ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Thursday, April 28, 2016

::: हरवत चाललेल्या म्हणी - ३ ::: ढवळी मुद्रा अन देवळी निद्रा

या म्हणीचा व्यवहारातील अर्थ असा की एखादा माणूस दिसायला अतिशय बावळट, भोळसट वाटतो, पण तो तसा नसून अतिशय व्यवहार चतुर असतो. चाणाक्ष आणि चलाख असतो. त्याला आपला स्वार्थ कळतो. दुसऱ्याची चालबाजी तो ओळखतो. मुद्रा जरी बावळट असली तरी देवळात झोपायचे फायदे त्याला माहिती असतात. थोडक्यात व्यवहारचतुर माणूस.

वाक्यात उपयोग - "आपल्या अवतीभवतीचे काही साधू व महाराज, 'ढवळी मुद्रा अन देवळी निद्रा' या स्वरूपाचे असल्यामुळेच ते मठाचे मठाधिपती झालेले आहेत.

संकलन :-

      ||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा-माझी भाषा ||

तुम्हाला माहित आहे का?

# गोल्डफिशला फक्त ३ सेकंदाची स्मृती असते.


# गोगलगाय ३ वर्षांपर्यंत झोपू शकते.


महाराष्ट्राचे शिल्पकार

महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना,
सह्याद्रीभर शुभेच्छा 💐💐💐

महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेकांनी मोलाचे योगदान दिले आहे. अनेकांची नावे आपल्याला माहित आहेत, अनेकांची माहित नाहीत, अनेकांची माहित असून देखील आम्ही ती मुद्दाम नाकारतो! आज महाराष्ट्र, देशात क्रमांक एकचे राज्य आहे, पण हे अव्वल स्थान असेच मिळाले नाही. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेकांनी आपले आयुष्य वेचले आहे.

गेले अनेक दिवस अशा सर्व शिल्पकारांची नावे शोधत आहोत पण तरीही, अनेक नावे या पोस्टमधून सुटली आहेत याची आम्हाला कल्पना आहे... अशा सर्व शिल्पकारांची माफी मागून ही पोस्ट शेयर करत आहोत.. 

यातील माहिती आंतरजालावरून घेतली आहे. विकिपीडिया, कौस्तुभ कस्तुरे यांच्या संकेत स्थळाची भरपूर मदत झाली, त्यासाठी त्यांचे आभार :
https://mr.wikipedia.org
http://www.kaustubhkasture.in/
______________________

🔴 श्री. चक्रधर स्वामी : (१२ वे शतक) : श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ, समाजसुधारक, व महानुभाव पंथाचे संस्थापक होते. महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक म्हणून मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात धर्मसुधारक होत. चक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेत अतिशय मोलाची भर पडली आहे.

🔴 श्री. ज्ञानेश्वर महाराज : (जन्म : इ.स. १२७५ - समाधी : इ.स. १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ होते.. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभाव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तुत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.

🔴 संत निवृत्तीनाथ : निवृत्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ किंवा १२६८ असे सांगितले जाते : ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.

🔴 संत मुक्ताबाई : संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांचे स्वतःचेही स्वतंत्र अस्तित्व होते. त्यांनी रचिलेले ताटीचे अभंग हे त्यांच्या नावावर नोंदविलेले आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत.

🔴 संत सावता (जन्म:इ.स. १२५०; समाधी इ.स.१२९५) : ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.

🔴 संत नामदेव : (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व ब्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठी’ तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.

🔴 संत चोखामेळा (चोखोबा) (अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) : संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.

🔴 संत एकनाथ(१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. तिब्रह्म, ‘संत’पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ.  ज्या काळात कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला.

🔴 समर्थ रामदास (१६०६ - १६८२) समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र - इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणार्‍या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.

🔴 संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा, तुका, तुक्या) : हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.

🔴 गाडगे महाराज ( डेबूजी झिंगराजी जानोरकर १८७६-१९५६) : अज्ञान-अंधश्रद्धा निर्मूलन ,अस्वच्छता उच्चाटन या कार्यातून विशेष ओळख. गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा हे आवडते भजन रचले. अज्ञान,भोळ्या समजुती , अनिष्ट रूढी ,परंपरा, दूर करण्यासाठी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला .देहू, नाशिक, आळंदी, पंढरपूर येथे धर्मशाळा बांधल्या, गरीब जनतेसाठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अनाथ अपंग लोकांना अन्नछत्राची सोय केली.१९५२ रोजी गाडगे बाबा मिशन स्थापन करून शैक्षणिक संस्था आणि धर्मशाळा बांधल्या. १९३१ वरवंडे येथे प्रबोधनातून पशुहत्या बंद केली.

🔴 गुलाबराव महाराज (६ जुलै, इ.स. १८८१ – २० सप्टेंबर, इ.स. १९१५) हे महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत व मराठी लेखक होते. "भगवद्देह अनध्यस्त-विवर्त आहे, म्हणजे ज्ञानानंतर नाश पावत नाही" हा भक्तिसिद्धान्त शांकरतत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून त्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला. सांख्य-योगादी षड्दर्शने परस्परविरोधी नसून पूरक आहेत, असे त्यांनी वेळोवेळी संगितले. "भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय हिंदू, बौद्ध, जैनादी भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मुसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत" असे विचार ते मांडत असत. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान इ. पाश्चात्त्य विचारसरणी त्यांना मान्य नव्हती. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करुन गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात केलेल्या ग्रंथनिर्मिती केली.

🔴 तुकडोजी महाराज ( माणिक बंडोजी ईंगळे १९०९-१९६८) : अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन या कार्यात अग्रेसर. 1935 रोजी मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.खंजिरी भजन हा त्यांच्या प्रबोधनाचे वैशिट्य होते. जपान सारख्या देशात विश्वबंधुत्वाचा संदेश प्रसारित केला. खेडेगाव स्वयंपूर्ण व्हावे या साठी 'ग्रामगीता' या ग्रंथातून उपाय योजले आहेत. ग्रामगीता, अनुभव सागरभजनवली, राष्ट्रीय भजनावली अशी ग्रंथसम्पदा. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचे खंजिरी भजन ऐकून त्यांना 'राष्ट्रसंत' म्हणून सम्बोधले.

__________________________

🔴 अनंत फंदी (१७४४-१८१९) : 'श्रीमाधवनिदान' या ग्रंठासोबतच अनंतफंदिंनी अनेक समाज प्रबोधनपर लावण्या लिहिल्या याशिवाय त्यांनी समाजात चांगल्या गोष्टी रुजवण्यासाठी आणि समाजाल जाग्रून करण्यासाठी 'कटाव' आणि 'फटका' हे काव्यप्रकार निर्माण केले.

🔴 बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (जानेवारी ६, इ.स. १८१२; पोंभुर्ले, महाराष्ट्र - मे १८, इ.स. १८४६) हे मराठी भाषेतल्या आद्य पत्रकारांपैकी एक पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी जानेवारी ६, इ.स. १८३२ रोजी सुरू केले. मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे एतद्देशीय समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंताग्रस्त असत. समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली.

🔴 तर्खडकर, दादोबा पांडुरंग : (९ मे १८१४–१७ ऑक्टोबर १८८२). अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक. मुंबई येथे जन्म. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते. ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे.

🔴 रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - इ.स. १८९२) हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला प्रगत राष्ट्राच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही. असे त्यांना तीव्रतेने वाटते. मराठीतून लेखन करणारे ते पहिले अर्थतज्ज्ञ होय. "लाक्षीज्ञान" या ग्रंथाद्वारे त्यांनी ऍडम स्मिथ प्रणित अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले.

🔴 डॉ. भाऊ दाजी लाड (१८२४-१८७४) : दैवज्ञ ब्राह्मण असणाऱ्या भाउंनी अनिष्ट सामाजिक रूढी आणि चालीरीतींना विरोध केला. स्त्री-शिक्षण, विधवाविवाह याबरोबरच त्यांनी मादक द्रव्यांच्या सेवनाविरूद्ध मोहीम सुरु केली. मुंबईचा पहिला गव्हर्नर माउंटस्तुअर्त एल्फिनस्तन याच्या कारकिर्दीत मुंबई वसवण्याच्या कार्यात पुढाकार घेतला.

🔴 विष्णूशास्त्री पंडित (१८२७-१८७६) : स्त्री-शिक्षण आणि विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते असणाऱ्या विष्णूशास्त्रींनी स्वतः एका विधवेशी विवाह करून एक नवा पायंडा पाडून दिला. याशिवाय आपल्या इंदुप्रकाश या वृत्तपत्रातून आधुनिक विचारांचा प्रसार केला.

