ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Saturday, September 24, 2016

वाचनकट्टा - मोर्चेबांधणी

वाचनकट्ट्यात सहभागी व्हायचं आहे,
पण नक्की ध्वनीमुद्रण कसे करावे माहिती नाही, बरोबर ना?
खालील माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकते.

ध्वनिमुद्रणासाठी लागणारे साहित्य

१. चांगला भ्र. ध्वनी संच.
२. वायरवाले हेडफोन+माईक
३. आत्मविश्वासपूर्ण, खणखणीत आवाज
४. ध्वनीमुद्रणाकरता योग्य Android App
नाव - Voice recorder
इथून डाऊनलोड करा - https://goo.gl/XF5g3U
_________

कृती -

प्रभावी ध्वनिमुद्रणाकरता काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

१. सर्व प्रथम भ्र.ध्वनी संचाचा आवाज एकदम बारीक करा - ०

२. भ्र.ध्वनी संच फ्लाईट मोडला ठेवा, म्हणजे इतर आवाज येणार नाहीत तसेच मध्येच कुणाचा फोन येणार नाही.

३. Voice recorder - उघडा. स्क्रीनवर Recorder, Voice Memos, Settings असे ३ पर्याय असतील. त्यातील Settings हा पर्याय निवडून Record File Type = mp3 आणि Record Quality = Low Quality ठेवा.

४. हेडफोन कानाला लावा, आणि माईक तोंडापासून ३-४  इंच अंतरावर, तोंडाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवा. एका हाताने पुस्तक/लेख समोर धरा.

५. Voice recorder अप्प मध्ये बरोबर मधोमध, एका पट्टीवर तुम्हाला डाव्या बाजूला रेकॉर्डिंगसाठी-ध्वनिमुद्रणासाठी, लाल ठिपका दिसेल, त्या ठिपक्याला बोट लावल्यावर ध्वनीमुद्रण सुरु होईल. तुम्ही तुमचे वाचन पूर्ण करा आणि वाचन झाल्यावर पुन्हा लाल ठिपक्याला स्पर्श करा म्हणजे ध्वनिमुद्रण थांबेल.

६. ध्वनिमुद्रण थांबले की, त्याच स्क्रीनवर 'Voice Memos' पर्याय निवडा तुमच्यासमोर ध्वनिमुद्रणाची फाईल दिसेल, ती शेंदरी रंगाने अधोरेखित केलेली असेल.

७. त्याच स्क्रीनवर खाली, तीन चित्रे दिसतील.
डावीकडून पहिले - फाईल डिलीट/काढून टाकण्यासाठी.
मधले - फाईलला तुमच्या पसंतीचे नाव देण्यासाठी
तिसरे - शेयर करण्यासाठी.

तिसरा पर्याय निवडा, तुम्हाला whatsapp चा आयकॉन दिसेल, त्याला स्पर्श करा, नंतर तुमच्यासमोर contact ची यादी येईल, त्यातील कुणालाही तुम्ही निवडा, आणि उजव्या कोपऱ्यातील बाणाचे बटन दाबा. तुमचे ध्वनिमुद्रण संबंधित व्यक्तीला मिळेल.

काय आणि किती वाचावे?

तुम्ही वाचनकट्ट्यामध्ये, तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचा एखादा अंश/मासिकातले लेख/वर्तमानपत्रातले लेख/अहवाल इ. वाचू शकता. वाचताना लेखक आणि प्रकाशकांचे ऋणनिर्देश करायला विसरू नका. वाचन साधारण ५-७ मिनिटाचे असेल तर आपण आवडीने वाचतो, वाचन खूप प्रभावी नसेल आणि खूप लांबले तर, आपण ऐकायला नाके मुरडतो, त्यामुळे यासर्व गोष्टी लक्षात ठेवून वाचनाकरता विषय/लेख/वाचनाची लांबी ठरवावी. सरासरी समुहातील सदस्यांची वाचने ५-७ मिनिटांची असतात.

____________

वाचनकट्ट्याचे एकूण ५ गट पाडण्यात आलेले आहेत.

📚भोलानाथ कट्टा - लहान/शाळकरी मुलांसाठी
📚 अत्रे कट्टा - खुला गट
📚 सावरकर कट्टा - खुला गट
📚अमावस्या कट्टा - खुला गट - बाल्यावस्थेत
📚 पौर्णिमा कट्टा - खुला गट - बाल्यावस्थेत

ज्या सदस्यांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी गटप्रमुखांना संपर्क साधा. सोबत सर्व कट्ट्यातील सदस्य विभागणी देत आहोत.

