ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Sunday, July 17, 2016

वाचनकट्टा - २ - १७ जुलै

नमस्कार,

||ज्ञानभाषा मराठी || समूहातर्फे दर रविवारी, 'ऑनलाइन वाचनकट्टा' हा उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमांतर्गत सदस्य आपापल्या आवडीच्या पुस्तकातील काही अंश, मासिकातील लेख, इ. चे वाचन करतात, आणि त्याचे ध्वनिमुद्रण समूहामध्ये ऑडियोक्लीपच्या स्वरूपात पाठवतात.

अशी सर्व ध्वनिमुद्रणे आम्ही, साऊंडक्लाउड आणि गुगल ड्राईव्हच्या मदतीने संग्रहित करून त्याचे दुवे सामायिक करतो. वाचनसंस्कृती जपण्याचा एक लहानसा प्रयत्न !!!
________________________

https://goo.gl/Oo74Ji - आयुष्याचे धागे गिरवताना - आरती आठवले

https://goo.gl/x8DrjF - आर्य चाणक्य - डॉ. अमेय गोखले

https://goo.gl/03l3mQ - इंग्लिशचा विळखा - सौ प्रमिला नजन

https://goo.gl/yhosQ1 -  शिक्षण ऋतुजा - येलगट्टे

https://goo.gl/VMkDyc - ज्योतिबा फुले - वृषाली गोखले

https://goo.gl/6eJQK6 - दिवाकर - नाट्यछटा - सुचिकांत

https://goo.gl/iKMZAf - ध्रुवतारा - शुभांगी निघोट

https://goo.gl/H30YI0 - भक्तीगीत - सौ प्रज्ञा खाडिलकर

https://goo.gl/OxjIE2 - मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास - डॉ. प्रज्ञा देशपांडे

https://goo.gl/COc6Tt - लक्षवेध - सौ माधुरी देशपांडे

https://goo.gl/1fB3l8 - साखरेची सुट्टी - निवेदिता खांडेकर

https://goo.gl/dhCozj - स्मृतिचित्रे - डॉ. अमृता इंदूरकर

https://goo.gl/lDmuS0 - सद्गुरू श्री. वामनराव पै. - स्नेहल पात्यणे


     ||ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा-माझी भाषा ||

मराठी विलोमपद

😄सहज गंमत म्हणून ,..........😄  मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच  असते जसे सरळ वाचताना...... 👇

१. चिमा काय कामाची
२. भाऊ तळ्यात ऊभा
३. रामाला भाला मारा
४. काका, वाचवा, काका
५. काका, वाहवा ! काका
६. ती होडी जाडी होती
७. तो कवी डालडा विकतो
८. तो कवी मोमो विकतो
९. तो कवी सामोसा विकतो
१०. तो कवी कोको विकतो
११. तो कवी ईशाला शाई विकतो
१२. तो कवी रीमाला मारी विकतो
१३. तो कवी वामाला मावा विकतो
१४. तो कवी व्हिटी ला टिव्ही विकतो
१५. तो कवी विकीला किवी विकतो
१६. तो कवी चहाच विकतो
१७. तो कवी का विकतो?
१८. तो कवी लिली विकतो
१९. तो कवी ऊमाला माऊ विकतो
२०. तो कवी ठमाला माठ विकतो
२१. तो कवी कणिक विकतो
२२. तो कवी बेड व डबे विकतो
२३. तो कवी ठमीला मीठ विकतो
२४. मराठी राम
२५. तो कवी चक्काच विकतो
२६. तो कवी हाच चहा विकतो
२७. तो कवी राशीला शिरा विकतो
२८. तो कवी टोमॅटो विकतो
29. टेप आणा आपटे.
30. शिवाजी लढेल जीवाशी.
31. सर जाताना प्या ना ताजा रस.
32. हाच तो चहा
(  मराठी भाषा मित्रमंडळ  )

Thursday, July 14, 2016

मराठी भाषा संवर्धन - सहविचार सभा

सस्नेह नमस्कार,

'राज्य मराठी विकास संस्था' आणि '|| ज्ञानभाषा मराठी ||' whatsapp समूह एकत्रितपणे, मराठी भाषेच्या संदर्भात काम करणार्‍या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांची एक सहविचार सभा पुणे येथे आयोजित करत आहोत.

