🔵साहित्य – छोटे पातेले, पाणी, शेगडी, चहापत्ती, चमचा.
🔵कृती – एक छोटे पातेले घ्या. ते पाण्याने अर्धे भरा. शेगडी पेटवून त्यावर पातेले ठेवा. पातेल्यातल्या पाण्याला खळखळ उकळी फुटू द्या. उकळत्या पाण्यात एक चमचा चहापत्ती टाका. पाण्याची उकळी वाढते. ती कमी झाली की पुन्हा एक चमचा चहापत्ती टाका. उकळी वाढते.चहापत्तीतील काही घटक गरम पाण्यात विरघळणारे आहेत त्यांच्यामुळे पाण्यात रंग उतरतो.
चहापत्तीत चोथा भरपूर असतो. त्यात हवा अडकून बसलेली असते, ती उष्णतेने बाहेर येते. तसेच चहापत्तीला टोके असतात. टोकांमुळे बुडबुडे बनण्याला वाव मिळतो. उकळी जास्त फुटलेली दिसते.
-🔵 मराठी विज्ञान परिषद🔵
||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||
⏩पुढे पाठवा⏩
No comments:
Post a Comment