🔴 महात्मा फुले ( जोतीराव गोविंदराव फुले १८२७-१८९०) : मराठी लेखक, विचारवंत, समाजसुधारक,शेतकरी व बहुजन समाज समस्या यांच्यासाठी झटणारे अशी ख्याती. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. विशाल दृष्टिकोणाचा क्रांतिकारक असल्याने १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली..नीती हाच मानवी जीवनाचा आधार असे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्व होते.१८५२ मध्ये पुणे लायब्ररीची स्थापना केली. विधवा विवाहास सहाय्य केले. बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवला. सार्वजनिक सत्यधर्म, दीनबंधू साप्ताहिक, गुलामगिरी ,ब्राह्मणांचे कसब असे काही ग्रंथ आणि लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत.

🔴 सावित्रीबाई फुले (१८३१-१८९७): मराठी शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक महिला म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी १८४७ मध्ये ज्योतिरावांची बहीण सगुणा हिला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. हि त्यांची पहिली शाळा. १८४८ मध्ये भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. तत्कालीन समाजाच्या विरोधाचा संघर्ष सहन करत त्यांनी शिक्षणप्रसारचा उपक्रम चालूच ठेवला. ज्योतिरावांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची धुरा त्यांनी समर्थपणे चालवली. नाभिक समाजात लोकांचे प्रबोधन करून त्यांचे संप घडवणे , पुनर्विवाह कायदा यासाठी कामे केली. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बयाबापुड्याना सत्यशोधक कुटुंबात आश्रय दिला.

🔴 रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७-१९२५) : भांडारकरांनी आपले स्नेही न्या. माधवराव रानडे यांच्यासोबत प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यांनी विधवा विवाह आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केल, एवढेच नव्हे तर स्वतःच्या विधवा कन्येचा पुनर्विवाह लावून दिला. भांडारकरांनी वैदिक ग्रंथ आणि पुराणांच्या आधारे समाजसुधारणा करण्याचे सर्वात मोठे कार्य केले.

🔴 न्यायमूर्ती रानडे (महादेव गोविंद रानडे १८४२-१९०१) : समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात.१८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष होते.मुंबई विद्यापीठात पहिले भारतीय फेलो म्हणून निवड. भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना. ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात आणि त्यांचा विस्तार करण्यात सहभाग.

🔴 विष्णुशास्त्री चिपळूणकर (१८५०-१८८२) : एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस सर्वात प्रथम स्वदेशी, स्वभाषा, आणि स्वसंस्कृती यांचा पुरस्कार करणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर हे 'मराठी भाषेचे शिवाज म्हणून ओळखले जातात. परंतु मराठीसोबतच त्यांनी इंग्रजीचेही महत्त्व ओळखले होते. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यातील, 'न्यू इंग्लिश स्कूल' ची स्थापना करण्यात चिपळूणकरांचा मोलाचा वाटा होता.

🔴 गोपाळ गणेश आगरकर(१८५६-१८९५): व्यक्तिस्वातंत्र्य,बुद्धिवाद,भौतिकता या मूल्याच्या प्रचारात अग्रेसर. जातीव्यवस्था,चातुर्वर्ण्य,बालविवाह,ग्रंथप्रमाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना विरोध केला. केसरी,सुधारक हि वृत्तपत्रे काढली. बाळ गंगाधर टिळक आणि चिपळूणकर यांच्या सहयोगाने पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना..

🔴 लोकमान्य टिळक (बाळ गंगाधर टिळक-१८५६-१९२०) : भारतीय स्वातंत्र्यातील अग्रगण्य नेते.१८८० रोजी न्यू इंग्लिश स्कुल ची स्थापना केली.१८८३ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारली. १८८१ रोजी केसरी  व मराठा वृत्तपत्रे सुरु केली. संस्कृत , गणित , खगोलशास्त्र यांचे मान्यताप्राप्त अभ्यासक होते.ओरायन,आर्क्टिक होम ऑफ वेदाज  , गीतारहस्य या ग्रंथांचे लेखन केले.

🔴 महर्षी धोंडो केशव कर्वे  (१८५८-१९६२): स्त्रीशिक्षण आणि सामाजिक सुधारणा यात अग्रेसर.भारतीय विद्यापीठातील डी. लिट.या पदवीने प्रथम सन्मानित.पदमविभूषण, भारतरत्न या सन्मानाने सन्मानित.१८९४ रोजी विधवा निवारण मंडळाची स्थापना.१र८९६ रोजी  अनाथ बालिकाश्रम काढला. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना. १९१६ मध्ये या तिन्ही संस्थांचे एकत्रीकरण करून महर्षी कर्वे 'स्त्रीशिक्षण संस्था' स्थापन केली.कुशल मनुष्यबळ मिळावे म्हणून 'निष्काम कर्म मठ' ची स्थापना १९१० साली केली. पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.

🔴 पंडिता रमाबाई (१८५८-१९२२) : स्त्री-शिक्षण आणि विधवाविवाहाचा पुरस्कार करणाऱ्या पंडिता रमाबाईंनी पुढे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. 'आर्य महिला समाज', 'शारदा सदन', 'मुक्तिसदन' या संस्थांची स्थापना करून पंडितां रमाबाईंनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी कार्य केले.

🔴 काशीबाई गोविंद कानिटकर ( १८६१-१९४८) : या लेखिका आणि स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. मराठी समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध साहित्याद्वारे आवाज उठवला. बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषेविषय शिकवत असत. पहिल्या भारतीय स्त्री.डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे चरित्र त्यांनी लिहिले.

🔴 रमाबाई रानडे(१८६३-१९२४) : स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळींच्या खंदया पुरस्कारत्या होत्या. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी व व्यासपीठ निर्माण करण्यासाठी हिंदू लेडीज सोशल क्लब ची मुंबई मध्ये स्थापना केली. पुण्यातील सेवासदन या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. पुण्यात मुलींसाठी हुजूरपागा शाळेची स्थापना केली. पुण्यातील येरवडा तुरुंगातील मानसिक रुग्णाच्य समस्येवर कार्य केले. स्त्री कैद्यांची सामूहिक प्रार्थना सुरु करून त्यांच्यात मनोधैर्य वाढवले. त्यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय महिला परिषदेचे पहिले अधिवेशन १९०४ साली मुंबईत भरले.

🔴 आनंदीबाई जोशी ( १८६५-१८८७): भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. तत्कालीन समाजाला महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून देण्यासाठी कलकत्यामध्ये एक भाषण केले.मी धर्मांतर करणार नाही  हिंदुधर्म व संस्कृती यांचा त्याग करणार नाही हे ठणकावून सांगितले . भारतात महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले. एम. डी. साठी त्यांनी हिंदू आर्य लोकांमध्ये प्रसूतीशास्त्र हा प्रबंध सादर केला. व्हिक्टोरिया राणीकडून यांचे अभिनंदन झाले. भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला.

🔴 डॉ. बाळकृष्ण  शिवराम मुंजे: (१८७२-१९४८) : प्रसिद्ध भारतीय सेनानी . त्यांना हिंदू महासभेचे तेजस्वी नेता म्हटले जाते. १९२७-२८ मधील अखिल भरतोय हिंदू महसभेचे अध्यक्ष होते. भारतीय सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक , समाजसुधारक व निष्णात नेत्रविशारद होते. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेवर संशोधन करून "नेत्रचिकित्सा" हा ग्रंथ लिहिला. तो अत्यंत उपयुक्त मानला जातो.अस्पृश्यता विरोधात त्याकाळी जे समाजप्रबोधन केले. त्याबद्दल त्यांना शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी धर्म वीर पदवी दिली. त्यांनी नाशिक भोसला मिलिटरी स्कुलची स्थापना केली.

🔴 छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२) :बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले . अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्यात बंदी घातली. १९१७ साली पुनर्विवाह कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. १९१६ साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन  संस्था स्थापन केली. पुस्तकांचे लेखन केले.

🔴 रघुनाथ धोंडो कर्वे (१८८२-१९५३) : संतती नियमन आणि समाज स्वास्थ यावर भरपूर लेखन. संतती नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक. १९२७ ते १९५३ पर्यंत समाज स्वास्थ हे मासिक निष्ठेने , निग्रहाने चालवले.आधुनिक आहारशास्त्र,आधुनिक कामशास्त्र, त्वचेची निगा , गुप्तरोगा पासून बचाव,वेश्याव्यवसाय, संतती नियमन-आचार व विचार अश्या सर्व अंगानी लेखन केले.

🔴 स्वा. सावरकर (१८८३-१९६६) : मराठी भाषेतील लेखक व कवी होते. भारतीय स्वातंत्रलढ्यातील एक क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्रपूर्व व स्वातंत्रोत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदू संघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ.विज्ञानाचा पुरस्कार ,जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी या चळवळीचे प्रणेते.प्रतिभावन्त साहित्यिक व प्रचारक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला होत.

