रहते सब.😂

◾ *सुचिकांत*
मस्त ..
आता यापुढे आपण एक एक करून सदस्यांचे प्रश्न घेऊया ..

◾ *निवेदिता खांडेकर*
माझे दोन प्रश्न आहेत ...
एक ...  बि एस् सी तेही बायोकेमिस्ट्री. मग गाडी संस्कृत कडे कशी वळली?
(थोडा उल्लेख वर आलाय ... पण जरा सविस्तर उत्तर चालेल)

*डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
अग संसकृतच्या ट्युशन जोरात चालायच्या १०० विद्यार्थी.
सकाळी ५.३० ते रात्री १०
इयत्ता ५ ते एम्ए पर्यंत सगळे शिकवायची
मग प्रॅक्टिकलवाले विषय जमणार नव्हतेच.
मग वळली संस्कृत कडे.

◾ *निवेदिता खांडेकर*
अच्छा
दुसरा प्रश्न
आम जनते मध्ये सहजपणे संस्कृत बोलून पण काम साधता येईल असा दिवस किती जवळ वा दूर आहे असं वाटतं?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
सरकारी भरोश्यावर अशक्य आहे
संस्कृतभारती काम करतेय.
सगळे बोललेच पाहिजे असे नाही पण अनुरागी असावेत.
भाषा श्रीमंत आहे संमृद्ध आहे

◾ *सुचिकांत*
एवढे सगळे शिक्षण कॉलेजला जाऊन केले की बहिस्थ म्हणून?
पाली शिकताना काही विशेष वाटलं का?
वेळेचे नियोजन कसे केले?
*- सुयोगा जठार*

*डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
कॉलेजात नियमित नाही गेले. पालि मात्र नियमित केले
बाकी बहिस्थ

◾ *सुचिकांत*
पाली शिकताना काही विशेष वाटलं का?
वेळेचे नियोजन कसे केले?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
मला नवं नवं शिकायला आवडतं , त्यातही भाषाशास्त्र .
आवड असेल तर सवड निघते.
पालि भाषा संस्कृत- मराठी मधला दुवा वाटली मला.
पाली शिकल्यामुळे ११ वी १२ वी मराठी शिकवतांना फायदाच झाला.
*संस्कृत* >   *पालि* >   *मराठी*
  कर्ण      >   कण्ण  >   कान
  पर्ण       >  पण्ण    >   पान
  वर्ण       >  वण्ण    >   वाण
  लवण    >  लोण    >    लोण
  मयूर      >   मोर    >    मोर
   चौर.     >  चोर     >    चोर

◾ *सुयोगा जठार ताई*
विपश्यना केली तेव्हा काही शब्द ऐकले होते

◾ *सुचिकांत*
छान ..
वेळेचे नियोजन कसे केले?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
घरच्यांनचे सहकार्य म्हणून जमले
नियोजन वगैरे नाही केले जे समोर आलं ते स्वीकारलं

◾ *निवेदिता खांडेकर*
जैन लोकांची 'अोम णमो अरी हंतानम्' ही पाली भाषेतली प्रार्थना काय?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
ती अर्थमागधी

◾ *निवेदिता खांडेकर*
बरं

◾ *सुचिकांत*
महाराष्ट्री प्राकृत असायची शक्यता जास्त .. त्यांचं बहुतांशी साहित्य महाराष्ट्री प्राकृतमधून आहे . बोलू नंतर ..

*डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
पालिला शिकवायला *जैनसर* होते .ते ૪ विषयात पिएच्डि अन  ३ विषयात डिलिट आहेत.
त्यांच्यामते *णमो....* अर्धमागधी आहे.