- मृणाल पाटोळे/सुयोग जठार
- सुचिकांत वनारसे/गोपाल कपाटे बुवा

    || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

Friday, September 23, 2016

ऑनलाइन वाचनकट्टा - १६ सप्टेंबर - पौर्णिमा वाचनकट्टा

*स्टार करून ठेवावा असा संदेश ....*
👇 👇 👇
*वेळ मिळेल तसे ऐका, इतरांना ऐकवा, स्वतः वाचा..*

*📖ऑनलाइन वाचनकट्टा📖*

नमस्कार,

*||ज्ञानभाषा मराठी||* समूहातर्फे दर रविवारी, *'ऑनलाइन वाचनकट्टा'* हा उपक्रम राबवण्यात येतो. परंतु *डॉ. प्रज्ञा देशपांडे* यांनी सुचवल्याप्रमाणे, यावेळी पौर्णिमा वाचनकट्टा ही नवी कल्पना राबवली गेली.

💐पौर्णिमा वाचनकट्ट्याबद्दल थोडक्यात -

■मन आणि मनोभावना व्यक्त करणारे साहित्य.■
शृंगार रस,शांतरस,नर्मविनोद व्यक्त करणारे असावे. "ज्ञानभाषा मराठी" या कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र ऐकताना त्यांच्या मनात किंतु-परंतु येऊ नये असे शृंगार साहित्य संयमित असावे.
स्वलिखित कविता , लघुकथा,,कथा , अनुभव इ इ वाचन स्वागतार्ह आहे - *डॉ. प्रज्ञा देशपांडे*
१६ सप्टेंबरची वाचने खालीलप्रमाणे.
_______________________
*भोलानाथ कट्टा (लहान मुले)*
👫👬
स्वयंपाकातून शिक्षण - नंदन कार्ले - https://goo.gl/OnKDYd
-------------------------------------