या सभेत येणार्‍या अपेक्षित सर्वच कार्यकर्त्यांना रेल्वेच्या तृतीय श्रेणी वातानुकुलित दर्जाचा प्रवासखर्च किंवा ३ वा ३ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास रु. 9/- प्रती किमी दराने वाहनाचा प्रवासखर्चही देण्यात येईल - [यासाठी, प्रवासाची तिकिटे, वाहनात इंधन भरल्याच्या पावत्या, इ. कागदपत्रे जमा करणे आवश्यक ] बाहेरगावाहून आलेल्या सर्वांची राहण्याची आणि आवरण्याची व्यवस्था गोवर्धन मंगल कार्यालय येथेच करण्यात आलेली आहे.


तरी आपल्या समुहातील जे सदस्य इच्छुक आहेत, त्यांनी खालील गुगल फॉर्मवर नोंदणी करून कळवावे. तुमचा सहभाग निश्चित झाल्यानंतर, तुम्हाला अधिकृत इमेल पाठवला जाईल. त्या इमेलची प्रिंट-आऊट आणि ओळखपत्र जवळ ठेवावे, तरच कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येईल.

नावनोंदणीकरता दुवा : https://goo.gl/HXnXnH

दिनांक - रविवार, दि. ७ ऑगस्ट, २०१६
वेळ - सकाळी ९.३० ते दु. ४.३०
____________________________
सभेचे साधारण वेळापत्रक पुढीलप्रमाणे

- स. ८ ते ९ : चहा-नाश्ता

१. प्रास्ताविक आणि रामविसं. ची भूमिका
- प्रभारी संचालक - डॉ. आनन्द काटीकर - स.९.३० ते ९.५०

२. निवडक व्यक्तींचा परिचय :  ९.५० ते १०

३. सत्र १ :

- शालेय पातळीवर योजावयाचे उपक्रम : स. १० ते ११.३०

- अध्यक्ष : वर्षा सहस्रबुद्धे - दु. १२ ते १

४. भोजन : दु. १ ते १.४५

५. सत्र २ :

- खुल्या गटात करावयाचे उपक्रम : दु. १.४५ ते २.४५

६. चहापान : दु. २.४५ ते ३.१५

७. संकलन, नियोजन आणि समारोप : दु. ३.१५ ते ४.३०


अधिक माहितीकरता तसेच कार्यक्रमाकरता स्वयंसेवक म्हणून नावनोंदणीसाठी संपर्क :

सुचिकांत वनारसे - ९०५२३४४४७६
____________________________

आभार,

- राज्य मराठी विकास संस्था,
- || ज्ञानभाषा मराठी ||


Monday, July 11, 2016

चिंपँझी (Chimpanzee)

स्तनी वर्गातील नर वानर (प्रायमेट्स) गणाच्या होमिनिडी कुलातील एक कपी. मानव,ओरँगउटान व गोरिला यांचाही या कुलात समावेश होतो.पँन प्रजातीत चिंपँझीच्या दोन जाती आहेत. पँन ट्रोग्लोडायटीझ(सामान्य चिंपँझी) आणि पँन पँनिस्कस (बोनोबो ). पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील वर्षावनांत सामान्य चिंपँझी आढळतात.तर कांगो देशाच्या वनात बोनोबो आढळतात

चिंपँझीची उंची १-१•७ मी. असून नराचे वजन ५६-८० किग्रॅ., तर मादीचे वजन ४५-६८ किग्रॅ. असते. चेहरा सोडून सर्व शरीरावर दाट व काळे केस असतात. चेहरा काळसर तांबूस असून डोळे तपकिरी असतात. भुवयांचे कंगोरे मोठे असतात. ओठ पुढे आलेले असून भावदर्शक असतात. कान लहान असतात. त्यांना श्रोणि-किण (ढुंगणावरील घट्टे), कपोल-कोष्ठ (गालातील पिशव्या) आणि शेपूट नसते. बरगड्या २६ असतात. हात पायापेक्षा लांब असून बळकट असतात. काही अंतर ते माणसाप्रमाणे पायावर चालू शकतात; परंतु जास्त करून चतुष्पादाप्रमाणेच चालतात. चालताना हातांची बोटे आत वळवून ते बोटांचे सांधे जमिनीवर टेकवतात. चिंपँझीच्या पायांची बोटे लांब असतात. त्यामुळे ते पायांनी वस्तू पकडू शकतात. माणसाप्रमाणेच हाताला आंगठा असतो. आंगठा व इतर बोटे यांनी ते लहान वस्तू पकडू शकतात. चिंपँझीचा मेंदू मानवी मेंदूच्या तुलनेत आकाराने अर्धा असतो.