◾ *सौ. प्रमिला नजन*
अभ्यासक्रम आखताना मुलांची बुद्धिमत्ता
व अभ्यासक्रम  यांची सागड कशी घातली जाते ?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*  
आपल्या कडे सांगड घातली जाते कां?? मला नाही वाटत. उलट पैसे मिळवून देणारे / ग्लॅमरचे विषय थोपवले जातात.
मी खरच खुप भाग्यवान् आहे .
मला खुपच थोर मंडळी मार्गदर्शक मिळाली

◾ *सुचिकांत*
उदा. असे कोणते विषय आहेत तुमच्यामते?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
जो तो विज्ञानशाखेलाच निवडतोय , बायफ़ोकल घेतोय/ आयायटीच करायचे म्हणतात ( नागपुरचा अनुभव)

◾ *निवेदिता खांडेकर*
हो .. शिक्षार्थी कमी व पोटार्थी जास्तं

*सुचिकांत*
अच्छा.. मग यात विषयांची चूक आहे की विषय शिकणाऱ्यांची ? काय वाटतं ?

◾ *सुयोगा जठार ताई*
अगदी खरंय इकडे पण तोच अनुभव आहे.

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
चूक कोणाचीच नाही.
शिक्षणाच्या मूळ उद्दिष्टापासून भरकटलेय सगळेच.
मग जीव घेणी स्पर्धा होणारच.
चूक- बरोबर हे मूल्यमापन बरोबर नाही सगळी कडे.
या शैक्षणिक कला मुळे सामाजिक असमतोल वाढलाय

◾ *प्रसाद सिनकर*
विज्ञानाचे विद्यार्थी म्हणजे भाषा किंवा एकूणच कलांचा आस्वाद घेण्याकडचा कल कमीच असावा असा एक ग्रह असतो समाजात,काय सांगाल त्याबद्दल?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
ज्ञानाचे विद्यार्थी कितीतरी वेगवेगळी क्षेत्र समृद्ध करतायत
डॉ लागू
माया अलग
अनिल कुंबळे
केजरीवाल
अनेक आहेत

◾ *प्रसाद सिनकर*
मी समाजातल्या समजाबद्दल म्हणतोय..हे आणि इतर अनेक आहेत

*डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
सामान्य लोकांबद्दल म्हणताय कां??

◾ *प्रसाद सिनकर*
होय

*डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
असा गैरसमज आपण दूर केला पाहिजे.

◾ *सुचिकांत*
बरोबर ..

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
शास्त्र जीवन काय ते सांगते
कला जीवन कसं जगायचं ते सांगते.

◾ *वैभव तुपे*
माझा प्रश्न :
शाळांमधून माध्यमिक स्तरावर संस्कृत हा वैकल्पिक म्हणून न ठेवता अनिवार्य विषय म्हणून ठेवला तर विद्यार्थ्यांसाठी ते योग्य असेल का? योग्य असेल तर तसे करण्यासाठी कुणी आणि नेमके काय प्रयत्न करायला हवेत ?
माध्यमिक स्तरावर म्हणजे इयत्ता पाचवी पासून

◾ *डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
वैयक्तिक माला असं वाटतं की उच्चप्राथमिकस्तरापासून कोणतेही विषय सक्तीने लादू नये.
अभिवृत्तीचाचणी पाहून शिकवावे.
सक्तीमुळे द्वेष निर्माण होतो.
संस्कृत भाषा मनापासून केव्हाही कोणत्याही वयात शिकता येते. मुळात मातृभाषा पक्की असावी

◾ *सुचिकांत*
खरं आहे ..

◾ *प्रभू खाडिलकर*
१) सांगलीत संस्कृत अध्ययनाची परंपरा चांगली आहे. संस्कृत संवर्धन मंडळ आहे.
तसे नागपूरला आपले काही कार्य आहे का?
२) सध्या संस्कृत फक्त 10 वीला गुणांसाठी घेतात,  पुढे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी तुकड्या बंद होतात. यावर उपाय सांगू शकाल?
3.इतर सामाजिक काम, आपले तात्विक विचार यावर आपण काही सांगू शकाल?
वेळ असेल तरच उत्तर द्या.
धन्यवाद.

*डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
मी असे अनेक प्रयोग केलेय.
९वी पर्यंत संस्कृत नसलेल्या मुलाला दोन महिने शिकवून १०वीत ९६ गुण मिळाले.
१०/११ संस्कृत नसलेली मुलगी १२वीत १०० गुण मिळवते.
असे अनेक
नागपुरात *संस्कृत विद्यापीठ* आहे.
किमान ૪/५ वेदपाठशाळा आहेत
१०/ १२ संस्कृत कार्य करणा-या संस्था आहेत
किमान संस्कृतभाषेकडे पोटर्थीदृष्टीने वा मार्क मिळणारा विषय म्हणून पाहू नये
उलट जीवन संम्रद्ध/ प्रगल्भ करणारा विषय म्हणून पहावा./ शिकावा.

◾ *निवेदिता खांडेकर*
कवी कुलगुरु कालीदास संस्कृत विश्वविद्यालय पण ना

*डॉ.प्रज्ञा देशपांडे* 
तेच

◾ *वृषाली गोखले*
वयाची साठी पूर्ण व्हायच्या आधी ,
,""..मी माझ्याशी सुद्धा स्पर्धा करत नाही..मी परिपूर्णच आहे""...हा दृढनिश्चयी भाव स्वतःच्या  मनांत स्री जागवु शकेल काय?...स्रीला एवढे अलिप्त रहाता येणे शक्य आहे काय?
कोणती महत् अशी इच्छा आहे की ती अजुन पूर्ण करताच आली नाही आणि निःसंशय आता पूर्ण करायचीच आहे...{ शैक्षणिक क्षेत्रातील की सामाजिक क्षेत्रातील?}

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
वृषालीताई ,
माझं अनुभवक्षेत्र नाही हे अजून .मी काय सांगू ??

◾ *सुचिकांत*
त्यांचा दुसरा प्रश्न घ्या

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
इच्छा तेथे मार्ग लागा कामाला.

◾ *सुचिकांत*
१} भाषा विषयात नसता तर कोणत्या क्षेत्रात असता.?(माईंना मला रेडिओ वर ऐकायला आवडलं असत)
२} माईंचा आवाज खूप मधुर,शांत, आश्वासक असा आहे,बोलन्याचे/आवाजाचे हे संस्कार कुठे झाले?कोणी आदर्श याबाबतीत?कोणाला ऐकायला आवडत तुम्हाला?
- स्वप्नील

◾ *सुचिकांत*
मला वाटतं दोन्हींचे उत्तर एकत्र देता येईल तुम्हाला ...

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
मुळात मला कृषिविद्यापीठातून पदवी घ्यायची होती नाही तर आयुर्वेदाचार्य व्हायचे होते
घरचे बाहेरगावी शिकवायला तयार नव्हते.
मी जे मनात आहे तेच बोलते .
शब्द *सार्थ* असावेत.गणेशाचे रूप असतात .या भावनेने बोलते.

◾ *निलीमा कार्ले*
माझा प्रश्न थोड्याफार फरकाने आधी येऊन गेला आहे.
१) करिअर म्हणून संस्कृत निवडताना मुलं खूप विचार करतात. आवड आणि गती असूनही जात नाहीत. याबद्दल काय सांगाल?
२) हल्ली शाळेत जर्मन, फ्रेंचचा पर्याय असतो. त्यामुळे मुले संस्कृत नको म्हणतात. त्यांना काय सांगाल?
तुमचा आवाज खरंच खूप गोड आणि शांत आहे. तुम्ही चांगल्या समुपदेशक आहात.

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
काय सांगू??

◾ *निलीमा कार्ले*
मुलांना कसे समजावयाचे ?

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
संस्कृत शिकल्याने काय मिळतं हे शिकल्यावरच कळते.

