साहित्य – बाटली, पाणी, ड्रेनेक्स, फुगे, दोरी.
कृती – एक उभी लहान तोंडाची बाटली घ्या. बाटलीत एक तृतीयांश उंचीपर्यंत पाणी भरा. बाटलीच्या तोंडावर बरोबर बसेल असा एक फुगा घ्या. कात्रीने ड्रेनेक्सची पुडीच्या कोपर्याला काप द्या. ड्रेनेक्सच्या पूडीतून सुमारे दोन ग्रॅम पूड बाटलीतल्या पाण्यात टाका. बाटलीच्या तोंडावर फुगा अडकवा. फुगा फुगला की दोरीने बांधून घ्या. हा फुगा हवेत तरंगतो.ड्रेनेक्समध्ये दाहक सोडा आणि ऍल्युमिनियमचा चुरा असतो. त्याच्या क्रियेने हैड्रोजन वायू तयार होतो. ड्रेनेक्स काळजीपूर्वक हाताळा.
मराठी विज्ञान परिषद
मराठी विज्ञान परिषद
||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळामाझी भाषा ||
|| माझी शाळामाझी भाषा ||
No comments:
Post a Comment