नाठाळ म्हणजे, वाईट, दुष्ट, किंवा लबाड माणूस; पदोपदी फसवणारा खोटे बोलणारा माणूस. याच अर्थाने संतश्रेष्ठ तुकोबारायांनी भलेतरी देऊ कासेची लंगोटी | नाठ्याळाची काठी देऊ माथा | (९८७) अशी अभंगरचना केली आहे.
या शब्दाला या सारखाच पण थोडासा वेगळा, खोडसाळ, अडेल त्रासदायक असाही अर्थ प्राप्त झाला आहे. अनेक दुर्गुण असलेल्या माणसाचा उल्लेख करतानाही 'नाठाळ' शब्द एकेकाळी वापरला जात असे. 'साठी बुद्धी नाठी' या म्हणीमध्ये 'नाठी' हा आलेला शब्द 'नाठाळ' याच अर्थाचा आहे. मात्र येथे या शब्दाला 'हट्टी, अडेल' तसेच 'गैरलागू, निरर्थक' असा अर्थ लाभला आहे. एखादा वयोवृद्ध माणूस चुकीचा, अव्यवहार्य, गैरलागू असा सल्ला देऊ लागला, की ही म्हण वापरली जाते. ती आजही वापरात आहे.
संस्कृतातील 'अनास्था' शब्दाला 'आल' हा प्रत्यय लागून त्यापासून 'नाठाळ' हा शब्द सिद्ध झाला, असे इतिहासाचार्य राजवाडे यांना वाटते. नाठाळपासून नाठाळ्की, नाठळी असेही शब्द तयार झाले आहेत.
संकलन :-
||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

No comments:
Post a Comment