🔴 भाऊसाहेब पायगोंडा पाटील (१८८७-१९५९) : यांना महाराष्ट्राचे बुकर "टी वॉशिग्टन" असे म्हटले जाते. त्यांना गाडगेबाबांनी कर्मवीर हि पदवी दिली. ग्रामीण शिक्षणप्रसारसाठी संपूर्ण आयुष्य वाहणारा द्रष्टा समाजसुधारक. १९१९ कऱ्हाड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९१० मध्ये स्थानिक लोकांच्या मदतीने दुधगांव विद्यार्थी प्रसारक मंडळाची स्थापना केली. १९३२ मध्ये मुलींसाठी "union boarding house" ची स्थापना केली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्युकेशन फंड स्थापना  केली. ते  समताधिष्टीत समाजनिर्मितीचे प्रयत्न करणारे समाजसुधारक होते.

🔴 ताराबाई मोडक (१८९२-१९७३) : 'शिशुविहार' या बालशिक्षण संस्थेची मुंबईत स्थापना करून त्याद्वारे मुलींना मोफत शिक्षण देण्याचे कार्य चालवले. याशिवाय ठाणे जिल्ह्यातील बोर्डी जवळील कोसबाड या गावी आदिवासी मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठीही कार्य सुरु ठेवले.

🔴 डॉ. केशव बळीराम हेडगेवार (१८८९-१९४०) : असहकार चळवळ आणि कायदेभंग आंदोलनात भाग घेणाऱ्या डॉ. हेडगेवारांनी स्वा. सावरकरांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन हिंदूंचे संघटन करण्यासाठी १९२५ साली 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. याच 'रा. स्व. संघाच्या' मधुकरराव देवलांसारख्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यात सावकारांकडे गहाण पडलेल्या दलितांच्या शेतजमिनी सोडवल्या आणि म्हैसाळ या गावी 'श्री. विठ्ठल संयुक्त सहकारी सहेतु सोसायटी' ची स्थापना केली, ज्याच्या आधारे अनेक दलित कुटुंबे आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभी राहिली.

🔴 डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६): भारतीय कायदेतज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते. १९९० साली भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले गेले. कायदा ,अर्थशास्त्र, आणि राज्यशास्त्र यातील अभ्यास व संशोधन यासाठी कोलंबिया विद्यापीठ व लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक येथून पदव्या मिळवल्या. १९२७ रोजी महाड येथे चवदार तळे याचा सत्याग्रह केला. १९२० साली "मूकनायक" हे वृत्तपत्र सुरु केले. मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी "बहिष्कृत हितकारिणी" सभा सुरु केली.

🔴 विनायक नरहरी भावे(१८९५-१९८२): भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते.महात्मा गांधींनी १९४० मध्ये वैयक्तिक सत्याग्रह पुकारला त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. समाज नेतृत्वासाठो दिल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले मानकरी. भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला.

🔴 देशमुख (भाऊसाहेब देशमुख (कदम) - १८९८-१९६५): १९३५ नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषिमंत्री म्हणून काम केले. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री.शिवाजी शिक्षण संस्था काढली. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी,पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरु केली. वैदिक वाड्.मयातील धर्माचा उदगम व विकास  या प्रबंधा बद्दल डॉक्टरेट.कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. हिंदुस्तानात कृषक क्रांतीचे  जनक म्हणतात.

🔴 सानेगुरुजी (१८९९-१९५०) : थोर गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, लेखक वा कवी असणारे साने गुरुजी हे समाजसुधारकही होते. सामाजिक समता आणि विविध धर्माच्या ऐक्याची विचारसरणी रुजवली. पंढरपुरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे म्हणून साने गुरुजींनी बेमुदत उपोषण केले, आणि अखेरीस मंदिर दलितांना खुले झाले.आधुनिक विचारांचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी 'साधना' या साप्ताहिकाची निर्मिती केली.

🔴 गोळवलकर गुरुजी :(माधव सदाशिव गोळवलकर १९०६-१९७३): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंचालक . बनारस हिंदू विश्वविद्यालय मध्ये निदर्शक म्हणून काम केले.त्यांची तत्वप्रणाली विवेकानंद तत्वप्रणलीशी सुसंगत होती. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग. देश विभाजनाविरुद्ध जनतेला कडवे आव्हान केले.

🔴 बाबा आमटे ( मुरलीधर देविदास आमटे- १९१४- २००८) : भारतातील प्रमुख आणि सन्माननीय समाजसेवी होते. समाज परित्यक्त आणि कुष्ठ रोगी यांसाठी आश्रम स्थापन केले.यापैकी आनंदवन हे एक होय. वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलनातही ते प्रमुख होते. १९८५ मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारत जोडो आंदोलन ही त्यांनी चालवले.

🔴 एकनाथजी रानडे (१९१४-१९८२): भारतातील सामाजिक व अध्यात्मिक चळवळीतील एक खंदे कार्यकर्ते होते. ते आपल्या सँघटनात्मक कार्यासाठी नावाजलेले होते. १९५६-१९६२ या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव होते. विवेकानंदशिला स्मारकाच्या बांधकामात स्वतःला झोकून दिले. व त्याचे काम पूर्ण केले.१९४५ मध्ये जबलपूर येथील सागर विद्यापीठातून एल.एल.बी. उत्तीर्ण केली.

🔴 पांडुरंगशास्त्री आठवले (१९२० - ) : संस्कृत भाषेचे पंडितम आणि धर्मविद्वान असणाऱ्या आठवले यांनी स्वाध्याय आंदोलनाची उभारणी करून गुजरात-महाराष्ट्र आणि कोकणपट्टी कोळी समाजाला संघटीत केले आणि त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग शिकवला. आठवले यांच्या आधुनिक समाज कार्याबद्दल त्यांना टेंपलटन पुरस्कार आणि 'रेमन म्यागसेसे' या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

🔴 विलासराव साळुंखे (१९३७- २००२): भूमिहीन मजुराला देखील पाण्याचे समान वाटप व्हावे या मागणीसाठी 30 वर्षे लढा देणारे तसेच पाणी या संकल्पनेने सामूहिक व्यवस्थापनाद्वारे पाण्याची साठवण व वितरण करून शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास घडवणारे सामाजिक कार्यकर्ते .पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील पाणलोट क्षेत्रविकास व त्याआधारे शेतीसिंचन हा प्रयोग विलक्षण गाजला.

🔴 किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे (जून १५, इ.स. १९३७: भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - हयात). मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे, किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. या नंतर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार देण्याचा कायदा लवकर संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.

🔴 डॉ. अनिल अवचट (१९४४ - ) : आपल्या माणस या पुस्तकातून त्यांनी देवदासी प्रथा आणि भटक्या विमुक्त समाजाबद्दलच्या व्यथा मांडून समाजाच्या प्रबोधनाचे कार्य केले.

🔴 सिंधुताई सपकाळ (१९४७) : अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या मराठी भाषिक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. २०१० मध्ये स्त्री व बालकल्याण क्षेत्रातील सामजिक कार्यकर्त्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार दिला गेला. २५८ राष्ट्रीय व काही आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित. त्यांनी आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत अनाथ मुलांना संभाळण्याचे समाज कार्य आज हि चालू ठेवले आहे.

🔴 विकास आमटे (१९४७) : मी बाबांच्या स्वप्नाचा ठेकेदार आहे. अशी स्वतःची ओळख सांगत आनंदवनाचे काम पुढे चालवत आहेत. एक जेष्ठ जलतज्ञ म्हणून त्यांचा मोठा अभ्यास आहे. बागायतीचे त्यांचे  ज्ञान थक्क करून सोडणारे आहे. बाबा आमटे सोमनाथला गेल्यापासून कुष्ठरोग्यांपासून आनंदवनातील पानाफुलांची काळजी घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विकास आमटे होय. यांच्या प्रयत्नामुळे आनंदवन हि एकमेव संस्थेचे रूपांतर ग्रामपंचायतीत झाले आहे.

🔴 प्रकाश आमटे ( प्रकाश मुरलीधर आमटे-१९४८):प्रकाश आमटे हे समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र. पत्नी डॉ.मंदाकिनी आमटे हिच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील भाररागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी व वन्यपशूंसाठी दवाखाना चालवतात. १९८४ मध्ये आदिवासी सेवक पुरस्कार,२००२ मध्ये पद्मश्री पुरस्कार, २००८ मध्ये मॅगसेसे पुरस्कार, २०१२ मध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार, २०१४ मध्ये मदर तेरेसा पुरस्कार...अशा  विविध पुरस्कारांनी सन्मानि

🔴 अभय बंग (१९५०) : मराठी डॉक्टर. सर्च या संस्थेमार्फत गडचिरोली मध्ये ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा व संशोधन कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारता सोबतच पाकिस्तान ,नेपाळ, बांगलादेश व अनेक आफ्रिकन देश प्रतिरूप म्हणून वापरतात. गडचिरोलीत दारूबंदी चळवळ, स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधन,सिकल सेल अनिमियावरील संशोधन असे भारीव कार्य केले. यांनी ब्रेथ काउंटर या उपकरणाचा शोध लावला.