*📖अत्रे कट्टा📖*
👨🏻👩🏻

◾पौर्णिमा - डॉ. प्रज्ञा देशपांडे - https://goo.gl/Dpu32K

◾पुन्हा पुन्हा का मनात माझ्या - डॉ. अमेय - https://goo.gl/BYDHqq

◾गुज माझ्या अंतरीचे - डॉ. अमेय गोखले - https://goo.gl/SG7fpY

◾घडू नये ते - प्रसन्न कुलकर्णी - https://goo.gl/YU7pOA

◾स्पंदन कविता संग्रह - सौ. मृणाल - https://goo.gl/1EyxWe

◾स्त्री सौन्दर्या तुझी कहाणी - माधवी जोगळेकर - https://goo.gl/oxyVV3

◾कालिंदीच्या तिरावरती - सौ. विजयालक्ष्मी सणस - https://goo.gl/c7Wru2

◾अबोल - सौ विजयालक्ष्मी सणस - https://goo.gl/nbRsDP

◾शिक्षणाची वेदना - सौ सुनीता चौधरी - https://goo.gl/7GH25M

◾चिऊ ग चिऊ ग - स्वप्नील पाटील - https://goo.gl/BwAtmz

◾उखाणे - सौ. वैशाली पाटील - https://goo.gl/R4nzVZ

◾नवस - करुणा जोशी - https://goo.gl/TmKJ4h

⏹गवसलेला चंद्र - रेखा चवरे - https://goo.gl/kq1Wyi

*📖सावरकर कट्टा📖*
👨🏻👩🏻

▪भारतीय विचार - सौ. वृषाली गोखले - https://goo.gl/vgKB1Y

▪माहेरवाशीण, एका जिद्दी स्त्रीची कथा - सुचिकांत - https://goo.gl/BKpKUd

▪प्रेम म्हणजे काय - सोजर मस्के - https://goo.gl/iOSqWi

▪येता जाता - अपर्णा शेंबेकर - https://goo.gl/30EvzJ

▪लिही आता थांबू नको - तुष्की नागपुरी - https://goo.gl/VVc0nL

▪रेष माझी कुंकुवाची - तुष्की नागपुरी - https://goo.gl/Yxg6Q2

▪येथे कविता करून मिळतील - तुष्की नागपुरी - https://goo.gl/RvmQyS

▪या बायकांना - तुष्की नागपुरी - https://goo.gl/RV6xln

▪माझ्यासाठी खूप काही - तुष्की नागपुरी - https://goo.gl/YL22aj

▪भरपाई - तुष्की नागपुरी - https://goo.gl/HgOg7N

▪बायको म्हणजे - तुष्की नागपुरी - https://goo.gl/WRzYCo

▪तुला पाहता - तुष्की नागपुरी - https://goo.gl/pnQhz0

▪ती आहे - तुष्की नागपुरी - https://goo.gl/DHk3Pl

▪एकदा - तुष्की नागपुरी - https://goo.gl/XjJGp0

▪एकच डेअरी मिल्क - तुष्की नागपुरी - https://goo.gl/phKlPA

▪उपकार - तुष्की नागपुरी - https://goo.gl/RBXXWA

    *|| ज्ञानभाषा मराठी ||*
*|| माझी शाळा📚माझी भाषा ||*

ऑनलाइन वाचनकट्टा : १०-११ सप्टेंबर

स्टार करून ठेवावा असा संदेश ....*👇 👇 👇
*वेळ मिळेल तसे ऐका, इतरांना ऐकवा, स्वतः वाचा..*

*📖ऑनलाइन वाचनकट्टा📖*

नमस्कार,

*||ज्ञानभाषा मराठी||* समूहातर्फे दर रविवारी, *'ऑनलाइन वाचनकट्टा'* हा उपक्रम राबवण्यात येतो.या उपक्रमांतर्गत सदस्य आपापल्या आवडीच्या पुस्तकातील काही अंश, मासिकातील लेख, इ. चे वाचन करतात, आणि त्याचे ध्वनिमुद्रण समूहामध्ये ऑडियोक्लीपच्या स्वरूपात पाठवतात.
अशी सर्व ध्वनिमुद्रणे आम्ही, साऊंडक्लाउड आणि गुगल ड्राईव्हच्या मदतीने संग्रहित करून त्याचे दुवे सामायिक करतो. वाचनसंस्कृती जपण्याचा एक लहानसा प्रयत्न !!!
१०-११ सप्टेंबरची वाचने खालीलप्रमाणे.
_______________________

*भोलानाथ कट्टा (लहान मुले)*
👫👬

▪ तिघांचं रडणं - कु.बहिराम चेतन (इयत्ता-७वी) - https://goo.gl/mYIj50

▪ वाचू आनंदे - कलिका पाटोळे (इयत्ता-५ वी) - https://goo.gl/sTr9Xr

▪ धगधगते यज्ञकुंड - नंदन कार्ले (इयत्ता-५ वी) - https://goo.gl/fHM74g

-------------------------------------

*📖अत्रे कट्टा📖*
👨🏻👩🏻

▪ अभितः परितः - डॉ. प्रज्ञा देशपांडे - https://goo.gl/ThxOwp

▪ कार्यकर्ता गुण - डॉ. प्रज्ञा देशपांडे - https://goo.gl/Wpp8nm

▪ आगगाडी व जमीन - प्रसन्न कुलकर्णी - https://goo.gl/PC9lFR

▪ कदंब - आरती भिडे - https://goo.gl/EV1OUW

▪ जानू - प्रशांत पिसाळ - https://goo.gl/4VB4Va

▪ जी. ए. - रेखा जोहरापुरकर - चवरे - https://goo.gl/MYgYGH

▪ दुनिया तुला विसरेल - स्वप्नील पाटील - https://goo.gl/sFhPx0

▪ वाचन साधना - वसुंधरा शर्मा - https://goo.gl/CTChO4

▪ शिक्षणाची प्रासंगीकता - डॉ. प्रज्ञा देशपांडे

भाग १ - https://goo.gl/JrrG6z
भाग २ - https://goo.gl/pvX6Ie

▪ संगणकासाठी टंकलेखन - निवेदिता खांडेकर - https://goo.gl/sW46Wo

▪ सावरकर वाङ्मय - प्रसन्न कुलकर्णी - https://goo.gl/NKtYqN

▪ चकवा चांदण - स्वप्नील शिंगोटे - https://goo.gl/ymytN7

▪ आम्हालाही हवाय मोबाईल - सुनिता चौधरी - http://goo.gl/YK4JL3

▪ किस्से शायरांचे - विजया सणस
भाग १ - https://goo.gl/3SXlK0
भाग २ - https://goo.gl/oTcxoM
भाग ३ - https://goo.gl/YdICxN
भाग ४ - https://goo.gl/18LCj6

▪ मला शिकायचंय - सुनीता चौधरी - https://goo.gl/h8to98

▪ अनिता जावळे - शाळा भेट - https://goo.gl/2v1KFj
----------------------------------------------

*📖सावरकर कट्टा📖*
👨🏻👩🏻

▪ अभिजात मराठी - प्रकरण पाचवे - सुचिकांत - https://goo.gl/1Ajvlf

▪ ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी - वृषाली गोखले - https://goo.gl/21SnVL