चिंपँझीकुस्करलेल्या पानांचा स्पंजप्रमाणे उपयोग करून चिंपँझी पाणी पितात. ते मुख्यत: फळे व पाने खातात, काही वेळा कीटकही खातात. हातात छोटी काटकी घेऊन वारुळातून वाळवीसारखे कीटक काढून खातात. क्वचितप्रसंगी ते हरिण व माकड यांची शिकार करतात. दिवसाचा ५०—७५% काळ ते झाडांवर घालवितात. त्यांच्या कुटुंबात एक नर, अनेक माद्या व पिल्ले असतात. झोपण्यासाठी ते एकाच झाडाच्या किंवा वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या विणून त्यांच्यावर घरटे तयार करतात. विशेष म्हणजे ही कला त्यांच्या माद्यांकडून पिल्लांना शिकविली जाते. घरटे सु.५ मी. व्यासाचे, जमिनीपासून ४-५ मी.हून जास्त उंचीवर असून त्यात मऊ पानांचे व डहाळ्यांचे अस्तर असते. मादीमध्ये ऋतुचक्र स्त्रियांप्रमाणे २७-३० दिवसांचे असते. गर्भावस्था सु.९ महिन्यांची असून मादी एका वेळी एकाच पिल्लास जन्म देते. साधारणपणे दर ३-४ वर्षांतून एकदा वीण होते. चिंपँझीचा आयु:काल वनांत असताना ३०-४० वर्षे असतो. मात्र प्राणिसंग्रहालयात ठेवल्यास त्यांचा आयु:काल ५०-६० वर्षे एवढा असतो.

चिंपँझी माणसांप्रमाणे आवाज काढून, हातवारे करून किंवा चेहऱ्यांच्या खाणाखुणा करून एकमेकांशी संवाद साधतात. त्यांची भाषा २४ वेगवेगळ्या आवाजांची असून त्यातील प्रत्येक आवाजाला एक विशिष्ट अर्थ असतो. आवाज करण्यात त्यांना मोठा आनंद वाटतो. आवाज करून ते आपल्याला काय वाटते ते समूहातील इतरांना सांगतात. त्यांच्या भाषेची शब्दावली तयार झालेली आहे. त्यांना १-९ संख्या ओळखायला येऊ शकतात. चिंपँझी त्यांच्या समूहात एकमेकांचे हित पाहतात, मात्र वेगळ्या समूहातील चिंपँझीशी ते भिन्न वागतात; तथापि, वनात अनाथ पिल्लांना चिंपँझीने दत्तक घेतल्याचे आढळून आले आहे.

चिंपँझी हा बुद्धिमान, चिकित्सक, लवकर शिकणारा व खेळकर प्राणी आहे. जेन गुडॉल या महिला मानववंश वैज्ञानिकेने टांझानियातील गोंबे स्ट्रीम नॅशनल पार्क या उद्यानात राहून चिंपँझीच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा अभ्यास केला. एकमेकांना मिठी मारणे, मुके घेणे व पाठीवर थाप मारणे अशा क्रिया चिंपँझी माणसासारख्याच करतात. तसेच त्यांच्या कुटुंबात ते एकमेकांना आधार देतात, समजून घेतात आणि आयुष्यभर सोबत राहतात. चिंपँझीचे भौतिक गुणधर्म आणि सामाजिक जीवन यांबाबतीत माणसाशी साधर्म्य असल्याने त्यांचा उपयोग वैद्यक आणि मानसशास्त्रीय संशोधनासाठी वैज्ञानिक करीत आहेत. चिंपँझीच्या दोन्ही प्रजाती मानवाशी संबंधित असून सु.६० लाख वर्षांपूर्वी चिंपँझी व मानव यांचे पूर्वज एकच असावेत, असे वैज्ञानिकांचे मत आहे. १९७३ मध्ये झालेल्या संशोधनातून मानव व चिंपँझी यांच्या डीएनएच्या रेणूंमध्ये जवळपास ९६% समानता आढळली आहे.

https://goo.gl/XMdJ5N

-झाडे, सुरेश - मराठी विश्वकोश

      ||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा-माझी भाषा ||

::: आपले शब्द, शब्दांचे अर्थ - ६:::

<<< तालेवार >>>

तालेवार म्हणजे श्रीमंत हे आपणास माहिती आहेच. पण त्यातील मूळ शब्द 'ताले' आहे, हे आपणास माहित नसेल. 'ताले' म्हणजे नशीब, भाग्य. 'तालेवार' म्हणजे नशीबवान, भाग्यवान. जो भाग्यवान तो श्रीमंत राहणारच या अर्थाने हा शब्द आला आहे.