🔴 पोपटराव पवार (१९६०): आदर्श गाव संकल्पनेचे प्रणेते.हिवरेबाजार गावाचा कायापालट केला. शेतीसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा, रस्ते,बीज,नोकरी-धंदा, सोशल कलचरल,या मुद्दयांद्वारे १९९०-९५ पर्यंत योजनापूर्वक केलेल्या आखणीतून हिवरेबाजार गावाचा कायापालट केला. हिवरेबाजार गाव आणि पोपटराव हे जणू समीकरणच बनले.

🔴 राणी बंग : स्त्रीरोग शास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी आदिवासी स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या व त्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारी कानोसा आणि गोईण हि पुस्तके लिहिली. त्याना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .माँ दन्तेश्वरी रुग्णालयाची स्थापना केली. वसा आणि अमिझी या गावात प्रत्येक स्त्रीला तपासलं आणि स्त्रियांच्या आरोग्याबद्दल संशोधन केले. अशिक्षित स्त्रियांना आरोग्य सेवेचे प्रशिक्षण "दाई आणि आरोग्यदूत" या मार्फत देण्यात येते. याची सर्व सूत्र डॉ. राणी बंग सांभाळतात.

      || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

      ⏩ पुढे पाठवा ⏩

Sunday, April 24, 2016

लई शब्द कसा आला?

- रयी म्हणजे श्रीमंत "रलयो: अभेदं वाच्यम्" ने रयि चे लयी>लई झालेय..

- डॉ. प्रज्ञा देशपांडे

Saturday, April 23, 2016

माकडांना खाऊ घालू नका

अनेक लोक माकडांना खायला घालतात, पण मित्रांनो आपण निसर्गाच्या फायद्याच्या दृष्टीने एक बाब लक्षात घ्यायला हवी.

ही माकडं मनुष्य वस्तीत येऊन, आयतं जेवून आळशी होतात. सहलीच्या ठिकाणी तर यांची मज्जाच असते. झाडावर चढून फळे तोडून खाणे या गोष्टीचा यांना कंटाळा येतो. वेफर्स, कुरकुरे, चपाती, भात असलं जेवायला घालून आपण निसर्गाचं चक्र तोडत आहोत. शिवाय ही माकडं माणसांना रेडी फूड साठी त्रास देतात, हातातले अन्न पळवून नेतात.

माकडं दूर दूर खाण्याच्या शोधात भटकली, यांनी स्वतः झाडावर चढून फळे खाल्ली, तर त्यांच्या विष्ठेतून फळांच्या बिया दूर पर्यंत पडतील, आणि वनांची वाढ होईल. वनांची वाढ न होण्यामागे हे देखील एक कारण आहे.

पहा पटलं तर आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना देखील सांगा. माकडांना त्यांचं जेवण स्वतः शोधुद्या, त्यांना आळशी बनवू नका.

- सुचिकांत वनारसे

Monday, April 18, 2016

⚗साधे प्रयोग🔬💡. तळपायावरचा भार मोजा 💡

⚗साधे प्रयोग🔬

  💡. तळपायावरचा भार मोजा 💡

🔵साहित्य –  स्वत:, वजन काटा, परात, पाणी, कुंकू किंवा मऊगाळ चिखल, मोठा आलेखाचा कागद.

कृती – वजन काट्याचा वापर करून तुमचे वजन पहा. ते नोंदवून ठेवा. तळपाय बुडतील एवढे पाणी एका परातीत घ्या. त्यात कुंकू किंवा मऊगाळ चिखल घालून दाट गंध तयार करा. परातीशेजारी एक आलेखाचा मोठा कागद जमिनीवर ठेवा. परातीत एक एक पाय बुडवून त्याचा एक एक ठसा आलेखाच्या कागदावर उमटवा. ठशांचा मिळून आकार किती चौरस सेंटीमीटर आहे ते मोजा. त्या आकाराला तुमच्या वजनाने भाग द्या. त्यावरून तुमच्या तळपायावर किती भार पडतो ते समजेल.

                                                                                                                                                                                                                                                                            
🔵मराठी विज्ञान परिषद🔵                                                                    

        ||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

        ⏩पुढे पाठवा⏩

Sunday, April 17, 2016

अंगठ्याचे ठसे

महत्वाची कागदपत्रे आहेत आणि त्यावर अंगठ्याचा ठसा उमटला नाही असे घडणे जवळपास अशक्यच. सध्या डोळ्यांची बुबुळ , dna वगैरे द्वारे व्यक्तीची स्वतंत्र ओळख होते परंतु सोपी आणि सर्वजगात प्रसिद्ध असलेली पद्धत म्हणजे अंगठ्याचा ठसा घेणे.

सर एडवर्ड फोर्ड या बंगालच्या पोलीस महासंचालकाने अधिकृत रित्या अंगठ्याचे ठसे वेगवेगळे कसे ओळखावेत याचा शोध लावला परंतु हि पद्धत तेवढी लोकप्रिय झाली न्हवती.

पण सोबत असलेल्या फोटोतील दोन माणसांमुळे अंगठ्याचा ठसा घेण्याची पद्धत रूढ झाली असं म्हणायला हरकत नाही कारण हे फोटो एकाच माणसाचे दिसत असले तरी " विल वेस्ट" आणि " विलीयम वेस्ट" अशा दोन माणसांचे हे फोटो आहेत. सदर व्यक्ती त्यांच्या आयुष्यात त्याआधी कधी एकमेकांना भेटलेल्या न्हवत्या पण सदर दोन्ही व्यक्ती गुन्हेगार म्हणुन एकाच तुरुंगात आल्या , त्यांचे दिसणे, नाव सारखीच त्यामुळे जो गोंधळ उडाला त्यातुन व्यक्तीचे वर्गिकरण करण्यासाठी जुनी पद्धत सोडुन अंगठ्याचा ठसा घेणे किती महत्वाचे आहे ते लक्षात आले.

या प्रकरणानंतर जवळपास सर्व जगभर हळूहळू हि पद्धत अंगीकारली गेली.

तुषार दामगुडे


स्वा. सावरकर - काही आठवणी : डॉ. वसंत काळपांडे सर

सुचिकांत, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर गेले त्यावेळी मी दहावीत होतो. त्यांना मी प्रत्यक्षात कधी पाहिले नाही. परंतु त्यांच्या 'स्वतंत्रते भगवती', 'सागरा प्राण तळमळला', 'माझे मृत्युपत्र' अशा कवितांतून भेटणारे भावनोत्कटता आणि प्रखर राष्ट्रभक्ती यांचा संगम असलेले प्रतिभाशाली कवी, तर त्यांच्या लेखांतून "गाय हा एक उपयुक्त पशु आहे, देव नाही.' , "एखाद्या वेळी थोडी गोहत्या झाली तरी चालेल, परंतु राष्ट्राची बुद्धिहत्या होऊन चालणार नाही." अशा जळजळीत शब्दांत विचार मांडणारे, पोथीनिष्ठेतून बाहेर पडण्याचे आवाहन करणारे विज्ञाननिष्ठ विचारवंत अशी दोन टोकाची, परंतु तेवढाच दिव्यत्वाची प्रचिती देणारी त्यांची रूपे त्यांच्या साहित्यातून अनुभवली होती.

 9वी ते 11वीला मराठी शिकवायला राम दारव्हेकर सर होते. ते प्रख्यात नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे लहान भाऊ. दारव्हेकर सर उत्कृष्ट शिक्षक तर होतेच, परंतु त्याचबरोबर सावरकरांचे अनुयायीसुद्धा होते.

आम्हाला प्राथमिक शाळेत मध्यप्रदेश सरकारची, तर माध्यमिक शाळेत विदर्भ माध्यमिक शिक्षण मंडळाची पुस्तके होती. पुरवणी वाचनासाठी प्रत्येक इयत्तेला एक स्वतंत्र पुस्तक असायचे. 9वी ते 11वी पर्यंत अनुक्रमे 'अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्यसेनानी', 'ती धन्य बंदीशाला' आणि 'उमाजी नाईक' ही पुस्तके पुरवणी वाचनासाठी होती.

'अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्यसेनानी' ही कादंबरी तात्या टोपे यांच्या जीवनावर आधारलेली होती. 1857च्या लढ्याला पूर्वी 'शिपायांचे बंड' म्हणत. त्याला स्वातंत्र्यसमर किंवा स्वातंत्र्ययुद्ध हे नाव स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच दिले हे दारव्हेकर सरांमुळेच कळले.

'ती धन्य बंदीशाला' हे डॉ. प्र. न. जोशी यांनी लिहिलेले पुस्तक स्वातंत्र्यसैनिकांच्या तुरुंगातील अनुभवांवर आधारित लेखांचा संग्रह होता. पुस्तकाच्या एका पानावर पुस्तकात काय असेल याची कल्पना देणाऱ्या कवितेच्या पुढील ओळी होत्या:-

गीतारहस्य बाळा
कमला विनायकाला।
दे स्फूर्ती जावयाला
ती धन्य बंदीशाला।।

या पुस्तकातले 'विनायक दामोदर सावरकर' हे प्रकरण शिकवताना दारव्हेकर सर अगदी देहभान हरपून शिकवायचे.