▪ धृपद - वृषाली गोखले - https://goo.gl/F8nLJE

▪ मृदगंध - वृषाली गोखले - https://goo.gl/5uPAms

▪ करेंगे या मरेंगे - केंद्रे मानेजी - https://goo.gl/sQBrTL

▪ सलाम मलाला - सौ. वैशाली नाडकर्णी - https://goo.gl/fXNQrD

▪ चित्तसदबोधनक्षेत्रमाला - श्री. चैतन्य - https://goo.gl/6tFnqQ

▪ जिवाभावाचे मैत्र - प्रमिला नजन - https://goo.gl/eXudj4

▪ माणसात देव शोधणारा संत - माधुरी देशपांडे - https://goo.gl/ODNHTV

▪ याची साठी केला अट्टाहास - सुचिकांत - http://goo.gl/MkE7HG

▪ वय वादळविजांचं - गोपाल कपाटे - https://goo.gl/cEhbzq

▪ काजळमाया - अभिजित कुलकर्णी - http://goo.gl/tWMsls

▪ विंदा - अभिजित कुलकर्णी - http://goo.gl/TtGsuW

▪ कळसूबाईची आंघोळ - मधुकर भांगरे - http://goo.gl/lIy19i

     *|| ज्ञानभाषा मराठी ||*
*|| माझी शाळा📚माझी भाषा ||*

📖ऑनलाइन वाचनकट्टा - ३-४ सप्टेंबर 📖

*स्टार करून ठेवावा असा संदेश ....*👇 👇 👇
*वेळ मिळेल तसे ऐका, इतरांना ऐकवा, स्वतः वाचा..*
*📖ऑनलाइन वाचनकट्टा📖*
नमस्कार,
*||ज्ञानभाषा मराठी||* समूहातर्फे दर रविवारी, *'ऑनलाइन वाचनकट्टा'* हा उपक्रम राबवण्यात येतो.या उपक्रमांतर्गत सदस्य आपापल्या आवडीच्या पुस्तकातील काही अंश, मासिकातील लेख, इ. चे वाचन करतात, आणि त्याचे ध्वनिमुद्रण समूहामध्ये ऑडियोक्लीपच्या स्वरूपात पाठवतात.
अशी सर्व ध्वनिमुद्रणे आम्ही, साऊंडक्लाउड आणि गुगल ड्राईव्हच्या मदतीने संग्रहित करून त्याचे दुवे सामायिक करतो. वाचनसंस्कृती जपण्याचा एक लहानसा प्रयत्न !!!
३-४ सप्टेंबरची वाचने खालीलप्रमाणे.
_______________________
*भोलानाथ कट्टा (लहान मुले)*
👫👬
▪आमचे घर - कु. कलिका पाटोळे - https://goo.gl/ruAN36
▪कथा शास्त्रज्ञांच्या - नंदन कार्ले - https://goo.gl/LINiQY
*📖अत्रे कट्टा📖*
👨🏻👩🏻
▪इतिहास संशोधनाचे धनुष्य - सौ. मृणाल - https://goo.gl/WdAERu
▪असेच हे कसेबसे - डॉ. अमेय गोखले - https://goo.gl/iHKrcB
▪स्त्रियांचे मराठीतील निबंधलेखन-डॉ.अमृता - https://goo.gl/FFUXH0
▪किलबिल गोष्टी - अनिता जावळे - https://goo.gl/P8Q0LW
▪घर - माधवी जोगळेकर - https://goo.gl/DHyvsW
▪एकपात्री कथा - स्वाती जोशी - https://goo.gl/v1sxKw
▪मातृभाषा गौ.वि. - डॉ. प्रज्ञा देशपांडे - https://goo.gl/064sho
▪ती रिकामी चौकट - रेखा जोहरापुरकर-चवरे - https://goo.gl/Ypu5oJ
▪भारतीय भाषा टंकलेखनातील आव्हाने - निवेदिता खांडेकर - https://goo.gl/T9hEz9
▪रग आणि धगधग - वसुंधरा शर्मा - https://goo.gl/YZyp1r
▪मातोसरी - स्वप्नील शिंगोटे - https://goo.gl/YTXTjm
*📖सावरकर कट्टा📖*
👨🏻👩🏻
▪शिक्षा - सौ. प्रमिला नजन - https://goo.gl/OhVbLX
▪कविता-देवशोधन - प्रभाकर खाडीलकर - https://goo.gl/aerZvV
▪मृदगंध - सौ. वृषाली गोखले - https://goo.gl/Q9eQdV
▪समर्थ रामदासांचे संगीतचिंतन - सौ. वृषाली
भाग १ - https://goo.gl/HDg8Fr
भाग २ - https://goo.gl/UTo8Rg
▪हिराबाई - सौ. माधुरी - https://goo.gl/8k282s
▪अभिजात मराठी - प्रकरण चौथे - सुचिकांत - https://goo.gl/TXbi0k
▪यक्षप्रश्न - वैद्य सुचित्रा कुलकर्णी - https://goo.gl/pQr6If
▪चित्तसदबोधनक्षेत्रमाला - श्री.चैतन्य - https://goo.gl/ttf2Zr

