ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Thursday, October 13, 2016

अंबाडी ची चटणी

अंबाडी ची चटणी
(१५दिवस टिकते)

१/२किलो अंबाडीची पाने(३जुडी अंदाजे)
५० ग्राम हिरवी मिरची
१/२ गड्डा लसूण सोलून

कृती: अंबाडीची फक्त पाने घेऊन स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यावीत.(पाणी अजिबात नको, नाहीतर चटणीला बुरशी येते)

२ साफ केलेली अंबाडीची पाने, मिरची आणि लसूण एकत्र घेऊन, एक कुकर मध्ये १छोटा चमचा(पोह्यांचा)तेल घेऊन त्यात हे सर्व साहित्य टाकून २शिट्टी करून घ्याव्यात.
3.मिश्रण गरम असतानाच रवी ने नीट रगडून(एकजीव करून)घ्यावे.
४.लोखडाच्या पळीत थोडे तेल घेऊन त्यात गरम झाल्यावर मोहरी जिरे हिंग कडीपत्ता आणि लाल सुकीमिरची टाकून सणसणीत फोडणी करावी.
५.आवडी नुसार मीठ अंबाडीच्या मिश्रणात टाकून वरून फोडणी द्यावी.
गरमगरम भाता सोबत हि चटणी खावी😀

No comments:

Post a Comment