11वीला 'उमाजी नाईक' हे नाटक पुरवणी वाचनासाठी होते. ते शिकवताना उमाजी नाईक ----> लहूजी साळवे ---> वासुदेव बळवंत फडके ---> विनायक दामोदर सावरकर ही क्रांतिकारकांची मालिका सर अतिशय प्रभावी रीतीने समजावून सांगत.

______________

भाग २

दारव्हेकर सरांमुळे आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बरीच माहिती झाली होती.अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांच्याऐवजी सिंधुसागर आणि गंगासागर हे शब्दच तोंडात बसले होते.

1966मध्ये सावरकरांनी प्रायोपवेशन (आत्मार्पण) करण्याचा निर्णय घेतला. एवढ्या शूरवीर व्यक्तीने अशी आत्महत्या का करावी? आम्ही आपसात चर्चा करत होतो. दारव्हेकर सरांनाच आपण विचारू, असा आम्ही विचार केला. सरांना राग येईल काय? पण आम्ही धाडस करून सरांना विचारलेच. सर रागावले नाहीत. त्यांनी शांतपणे आम्हाला समजावून सांगितले.
"सर्वसामान्य माणसाला आपला जीव खूप प्रिय असतो. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेली, तिला तोंड द्यायची त्याच्याकडे हिंमत नसेल, तर वैफल्यग्रस्त होऊन तो आत्महत्या करतो. अशा रीतीने आपले जीवन संपवणे म्हणजे गुन्हाच आहे. परंतु आपले जीवनच समाजासाठी आहे अशा भावनेने आयुष्यभर कार्य करणाऱ्या व्यक्तींना आपले या जगातील कार्य संपले असे ज्यावेळी वाटते आणि अशावेळी ते जीवन संपवतात त्याला समाधी म्हणतात. सावरकरांचे प्रायोपवेशन हा समाधीचाच प्रकार आहे. संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानमहाराज यांची समाधी, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनी शरयू नदीत घेतलेली जलसमाधी, एकनाथ महाराजांनी गोदावरी नदीत प्रवेश करून घेतलेली जलसमाधी अशी अनेक उदाहरणे त्यांनी सांगितली. सावरकरांचा मृत्यू झाल्यानंतर दारव्हेकर सर तीन चार दिवस तरी येणार नाहीत असा आमचा समज होता. पण सर आले. त्यांनी नेहमीप्रमाणे शिकवायला सुरवात केली. "सर, तुम्ही नाही गेलात मुंबईला?" आम्ही विचारले. "मी? नाही.' "का, सर?" " सावरकरांकडून मी हेच तर शिकलो." ते म्हणाले. त्यांनी पुन्हा शिकवायला सुरवात केली. मात्र ते उदास वाटले. संध्याकाळी आम्ही काहीजण सरांच्या घरी गेलो. ते खूप मनमोकळेपणाने आमच्याशी बोलले. मनातल्या ज्या गोष्टी शाळेत बोलता येत नाहीत अशा.आम्हाला आणखी समृद्ध झाल्यासारखे वाटले.

📚 ज्ञानवर्धक शनिवार 📚

नमस्कार,

आजच्या परीक्षेची पोस्ट टाकताना, आमच्या हातून चुकून एका समुहावर उत्तरसूची टाकली गेली, त्यामुळे परीक्षेचा निकाल लावणे योग्य होणार नाही. कृपया खालील उत्तरसूची पाहून आपले गुण ठरवून सहकार्य करावे ..

1. PERMIT:ALLOW *
  a. deny:entice
 b. initiate:begin✅
 c. estrange:love
 d. crawl:sleep
 e. read:run

Explanation : Permit and allow are synonyms
Hence the correct option will be
 b) initiate : begin

2. Lion : cub *
  a. mother : aunt
 b. aunt : child
 c. mother : child ✅
 d. father : grandfather

Explanation : lion : cub is parent offspring relationship
So c) mother : child will be the right option

3. DISLIKE:HATE *
 a. inconvenience:cripple
 b. escape:permit
 c. ossify:lighten
 d. pacify:anger ✅
 e. execute:align

Explanation : ३) To be a good human being , you should learn to dislike hate and pacify anger

4. Kick : football *
  a. kill : bomb
 b. break : pieces
 c. question : team
 d. smoke : pipe ✅

Explanation :  Kick is action and football is object of action
Smoke is action and pipe is object of action

5. MUSICIAN:CONSERVATORY *
  a. lawyer:coffeehouse
 b. dog:kennel
 c. prince:throne
 d. gardener:garden ✅
 e. nurse:home

Explanation :  Musicians learn music in   conservatory
Gardeners learn gardening in garden

6. Glove : ball *
  a. hook : fish ✅
 b. winter : weather
 c. game : pennant
 d. Stadium : seats

Explanation : Gloves are used to catch ball
Hook is used to catch fish

7. TEPID:HOT *
  a. freezing:cold
 b. upset:furious ✅
 c. salamander:frog
 d. sick:ailing
 e. star:galaxy

Explanation :  Tepid is early stage of hot
Upset is early stage of furious

8. Race : fatigue *
  a. French : athlete
 b. fast : hunger ✅
 c. art : bug
 d. walking : running

Explanation : ८) fatigue is effect of race
Hunger is a effect of fast

9. Red fort : Delhi *
  a. red square : London
 b. Albany : New York ✅
 c. India : Madras
 d. Pakistan : Nepal

Explanation : ९) red fort is in Delhi.
Albany is in  New York.

10. DEMONSTRATE:DISPLAY *
  a. enervate:bolster
 b. perpetuate:preserve ✅
 c. entice:shun
 d. rescind:unveil
 e. marshal:juxtapose

Explanation : Demonstrate and Display  are synonyms
Hence the correct option will be
 b) Perpetuate : Preserve

    IIज्ञानभाषा मराठीII
IIमाझी शाळा📚माझी भाषाII

      ▶ पुढे पाठवा ▶

माझी प्रतिगझल

तमाम नव्या गझलकारांची सपशेल माफी मागून सादर आहे माझी एक प्रति गझल
:v :v :v


नवीन वाटलेली गझल जुनीच आहे
या शब्द वेल्डरांच्या धंद्यात खोट आहे

रचले कितीक इमले गाळीव अक्षरांचे
गरजूस मात्र देण्या हातात शून्य आहे

भांडवल किती करावे अज्ञात त्या दग्याचे
यांचेच दुःख असली तुमचे ते फ्रॉड आहे

उकरून आणलेले मुडदे जुन्या घावांचे
ते टांगण्यास भिंत नव  फेसबुकची आहे

सजवून मांडतांना जखमा विव्हल जिव्हारी
अश्रुस मात्र आता ग्लिसरिनचा वास आहे

भोकाड पसरुनीया  रसिका किती पीडावे
वळवून पाठ तोही इग्नोर मारतोहे

नवीन वाटलेली गझल जुनीच आहे
या शब्द वेल्डरांच्या धंद्यात खोट आहे

.....मिलिंद रानडे

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला पत्र

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी,

सप्रेम नमस्कार🙏

___________________
महोदय,

तुम्हाला काय  माहित झोपा काढणारे शिक्षकआहेत ? काही  पुरावा  आहे का ?

१. पहिला पुरुषाचा फोटो -
# वर्गात कमी अधिक वयाची  मुले आहेत.
# शिवाय एकाच गणवेषातली मुले नाहीत.
# तो फोटो एखाद्या खाजगी शिकवणीचा असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
# एकूण फोटोतील परिस्थिती पाहता तो शिक्षक (?) परीक्षेमध्ये सुपरव्हिजन करत आहे असे प्रकर्षाने जाणवते.
# ती जागा सरकारी शाळा असण्याची शक्यता वाटत नाही. शिवाय एवढी मोठी मुले खाली जमिनीवर का बसली आहेत?
# सरकारी शाळेच्या फळ्यावर रसायनशास्त्राची सूत्रे का लिहिली आहेत?
# पाचवीच्या आधी सोडा पण अगदी दहावीच्या मुलांनाही बेंझिन/cyclohexane विषयी एवढी सखोल माहिती नाही!!!!
 असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात.

२. महिलेचा फोटो -
# महिला आजारी असू शकते/ पोषण आहार बनवणारी महिला देखील असू शकते.
# ती शिक्षिकाच आहे हे कशावरून ठरवले आहे? तिच्या उशापासी फिरवी पिशवी कसली आहे?
# शिक्षिका अशी पिशवी उशाशी घेऊन का झोपेल?
# त्या महिलेच्या वर्गात देखील १ ते ४ थी ची मुले वाटत नाहीत. मुलांचे वय जास्त आहे.