#शब्दांच्या_गाठीभेटी
#मा. गो. वैद्य

संकलन :-

     ||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

Sunday, July 10, 2016

रविवार वाचनकट्टा - १० जुलै

वाचनकट्ट्यात भाग घेतलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 👏

अ तुकडी - ६ वाचने
ब तुकडी - ५ वाचने

https://goo.gl/KWUsGU - कपाटे गोपाल - आत्मतीर्थ
https://goo.gl/vI0Thl - अमेय गोखले - काव्यवाचन
https://goo.gl/ftl65u - अमृता इंदूरकर - आनंदीबाईंची पत्रे
https://goo.gl/9yUiJI - माधुरी देशपांडे - लक्षवेधी
https://goo.gl/AU1rHV - स्वप्नील पाटील - शितू
https://goo.gl/pXHcbf - निवेदिता खांडेकर - ग्रामविकासाचे पंचतंत्र
https://goo.gl/KBiMSt - ऋतुजा येलगट्टे - मले बाजारला जायचं नाही
https://goo.gl/AXvGyL - कलिका पाटोळे - शिव्या कोणा देऊ नये
https://goo.gl/dbZ3Cg - डॉ. प्रज्ञा देशपांडे - संगीतातील विज्ञान
https://goo.gl/aFiWsN - सुचिकांत - बालगंधर्व
https://goo.gl/FOHiO5 - वृषाली गोखले - दिव्यस्पर्शी
https://goo.gl/DWBQzk - सौ प्रमिला नजन -  अ - अहिल्याबाईंचा


      ||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

Thursday, July 7, 2016

ज्वारी, ज्वारीच्या जाती, जोंधळे, मिलो, हुरडा

दिनांक:०७/०७/२०१६.

💮समूहात झालेली चर्चा संकलित रूपाने!!!💮

💮प्रसाद हेन्द्रे: दक्षिण भारतात बोलल्या जाणाऱ्या मराठीला (अगदी तंजावूर पर्यंत) भावसार किंवा नामदेव (हे मी विकी वर वाचले) मराठी म्हणतात. खूप जास्त प्रादेशिक प्रभाव दिसतो. उच्चारणात जमीन-आसमानाचा फरक आहे, कि नवख्या माणसाला हे शब्द मराठी का असा प्रश्न पडावा!  जसं रंधपम्- जेवण बनविणे. रांधणं ह्या शब्दावर दक्षिण भाषेचा उपचार करून "म्" लावले. मला वाटतंय ही भाषा कोकणीच्या जवळ असावी.
          जुन्या ग्रामीण मराठी चित्रपटात जोंधळं हा शब्द सर्रास वापरला जायचा.

💮‪संतोष सर: Sir, jwari mahnje jondhale nasun ha ek jwaricha prakar ahe jse hybrid, pivli. Jondhle he pik fakt rabbi hangamatch ghetle jate tr hybrid ani pivli hi kharip hangamtil pik ahet. Jondhale ya pikala  jamin hi kali an supik lagte. Bider dist mde he pik mothya paramanat ghetle jate. Mrathwadya made ya jwarila badijwari  asehi mahntat.

💮सुचिकांत: संतोष सर, मी मराठी विश्वकोशात पाहिले, तिथे ज्वारी (जोंधळे) असेच लिहिले आहे .. तरी तुम्ही म्हणत असाल तर असेल बरोबर

💮संतोष सर: सांगली कडे जोंधळे आणि शाळु हे ज्वारीसाठीच वापरले जातात

💮मृण्मयी...मृणाल: हुरडा म्हणजे??

💮शिवकृष्णजीं‬: हुरडा म्हणजे ज्वारीची कणसे.

