⚗साधे प्रयोग🔬
💡. तळपायावरचा भार मोजा 💡
🔵साहित्य – स्वत:, वजन काटा, परात, पाणी, कुंकू किंवा मऊगाळ चिखल, मोठा आलेखाचा कागद.
कृती – वजन काट्याचा वापर करून तुमचे वजन पहा. ते नोंदवून ठेवा. तळपाय बुडतील एवढे पाणी एका परातीत घ्या. त्यात कुंकू किंवा मऊगाळ चिखल घालून दाट गंध तयार करा. परातीशेजारी एक आलेखाचा मोठा कागद जमिनीवर ठेवा. परातीत एक एक पाय बुडवून त्याचा एक एक ठसा आलेखाच्या कागदावर उमटवा. ठशांचा मिळून आकार किती चौरस सेंटीमीटर आहे ते मोजा. त्या आकाराला तुमच्या वजनाने भाग द्या. त्यावरून तुमच्या तळपायावर किती भार पडतो ते समजेल.
🔵मराठी विज्ञान परिषद🔵
||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||
⏩पुढे पाठवा⏩
No comments:
Post a Comment