कृपया अशा बातम्यांच्यासोबत पुरावे जोडले, शाळांची आणि शिक्षकांची नावे आणि त्यावेळची परिस्थिती काय होती, याची माहिती दिली तर अधिक चांगले होईल.

फुकट सरकारी शाळांची बदनामी होईल असे पोस्ट करू नका. तुम्ही सुद्धा whatsapp वर येणाऱ्या संदेशांवरून बातम्या बनवायला लागलात तर, लोकांचा पत्रकारीतेवरचा उरलासुरला विश्वास उडून जाईल.

http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/2013-12-19-12-39-28/item/30745

या बातमीशी तुम्ही असहमत असाल तर खालील इमेल आयडी वर लिहा शिवाय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या फेसबुक पानावर जाऊन प्रतिक्रिया नोंदवा
- jaimaharashtraonline@gmail.com
- https://goo.gl/TrQEwK

        || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

>>> संदेश पटल्यास पुढे पाठवा >>>

मेघना एरंडे

# Talespin, Ducktales, Return of Hanuman, घटोत्कच, डोरेमॉन, नॉडी, शिंचान, कृष्णा और कंस, अशा अनेक कार्टून फिल्म्स साठी डबिंग करणारी,

# तसेच डिस्कवरी, National Geographic साठी डबिंग करणारी,

# बेवॉच मालिकेमध्ये सी जे पारकर या चरित्रासाठी डबिंग करणारी,

# अनेक हॉलीवूड चित्रपटांसाठी हिंदीतून डबिंग करणारी,

# IVRS साठी आवाज देणारी [पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे ची माहिती ज्या तंत्रज्ञानाने दिली जाते],

सिने नाट्य अभिनेत्री मेघना एरंडे!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मराठी माध्यमातून शिकली - बालमोहन विद्यामंदिर दादर,
कारण - तिच्या शाळेत नाट्य वाचन स्पर्धा व्हायच्या, वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, तिला तिथे बक्षिसे मिळायची! तिच्या शिक्षिका, "विद्याताई पटवर्धन" यांनी तिच्यातील उपजत गुण हेरले, आणि तिला प्रोत्साहन दिले!

# अजून काही मराठी शाळांबद्दल सांगायची गरज आहे का?
# या अशा माहितीचा जितका जास्त जमेल तितका प्रसार करा!
# आपल्या मराठी शाळा, आपले वैभव
# विकीपिडीया - http://en.wikipedia.org/wiki/Meghana_Erande

Laptop /Desktop वरून फेसबुकवर आलेला व्हिडियो कसा डाउनलोड करावा?


खालील कृती वापरून प्रयत्न करा.
______________________

१. व्हिडियो वर राईट क्लिक करून, व्हिडियो URL मिळवा,
२. Browser मध्ये नवीन tab उघडा. तिथे ही URL पेस्ट करा.
३. मूळ - https://www.facebook.com/cleverly.me/videos/538238656379913/
आता यामधील www काढून, m पुढे लावा.
https://m.facebook.com/cleverly.me/videos/538238656379913/
४. आता enter दाबा
५. तुम्हाला फेसबुकचा थोडा वेगळा GUI दिसेल, व्हिडियो रन करा.
६. आता व्हिडियो रनिंग असताना, राईट क्लिक करा, तुम्हाला व्हिडियो .mp4 म्हणून सेव करण्याचा पर्यात मिळेल.
______________________

या पूर्ण क्रियेत तुम्हाला अजून कोणत्याही वेगळ्या app ची गरज नाही.
प्रयत्न करून बघा.

     || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩

Thursday, April 14, 2016

::: हरवत चाललेल्या म्हणी - २ ::: 'हात पाटीलकी करणे'

हात पाटीलकी करणे म्हणजे हाताने ठोकणे, बदडून काढणे, चांगला चोप देणे. तोंड पाटीलकी करणे याच्या विरुद्धची ही क्रिया. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करणे. काही वेळा आपल्या हट्टी मुलाला तोंडाने खूप समजुतीच्या गोष्टी सांगूनही उपयोग होत नाही. त्यांच्या वागण्यात फरक पडत नाही, तेव्हा नाईलाजास्तव टोले मारावे लागतात. यालाच 'चौदावे रत्न दाखवणे' असा दुसरा वाक्प्रचार वापरला जातो.

वाक्यात उपयोग - 'तोंड पाटीलकी सगळ्यांना जमते, पण हात पाटीलकी जमणे जरा कठीणच.'

संकलन :-
||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

Wednesday, April 13, 2016

::: आपले शब्द, शब्दांचे अर्थ ::: <<< नाठाळ >>>

नाठाळ म्हणजे, वाईट, दुष्ट, किंवा लबाड माणूस; पदोपदी फसवणारा खोटे बोलणारा माणूस. याच अर्थाने संतश्रेष्ठ तुकोबारायांनी भलेतरी देऊ कासेची लंगोटी | नाठ्याळाची काठी देऊ माथा | (९८७) अशी अभंगरचना केली आहे.

या शब्दाला या सारखाच पण थोडासा वेगळा, खोडसाळ, अडेल त्रासदायक असाही अर्थ प्राप्त झाला आहे. अनेक दुर्गुण असलेल्या माणसाचा उल्लेख करतानाही 'नाठाळ' शब्द एकेकाळी वापरला जात असे. 'साठी बुद्धी नाठी' या म्हणीमध्ये 'नाठी' हा आलेला शब्द 'नाठाळ' याच अर्थाचा आहे. मात्र येथे या शब्दाला 'हट्टी, अडेल' तसेच 'गैरलागू,   निरर्थक' असा अर्थ लाभला आहे. एखादा वयोवृद्ध माणूस चुकीचा, अव्यवहार्य, गैरलागू असा सल्ला देऊ लागला, की ही म्हण वापरली जाते. ती आजही वापरात आहे.

संस्कृतातील 'अनास्था' शब्दाला 'आल' हा प्रत्यय लागून त्यापासून 'नाठाळ' हा शब्द सिद्ध झाला, असे इतिहासाचार्य राजवाडे यांना वाटते. नाठाळपासून नाठाळ्की, नाठळी असेही शब्द तयार झाले आहेत.

संकलन :-

     ||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

Tuesday, April 12, 2016

झाडाला पैसे लागले तर ...

काजलच्या निबंधातील शब्दांमध्ये यत्किंचितही बदल न करता ..
______________
झाडाला पैसे लागले तर ...

लोक आळशी होईल. आणि मोठ्या प्रमाणात जंगलतोड होईल, लोक आपल्या घरी पैशाची झाडे लावतील, मग आपआपसात सगळा भांडन होईल, मग पैशाच्या झाडामुळे हत्त्या होईल, आणि शेतकरी ही आळशी होईल, शेतकरी पिक नाही उगवणार आणि आपआपल्या खायला नाही राहणार आणि सर्वजण मरणार जंगल तोडीमुळे जंगलातले प्राणी वस्तीत येईल तर माणसाने त्यांचे झाडं तोडली तर ते कुठ राहणार आणि आपल्या भारतात नुकसान होईल. आणि झाडाच्या पैशामुळे लोकजीवन खराब होईल, आणि जंगलातले प्राणी खेड्यात - गावात शहरात गोंधळ करतील. त्या गोंधळामुळे लोक मरणार, मग झाडाला पैसे लागले तर फळ मिळणार नाही, औषधी मिळणार नाही, आणि आजारी लोक मरतील खायला काहीच राहणार नाही, म्हणून पैशाचे झाडे नाही पाहिजे तर हे सर्व होईल म्हणून फळांचे झाडं असल तर बरं.
______________
काजल क्रिष्णा वासनिक, वर्ग ७ वा
जि. प. उ. प्राथमिक शाळा महादुला, जिल्हा नागपूर

Monday, April 11, 2016

डोंबिवली शोभायात्रा अहवाल

नमस्कार,

मराठी भाषा संवर्धन आणि मराठी शाळा सक्षमीकरण हे ज्वलंत मुद्दे घेऊन, कार्यरत असलेल्या ज्ञानभाषा मराठी, ज्ञानभाषा मराठी कार्यगट - डोंबिवली, आणि माझी शाळा-माझी भाषा गटांच्यातर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित डोंबिवली-शोभायात्रेमध्ये मराठी शाळांची आणि मातृभाषेतून शिक्षणाची महती सांगणारा चित्ररथ सादर करण्यात आला.

शोभायात्रेत अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली जाते. ज्ञानभाषा समूहाचे सक्रीय सदस्य, उन्मेष इनामदार, वृषाली गोखले, सायली आयरे, अनंत देवधर काका, मृणाल पाटोळे अशा सर्वांनी या संधीचे सोने करायचा निश्चय केला, परंतु हे काम सोपे नव्हते. अगदी निधीच्या उभारणीपासून अनेक संकटांचा सामना करत, चित्ररथाचे काम सुरु झाले. यात या सर्वांना वेळोवेळी ज्ञानमंदिर शाळेतील माजी विद्यार्थी, तसेच अनादीरव लेझीम पथकाच्या श्री. शैलेश नांदिवडे आणि विलास आंबेकर यांनी पूर्ण सहाय्य केले.