💮सुचिकांत: मी खूप लहान असताना खाल्ला आहे .. नक्की सांगता येणार नाही .. गुगल केले तर किंवा समुहातील सदस्य सांगू शकतील

💮शिवकृष्ण सर‬: कच्ची कणसे असतात,,, ती शेतात शेकोटी करून त्यावर भाजून तिखट मीठ टाकून खातात,,,

💮मृण्मयी...मृणाल: अच्छा!!

💮शिवकृष्ण सर‬: आमच्या इकडे सर्रास हुरडा पार्टी म्हणून बरेच जण शेतात शाळू असेल तेथे जातात

💮मृण्मयी...मृणाल: मस्त ना!!

💮शिवकृष्ण सर‬: उत्तम चव,

💮मृण्मयी...मृणाल: शाळू?

💮शिवकृष्ण सर‬: पुण्यात सुद्धा 80 रुपये पाव किलो(?) असा सुटत हुरडा मिळतो,,,, पण शेतात जाऊन खाणे हे चवीचेच

💮प्रसाद हेन्द्रे‬: शाळू. शाळी=मालदांडी हे बरोबर आहे का??

💮मृण्मयी...मृणाल: दोन्ही शब्द माहित नाहीत!!

💮सुचिकांत: गुगल केल्यास ज्वारीचे प्रकार दिसतात. एक नाव मराठी एक हिंदी

💮धनु भाऊ: ज्वारीस जुंधळे  असे आमच्या भागात म्हणतात .पण हायब्रीड ज्वारी वेगळी आणि रब्बी ची जुधळे

💮प्रसाद हेन्द्रे‬: ज्वारीच्या काही वाणांची नोंद शाळू म्हणून केली जाते. मालदांडी हा सोलापूर, सांगली, मराठवाडा भागांत रब्बी हंगामात पिकवला जाणारा पारंपारिक वाण आहे. मला वाटतं हाच वाण हिरड्यांसाठी वापरला जातो. संकरित नाही.

💮सुचिकांत: मालदांडी, दगडी, शाळी हे प्रकार आहेत - गुगल

💮धनुभाऊ: जुधळे , हे संकरीत नाहीत

💮सुचिकांत: सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा परिसरात उत्पादन होते.

💮धनुभाऊ: तेच रब्बी मध्ये घेतात व संकरीत ( हायब्रीड ) नाहीत.

💮प्रसाद हेन्द्रे‬: कदाचित हे सगळे एकच् असू शकतात, नामबाहुल्यामुळे इतकी नावं.

💮धनुभाऊ: लातूर मध्ये रेणापूर च्या काही भागात मांजरा नदी काठाने पण रब्बी ज्वारी घेतली जाते.

💮अभिके: दादर पण ऐकलाय मी प्रकार ज्वारीचा.

💮प्रसाद हेन्द्रे: हा वाण पारंपारिक अत्यंत चविष्ठ, काटक आणि कडक आहे. २-३ पावसात सुद्धा तग धरतो, शेतकरी सहसा पिकांस मुकत नाही, काही तरी हाताला लागतंच.

💮मृण्मयी...मृणाल: अच्छा!!

💮प्रसाद हेन्द्रे‬: त्यांच्यात तेलबियांची पीकं जसं करडी, काऱ्हळे आणि तूरीसारखी पिकं सुद्धा अांतरपीक म्हणून घेवू शकतात. दादर- ऐकिवात नाही.

💮धनुभाऊ: रब्बी ज्वारी मध्ये तूर घेत पण नाही येत पण नाही  ,
खरीप ज्वारीत तूर घेतात. खरीपात संकरीत ज्वारी ( हायब्रीड ) घेतली जाते

💮प्रसाद हेन्द्रे‬: धनंजय, धन्यवाद! पुस्तकी शेतकरी असल्याचे दुष्परिणाम! कुठल्या डाळी घेतल्या जातात??

💮मृण्मयी...मृणाल: यांचे काही आरोग्यविषयक फायदे?? मला असे जाणवते की ज्वारी,बाजरी हि पचायला जड असते?

💮धनुभाऊ: गव्हा पेक्षा पचनास हलके असतात पण
वैद्य जास्त प्रकाश टाकू शकतील

💮मृण्मयी...मृणाल: अच्छा!!