     *|| ज्ञानभाषा मराठी ||*
*|| माझी शाळा📚माझी भाषा ||*

Wednesday, September 7, 2016

🤗चॉकलेट🤗


🍫चॉकलेटचा सुवास मेंदूतील थिटा लहरी सक्रीय करतो, त्यामुळे मेंदूला विश्रांती मिळते, आणि छान हलकं फुलकं वाटतं.

🍫तांत्रिकदृष्ट्या व्हाईट चॉकलेटला आपण चॉकलेट म्हणू शकत नाही कारण त्यात कोकोचा वापर केलेला नसतो.

🍫१ पाऊंड(४५० ग्रॅम) चॉकलेट बनवायला साधारण ४०० कोकोच्या बिया खर्ची पडतात.

🍫आयुष्यभर चॉकलेट पुरवण्याच्या करारावर, चॉकलेटचिप कुकीच्या शोधकर्त्याने आपली चॉकलेटचिप कुकीची कल्पना नेस्लेला विकली.

🍫'जेम्स' सदृश्य चॉकलेटच्या रंगीबिरंगी गोळ्या १९४१ मध्ये बनवल्या गेल्या, जेणेकरून सैनिक देखील चॉकलेटचा(न वितळता) आस्वाद घेऊ शकतील.

🍫एकत्रितपणे हिशोब केल्यास अमेरिकन लोक, प्रत्येक सेकंदाला १०० पाऊंड चॉकलेट गट्टम करतात.

🍫जगातील सर्वात जास्त वजनदार चॉकलेटचं वजन, ५७९२ किलोग्रॅमआहे.

🍫'लेज व्हॅवी' या उत्पादनात चक्क मिल्क चॉकलेटमध्ये बटाट्याचे वेफर्स/चकत्या बुडवलेल्या आहेत.

🍫रोज डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका कमी व्हायला मदत होते.

🍫चॉकलेट खाल्ल्याने कुत्रा-मांजर आजारी पडून मरू देखील शकतात.

🍫चॉकलेट तोंडातील वाढणाऱ्या जीवाणूंना प्रतिबंध घालते, आणि दात किडण्यापासून संरक्षण करते.

🍫२०१३ मध्ये बेल्जियमने चॉकलेटच्या सुवासाचे काही पोस्टल स्टँप प्रसारीत केले होते.

🍫एकावेळी साधारण ९९०० ग्रॅम म्हणजे २२ पाऊंड चॉकलेट खाणे प्राणघातक ठरू शकते.

🍫अमेरिकेत झालेल्या संशोधनाप्रमाणे साधारणपणे एका चॉकलेट बारमध्ये कीटकांचे ७-८ अवयव असतात. भारतात काय परिस्थिती आहे, हे पाहणे रंजक ठरेल.

- http://goo.gl/Qfju4 - एबीसी वृत्तवाहिनी

- http://goo.gl/XWpxvg - U. S. Drug and Food Administration

🍫जर्मन चॉकलेट केक, जर्मन पदार्थ नसून त्याचे नामकरण अमेरिकन बेकर, सॅम जर्मनच्या नावावरून केलेले आहे.

🍫खोकल्यामध्ये कोडीन या औषधापेक्षा चॉकलेट अधिक प्रभावी आहे.

🍫फार्ट पिल, औषध घेतल्यास, पादल्यानंतर चॉकलेटसारखा तसाच गुलाबांसारखा सुवास येतो. या औषधाचा शोध, फ्रेंच संशोधक ख्रिस्तियान पोइंचेवाल याने लावला असून, आरोग्य विभागाने या औषधाला हिरवा कंदील दाखवलाय असा त्याचा दावा आहे.

- http://goo.gl/hT4r85

- http://www.pilulepet.com/en/

रोज इंग्रजीतून मराठीत एक अनुवाद करा. इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये असलेली माहिती मराठीत आणा.

#चला_अनुवाद_करूया
  
       || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||