काही ठळक घटनाक्रम थोडक्यात :-

🔵 २ मार्च रोजी वृषाली गोखले,उन्मेष इनामदार, व मृणाल पाटोळे यांनी रीतसर अर्ज गणपती मंदिर संस्थेकडे सादर केला.

🔵 ४ मार्च रोजी उन्मेषजींनी या यात्रेत आवश्यक असलेले मराठी भाषा,मराठी शाळा आणि मातृभाषा यांचे महत्त्व सांगणारे चित्रफलक "ज्ञानभाषा मराठी" या समुहात सादर केले आणि तेथून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार बदल ही केले. त्याच दिवशी वृषाली ताई यांनी शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या शाळेंसाठी आवाहनपर पत्र तयार केले.

🔵 ६ मार्च रोजी गणपती मंदिर शोभायात्रा समितीची बैठक झाली तेथे प्रज्ञा वळंजू, वृषाली गोखले आणि मृणाल पाटोळे यांनी या समूहाच्या उद्दिष्टांचे थोडक्यात सादरीकरण केले. तिथे उपस्थित जाणीव संस्थेने या कार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली.

🔵 ११ मार्च रोजी ज्ञानभाषा प्रशासक चमूने गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत लागणाऱ्या साधारण खर्चाचा अंदाज घेऊन इच्छुक व्यक्तींना आवाहन करून वर्गणी बाबत गुगल फॉर्म वर वर्गणीदारांचीरांची नावनोंदणी सुरु केली. त्याला प्रतिसाद म्हणून १३,५००/-एवढी रक्कम जमा झाली.

🔵 २१ आणि २२ मार्च रोजी मृणाल पाटोळे आणि उन्मेषजी यांनी महात्मा गांधी शाळेत सहभाग पत्र दिले. महात्मा गांधी शाळेचे पर्यवेक्षक श्री.आहेर सर यांनी काही फलक आणि घोषवाक्य असलेल्या टोप्या प्रत्यक्ष कार्यालयात आणून दिल्या.

🔵 २३ मार्च रोजी मृणाल पाटोळे आणि प्रज्ञा वळंजू यांनी "ज्ञानमंदिर" शाळेत शोभायात्रा सहभाग पत्र दिले. त्या शाळेतील मराठीच्या शिक्षिका सौ.विभा जाधव यांनी माजी विद्यार्थी आणि स्वतः उपस्थित राहणार असल्याचे कळवले. त्यानुसार सागर महाजन, शरद पोळेकर हे बैठकीत उपस्थित राहिले.

🔵 २४ मार्च रोजी मृणाल पाटोळे यांनी शिवाई शाळेत सहभाग पत्र दिले त्या शाळेतील मुख्याध्यापिका सौ.इनामदार बाईंनी शिक्षक आणि माजी विद्यार्थी सहभाग घेतील असे कळवले आणि त्यानुसार प्रियांका ताम्हणकर आणि लक्ष्मण हे माजी विद्यार्थी उपस्थित राहिले.

🔵 २६ मार्च रोजी अनंत देवधर काका यांनी टिळक शाळा आणि पांडुरंग विद्यालय या शाळेत पत्र दिले श्री.आनंद काटीकर सरांनी वैशाली नाडकर्णी यांचे नाव सुचवले त्यानुसार वैशाली ताई "ज्ञानभाषा मराठी"समुहात सहभागी झाल्या. मृणाल पाटोळे यांच्यासोबत वैशाली ताईंनी शांतीनगर शाळा आणि आदर्श शाळा येथे पत्र सादर केले आणि आदर्श शाळेत शिक्षकांचा हुरूप वाढवावा म्हणून उत्तम मार्गदर्शन केले.

🔵 २७ मार्च रोजी ज्ञानमंदिर शाळेतील माजी विद्यार्थी शरद पोळेकर आणि सागर महाजन तसेच मराठी बोला चळवळीतील श्री आणि सौ.चंद्रकांत ताकभाते तसेच देवधर काकांचे मित्र श्री.विनायक देवस्थळी आणि वृषाली ताईंचे स्नेही अविनाश कुलकर्णी उपस्थित होते. त्यावेळी सागर आणि शरद यांनी मराठी भाषेची प्रतिमा तयार करून तिला मराठी मुळाक्षरांचा साज आणि मुकुट करावा हि संकल्पना मांडली.

🔵 ३ एप्रिल रोजी श्री.अनिल गोरे काका(मराठी काका) आणि श्री.सुचिकांत वनारसे यांनी या युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी दूरध्वनीवरून संवाद साधला.याच दिवशी सागर आणि शरद यांनी मराठी भाषेच्या राज्ञीचे दागिने आणि पेनाची निब असलेला मुकुट सादर केला. हे दागिने आणि मुकुट ट्विटरवर ट्विट करण्यात आला. देवधर काकानी वैयक्तिक आवाहन करणारा व्हाट्सअप्प संदेश तयार केला आणि सर्वांपर्यंत प्रसारित केला. याच दिवशी अनिल गोरे काका यांनी शोभायात्रेत रथाचे नामकरण "ज्ञानभाषा मराठी रथ" करावे असे सुचवले.

🔵 ५ एप्रिल रोजी सायली आयरे, शरद पोळेकर, उन्मेष जी यांनी ज्ञानभाषेचे बिल्ले, चित्रफलक कार्यालयात जमा केले. श्री.चंद्रकांत ताकभाते यांनी इडली चटणी या मुलांच्या खाऊची व्यवस्था अगदी चोख बजावली. मृणाल पाटोळे यांनी काही उरलेले फलक आणि शोभायात्रेतील सहभागी चित्ररथाचा क्रमांक मिळवला आणि उन्मेष सरांकडे सादर केला.

🔵 प्रत्यक्ष शोभायात्रेत सर्वांनी कोणकोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे याचे मार्गदर्शन व सूचना ज्ञानभाषा प्रशासक चमूमार्फत देण्यात आल्या. देवधर काकांनी त्याबाबत ई-मेल पाठवले.याच दिवशी देवधर काका आणि मृणाल पाटोळे टिळक शाळेत जाऊन विद्यार्थी संख्या निश्चित करून आले. श्री सुभाष पाटोळे आणि सायली आयरे यांनी मुलांच्या टोप्यांची व्यवस्था केली.

🔵 ७ एप्रिल रोजी प्रत्यक्ष चित्ररथाची सजावट करण्यासाठी सायली आयरे,मृणाल पाटोळे,यश आयरे,श्रेया आयरे,कलिका पाटोळे,सुभाष पाटोळे,चंद्रकांत ताकभाते, धीरज लोके,युगेश सावंत,शरद पोळेकर, सागर महाजन,स्वप्नील बैकर, ऐश्वर्या आयरे उपस्थित होते. त्यांनी पूर्ण रथ  सजावट मृणाल पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. त्याचे काही फोटो ज्ञानभाषा ट्वीटर ह्यांडलवरून प्रसारित करण्यात आले. हे सजावटीचे काम रात्री २ वाजेपर्यंत चालू होते.

🔵 प्रत्यक्ष पाडव्यादिवशी सर्व विद्यार्थी,शिक्षक आणि कार्यकर्ते आणि उम्मीद - उमंग या संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले. मृणाल पाटोळे यांनी प्रियांका ताम्हणकर हिला ज्ञानभाषा मराठी समूहाच्या कार्यपद्धतीचा आढावा सादर करण्याची जबाबदारी दिली आणि ती तिने उत्तम प्रकारे निभावली. तसेच शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांच्याशी संवाद ही केला. वृषाली ताई आणि वैशाली ताई यांनी रथयात्रेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संस्थांनी उभ्या केलेल्या मंचावरून ज्ञानभाषा मराठी समुहाचे कार्य आणि मातृभाषा मराठीचे महत्त्व विशद केले. सई इनामदार यांनी या सर्व रथयात्रेची छायाचित्रे काढण्यास मदत केली. मृणाल पाटोळे यांची विद्यार्थिनी प्रियांका इयत्ता ९ वी हीने मराठी भाषेच्या प्रतिमेचे संवाद अतिशय उत्तम पद्धतीने लोकांसमोर सादर करून जणू चित्ररथाचे सारथ्य केले. सर्व उपस्थित सहभागी संस्थांनीही या रथाला उस्फुर्त प्रतिसाद दिला.काही व्यक्तींनी स्वतःहून मनोगत ही व्यक्त केली की आम्ही चुकलो आम्ही आमच्या मुलांना मराठी शाळेत टाकायला हवे होते. पुढील पिढीने ही चूक करू नये म्हणून आम्ही त्यांचे प्रबोधन करू असे आश्वासनही दिले.