💮शिवकृष्ण सर‬: ज्वारी पचनास हलकी असते , गहू पचनाला थोडा जड असतो,,, बृहणाचे काम गहू चांगले करतो ज्वारी पेक्षा

‪+💮प्रसन्न कुलकर्णी‬: ज्वारी पचायला हलकी.

💮धनुभाऊ: जवळपास सर्वच कडधान्य खरीपात (मुग , उडीद , तूर  ) घेतले जाते.  रब्बीत मोहरी करडी घेतात
सुर्यफुल बारा माही. भूईमूग पण बारामाही हरभरा व मसूरी हे रब्बी दाळ वर्गीय

💮प्रसन्न कुलकर्णी‬: आणि बाजरी हलकी पण उष्ण.

💮शिवकृष्ण सर‬: बृहन म्हणजे शरीर पोषण. बाजरी लघु रुक्ष, उष्ण, रक्तगामी असते, त्यामुळे उष्णता जास्त होते याने. नाचणी, थंड, पचनाला थोडी जड, पित्तशामक , आणि प्रोटीन मुबलक मिळते

💮प्रमिला ताई‬: मिलो असा एक शब्द धान्याच्या संदर्भात ऐकलेला  याबाबत काही माहिती मिळेल का

💮सुचिकांत: लाल ज्वारी का? अमेरिकेतलं पीक आहे बहुतेक, नक्की माहिती नाही. पाहून सांगतो. मी माझ्या वडिलांकडून ऐकले आहे! खूप लहानपणी - ते एका दुष्काळाबद्दल नेहमी सांगतात. त्या दुष्काळात, लाल ज्वारी, मिलो अमेरिकेतून मदत म्हणून पाठवली होती. तिकडे हे धान्य गुरांना दिले जायचे. जे लक्षात होतं त्या आधारे सांगितले आहे. चुकीची माहिती असल्यास क्षमा.

💮मधुकरजी‬: ज्वारी आणि शाळु व जोंधळा हे वेगवेगळे आहेत .(लालज्वारी लाच मिलु आसे म्हणतात 1972च्या दुष्काळात बाहेरून कुठुनतरी आयात केली होती.असे फक्त ऐकून आहे.)

💮सुचिकांत: अमेरिकेने मदत म्हणून पाठवले होते बहुतेक

💮प्रमिला ताई‬: अच्छा!!

💮मधूकरजी‬: माझ्या फेसबुक वर आहे ज्वारी व नागली

💮सुचिकांत: बरं!!

💮प्रसाद हेन्द्रे: त्याला PR 86 म्हणतात असं वाटत. गुगलबुवाला माहित नाही वाटतं!!

💮प्रसाद हेन्द्रे‬: लाल गहू, मीलो.

💮सुचिकांत: पण त्या फोटोत तर ज्वारी दाखवली आहे

💮आनंद काटीकर सर‬: दादर आणि शाळू हे गावरान ज्वारीचे म्हणजे अस्सल देशी वाणाचे प्रकार आहेत.
खानदेशात दादर तर सोलापूर-सांगली-कोल्हापूरकडे शाळू
नगरची ज्वारी अजूनच वेगळी तेथील हुरड्याला सुरती हुरडा असे म्हणतात.

💮प्रसाद हेन्द्रे‬: मीलो ही ज्वारीच पण दुष्काळीत लाल गहू पण आयात केला होता. पुण्यात शिवाजीनगरच्या शासकीय गोदामात साठवला होता. माहिती बद्दल धन्यवाद!!

💮मधूकरजी‬: शाळु पण पिकतात सह्यद्रीपट्यात आमच्याकडं रब्बीहंगामात (आता वर्षभरात देत जाईल त्या त्या हंगामात इथे चर्चीली गेलेली पिके तीही मी स्वतः क्लीक केलेली .

💮निलीमा: शाळूच्या लाह्या करतात असे ऐकल. नागपंचमीला वापरतात

💮 फडके काका: नाचणी मधुमेहवरही गुणकारी असते. सध्या पाऊस सुरु झाला या सुरुवातीच्या दिवसात रुजणार रान अळू त्याला तेर अळू म्हणतात त्याच फतफत आणि नाचण्याची चुलीवर शिकलेली भाकरी, लोण्याचा गोळा आणि जोडीला फोडणीची मिरची, अहाहा!!!

💮डॉ.प्रज्ञा देशपांडे: नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात *वाणीचा हुर्डा पार्टी * करतात  * पांढरे पक्षी*!!!