◾ *निलीमा कार्ले*
मग त्यांना कसे वळवायचे संस्कृतकडे

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
संस्कृत ही सगळ्या भाषांना जोडणारी दुवा आहे .
आजच्या धकाधकीच्या काळात संस्कारक्षम आहे.
अनेक विषय त्या भाषेत ग्रंथरूपाने आहेत.
पुरक विषय म्हणून घ्यावा.

◾ *निलीमा कार्ले*
खरंय ताई

◾ *सुचिकांत*
अजून कोणते क्षेत्र राहिले आहे का जेथे तुम्हाला कार्य करायला आवडेल? - मृणाल पाटोळे

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
माझा माजी विद्यार्थी संस्कृत विषय घेऊन १२ झाला मग इस्रो मध्ये आहे
माझा जीव फक्त भाषांमध्ये रमतो. तेच करते मी.

◾ *अभिजित शिंदे*
संस्कृत अर्धमागधी पाली या भाषांप्रमाणे मोडीलीपी सुद्धा एच्छिक विषय म्हणुन शाळेत सुरु करण्यासाठी काही करता येईल का?
आपला खुपसारा इतिहास मोडीत आहे आणि अनुवाद न केल्याने अस्पर्श आहे.
मोडीमुळे मुलांना इतिहासाची गोडी लागु शकते आणि आपण अनेक इतिहास संशोधक जगाला देऊ शकतो

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
हा माझ्या अधिकारातील प्रश्न नाही.
लिपी हा विषय नाहीय. ऐच्छिक १०० हून जास्त विषयांचे
पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्द्ध करून द्यावेत.
जे आवडेल ते शिकू द्यावे उच्चप्राथमिक स्तरावर.

◾ *सुचिकांत*
मलाही काही प्रश्न विचारायचा माईना

तुमचे भाषाक्षेत्रात खुप मोठे योगदान आहे तुम्ही निरनिराळ्या विषयावर सातत्याने लीहित असतात तर तुम्हाला लीहण्याची आवड केंव्हापासुन आहे --- याच उत्तर वर आलं आहे ..
सर्वात जास्त काय लीहिण्यास आवडते - यावर बोला ...
- कपाटे गोपालराज

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
मनाला योग्य वाटते ,सगळ्याना एकत्र वाचता येईल ,  वाचल्यावर माझ्या मनातलं लिहिलय असं वाटेल असं लिहिते.

◾ *वैभव तुपे*
यावर थोडे अधिक सविस्तर सांगितले तर बरे होईल

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
शाळेत हस्तलिखित काढायचो आम्ही.
मराठीला खुप उत्तम शिक्षिका होत्या *जोगळेकर  व  चाफेकर बाई* . त्या वेगवेगळे विषय द्यायच्या निबंध लिहायला तेव्हा पासून लिहिते.

◾ *मृणाल पाटोळे* माफ करा ताई,मी आज सहभागी नाही होऊ शकले

*डॉ.प्रज्ञा देशपांडे*
तू नेहमीच तर बोलते. तुला सगळंच माहित आहे ना बायो.

◾ *निलीमा कार्ले*
तू तर प्रत्यक्षच घेतली असशील मुलाखत डोंबिवलीला

◾ *सुचिकांत* *#माळ_स्त्रीसामर्थ्याची* या उपक्रमात आज आपण डॉ. प्रज्ञा देशपांडे यांच्याशी संवाद साधला. अजूनही अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत .. पण वेळेअभावी आपण घेऊ शकलो नाही... आपल्याकडे दैनंदिन चर्चा चालू असतात अशा वेळी, असे प्रश्न विचारू शकता ...

*सर्व प्रश्नांची अगदी मनमोकळेपणाने उत्तरे दिल्याबद्दल प्रज्ञाताईंचे आभार.*.......... *संकलन-कपाटे भाऊ*

      *॥ज्ञानभाषा मराठी॥*
*॥माझी शाळा📚माझी भाषा॥*

No comments:

Post a Comment