*💮मृण्मयी...मृणाल*: *आज दिवसभरातील चर्चा वाचून मला सुचलेले काहीसे!!!.........🙏.... वैद्य, शेतकरी, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, भाषाप्रेमी, भाषातज्ज्ञ, इतिहास तज्ज्ञ, मराठी शाळाप्रेमी, कवी, साहित्यिक, वकील,पोलीस ,अभियंता, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक,सरकारी कर्मचारी ..सर्व सर्व क्षेत्रातील  एकत्र आले की *ज्ञानभाषा मराठी* *समूह तयार होतो*

Monday, July 4, 2016

राजा भोज आणि कालिदास

धारचा राजा भोज आणि कालिदास यांच्या कथा प्रसिद्ध होत्या. परंतु अकबर-बिरबल यांच्या कथांप्रमाणे त्या आता फारशा वाचल्या जात नाहीत.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे एक पुस्तक मी लहानपणी वाचले होते. भोजराजाने कवितेची एक ओळ सांगायची, आणि कालिदासाने त्या ओळीशी सुसंगत अशा उरलेल्या तीन ओळी रचून कडवे पूर्ण करायचे. असा काव्यपूर्तीचा खेळ त्यांच्यात चालायचा. आता त्यातल्या गोष्टी फारशा आठवत नाहीत, पण आठवणारी एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते.

भोजाने सांगितलेली पहिली ओळ अशी:-
"चंद्रानना फुंकीत पावकाला"
म्हणजे, "जिचे मुख चंद्रासारखे आहे अशी स्त्री पावक(अग्नी) फुंकत होती."

कालिदासाने लगेच उरलेल्या तीन ओळी रचून पुढीलप्रमाणे कडवे पूर्ण केले:-

"चंद्रानना फुंकीत पावकाला,
आश्चर्य वाटे कवीच्या मनाला।
अहो, चमत्कार विचित्र झाला,
आकाशीचा चंद्र चुलीत गेला।।"

एक चंद्रानना स्त्री (चुलीसमोर नळीने) विस्तव फुंकत असताना जो विचित्र चमत्कार घडला पाहून कवीला आश्चर्य वाटले. (हा चमत्कार काय तर) आकाशातला चंद्र (चंद्रासारखी  वाटोळी भाकरी) (भाजण्यासाठी चक्क) चुलीत गेला.

- डॉ. वसंत काळपांडे सर

Sunday, July 3, 2016

◆हरवत चाललेल्या म्हणी - ५◆

■गोरे हात इजा करत नाहीत■

या म्हणीत व्यवहारात २ अर्थ सांगितले जातात. 'गोरे हात' म्हणजे स्त्रिया. 'स्त्रिया या जात्याच नाजूक, सुंदर, गोऱ्यापान आणि भावनाशील असतात' हा एक अर्थ आणि दुसरा अर्थ असा की, त्या कधीच मारामारी करत नाहीत. या म्हणीतून एकापरीने स्त्रियांची खुबीने खुशामत केलेली आहे.

जगामध्ये स्त्रियांवरून युद्धे झालेली आहेत, पण स्त्रियांनी केलेल्या युद्धाचे उदाहरण मिळणार नाही - कारण गोरे हात इजा करत नाहीत.

[टीप - कृपया गुगल मारून स्त्रियांचे मारामारी करतानाचे फोटो प्रतिक्रियेत देऊ नयेत.]

■  संकलन :-

       || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

Saturday, July 2, 2016

तुकोबांच्या नावावर खपवलेले अभंग

चित्रलेखाच्या पहिल्या पानावर 'प्रा जे. बी. शिंदे' काही अभंग लिहित असतात … २१ व्या शतकातल्या आधुनिक मराठीतले हे अभंग फेसबुकावर तुकोबांच्या नावे प्रसिद्ध केले जातात!
सध्या घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी || असा एक अभंग तुकोबांच्या नावे फिरत आहे ।
या आधी अनेकदा अध्यक्ष , अंधश्रद्धा , दैनंदिनि असे आधुनिक मराठीतले शब्द असलेले अभंग तुकोबांच्या नावावर खपवलेले मी पाहिले आहेत . फ़िलिंग लैच इरिटेटेड

©डॉ. अभिराम दीक्षित