पूर्ण शोभायात्रेत या रथाला सर्वच नागरिकांच्याकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

🔵सहभागी शाळा आणि संस्था:
१. ज्ञानमंदिर शाळा - शिक्षक आणि माजी विद्यार्थी
२. महात्मा गांधी विद्यालया - विद्यार्थी
३. शिवाई शाळा - शिक्षक आणि विद्यार्थी
४. गणेशनगर येथील जोंधळे विद्यालय - शिक्षक आणि विद्यार्थी
५. कलिका पाटोळे आणि संकल्प क्लासेसचे विद्यार्थी
६. उम्मीद आणि उमंग सामाजिक संस्था - कार्यकर्ते

🔵शोभायात्रा सहभागासाठी मान्यवर वर्गणीदार:

१. उन्मेष इनामदार
२. अनोनिमस पुणे
३. मृणाल पाटोळे
४. वृषाली गोखले
५. सायली आयरे
६. सुभाष पाटोळे                
७. अनोनिमस नागपुरी
८. डॉ.प्रज्ञा देशपांडे
९. शरद गोखले
१०. काव्या नार्वेकर
११. तुषार येळवे
१२. अनंत देवधर
१३. वरुण देवरे
१४. पुरुषोत्तम इंदाणी
१५. बाळकृष्ण वाघ
१६. विजय महाले
१७. नेहाली शिंपी
१८. आशिष चित्रे
१९. बळीराम कदम
२०. चंद्रकांत ताकभाते

एकूण जमा : १३५००/-

एकुण खर्च

१. पेपर,रंग आणि इतर साहित्य - ५०० रु
२. बिल्ले - ११०रु
३. चित्रफलक छपाई - १८००रु
४. हातातील फलक - ३०००रु
५. टोप्या - १८००रु
६. चित्ररथ भाडे - २०००रु
७. छोटे चित्रफलक - ३००रु
८. मुलांना नाष्टा - १५००रु
९. झेरॉक्स - ५०रु
१०. फुले - ६००
११. औषधाच्या गोळ्या - १३०
१२. ग्लुकोज पावडर - ९०
१३. काठया - २६०
१४. वेशभूषा - ५००
१५. रिक्षा भाडे - २००
_______________________
एकूण : १२८४० रु
एकूण शिल्लक : ६६० रु

    || ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा📚माझी भाषा||









Sunday, April 10, 2016

⚗साधे प्रयोग🔬- बर्फाच्या बोटाने उचला तांदूळ


🔵साहित्य – तुम्ही स्वत:, पेला, पाणी, बर्फ, ताटली, तांदूळ, रुमाल.

🔵कृती – एका ताटलीत तांदूळ पसरून ठेवा. बोटाच्या चिमटीने तांदूळाचा एक एक दाणा उचलून घेण्याचा सराव करा. एका पेल्यात थोडे बर्फाचे तुकडे घाला. पेला पाण्याने भरा. या बर्फाच्या पाण्यात बोटे बुडवून गार होऊ द्या. त्यानंतर हात बाहेर काढून बोटे रुमालाने कोरडी करा. आता बोटांच्या चिमटीने तांदूळाचा एक एक दाणा उचलता येतो का पहा. बोटे गार पडल्यावर मेंदूचे संदेश त्यांच्यापर्यंत नीट पोचत नाहीत

                                                                                                                                                                                                                                                                             
🔵मराठी विज्ञान परिषद🔵                                                                    

        ||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

        ⏩पुढे पाठवा⏩

::: आपले शब्द, शब्दांचे अर्थ ::: <<< दंडवत >>>

पूर्वीच्या काळात पत्रामध्ये हमखास वापरला जाणारा शब्द आता क्वचितच वापरला जातो. खासकरून महानुभाव पंथीयांमध्ये हा शब्द अजूनही मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

दंड म्हणजे काठी, काठी. काठी जशी जमिनीवर टाकल्यावर जमिनीवर पडते तसा घातलेला नमस्कार म्हणजे दंडवत. या क्रियेचा म्हणजे नमस्काराचा विचार करून याला 'साष्टांग नमस्कार' असा अर्थ प्राप्त झाला आहे. पूजा करताना अथवा नमस्कार घालताना शरीर जमिनीवर दंडासारखे पसरणे म्हणजे दंडवत किंवा साष्टांग दंडवत होय. यातून नम्रता, लीनता, भक्तिभावही व्यक्त होतो. "तेथे माझे दंडवत निरोप सांगतील संत" असे तुकोबारायांनी या भावनेतून म्हटलेले आहे. 'दंड' म्हणजे पाठीचा कणा - खांद्यापासून कोपरापर्यंतचा भाग, असाही यातील एक अर्थ आहे. तो साष्टांग शब्दासाठी सूचक वाटतो. 'साष्टांग नमस्कार' म्हणजे अष्ट अंगांसह म्हणजे आठ अवयवांसह घातलेला नमस्कार. यात कोणते आठ अवयव अभिप्रेत आहेत? कपाळ, नाक, हनुवटी, छाती, कोपर, गुढगा, तळवा, आणि पाय हे ते आठ अवयव होत. नमस्कारासाठी आवश्यक असणारी ही आठ अंगे होत.

या दंडवत शब्दावरूनच 'देखल्या देवा दंडवत' अशी म्हण रूढ आहे. वरकरणी, खोटे खोटे केलेले स्वागत असा यामागे भावार्थ आहे. 'अटकवळ्या देवा दंडवत' या म्हणी वेळी एखाद्या संकट वा अरिष्ट अनुकूल झाले म्हणजे वापरतात.

'दंड' हा संस्कृत मधून आलेला शब्द आहे.

संकलन :-

     || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

Saturday, April 9, 2016

::: हरवत चाललेल्या म्हणी - १ :::

'मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी'

एकीकडे देवाधर्माच्या नावाने उपवास करायचा आणि उपवासाच्या नावाखाली त्या दिवशी गच्च पोटभर खायचे, असा दुटप्पी व्यवहार. कुशी म्हणजे आपले पोट.

आमच्या सीताबाई दर गुरुवारी उपवास करताना, २ बशा खिचडी, अर्धा डझन केळी, पावशेर पेढे, आणि ४-६ राजगिऱ्याचे लाडू खाऊन २ ग्लास दुध पितात. म्हणतात ना, 'मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी' 😂😂😂

       || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

Monday, April 4, 2016

आजचा शब्द - ५ एप्रिल

आजचा शब्द~>"वरपांगी"
वरकरणी,वरवरचा,तोंडदेखला,
दिखाऊ;superficial,
hypocritical
Twitter : @MarathiWord
📚📚📚📚📚📚📚📚
___________________________

डॉ. प्रज्ञा देशपांडे : इंग्लिश माध्यमात शिकतांना वरपांगी सुधारणावादी वाटते पण आपण आपल्या मायबोलीपासून तुटून खरे पोरके होत असतो.

निवेदिता खांडेकर : आजचे राजकीय पक्ष आपल्या आदरणीय व अनुकरणीय ऐतिहासिक व्यक्तींच केवळ वरपांगी कौतुक करतात, प्रत्यक्षात कृतीतून अनुकरण मात्र उलटेच असते.

प्रसाद सिनकर : जनतेचे आम्हीच तारणहार आहोत असं दाखवणाऱ्या राजकारण्यांच्या वरपांगी दिखाऊपणाचा उबग आलाय

मृणाल पाटोळे : बालिश बहू बायकांत बडबडला, वरपांगी दाखवलेला तोरा, युद्धात पार कोलमडला!!!!

प्रज्ञा वळंजू : वरपांगी शांत दिसणाऱ्या प्रशांत महासागरात आत जशी प्रचंड खळबळ चालू असते तसेच माणसाच्या मनाचेही आहे.असंख्य विचारांच्या लाटा त्याला मनाच्या किणाऱ्या वरच थोपवाव्या लागतात.

⚗साधे प्रयोग🔬 💡 हायड्रोजन वायू💡


साहित्य – बाटली, पाणी, ड्रेनेक्स, फुगे, दोरी.
कृती – एक उभी लहान तोंडाची बाटली घ्या. बाटलीत एक तृतीयांश उंचीपर्यंत पाणी भरा. बाटलीच्या तोंडावर बरोबर बसेल असा एक फुगा घ्या. कात्रीने ड्रेनेक्सची पुडीच्या कोपर्‍याला काप द्या. ड्रेनेक्सच्या पूडीतून सुमारे दोन ग्रॅम पूड बाटलीतल्या पाण्यात टाका. बाटलीच्या तोंडावर फुगा अडकवा. फुगा फुगला की दोरीने बांधून घ्या. हा फुगा हवेत तरंगतो.ड्रेनेक्समध्ये दाहक सोडा आणि ऍल्युमिनियमचा चुरा असतो. त्याच्या क्रियेने हैड्रोजन वायू तयार होतो. ड्रेनेक्स काळजीपूर्वक हाताळा.                                                                      
                                                                                                                                                                                                                                                                            
मराठी विज्ञान परिषद  
                                                                  
       ||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळामाझी भाषा ||

Sunday, April 3, 2016

आजचा शब्द - ४ एप्रिल


शुभ प्रभात
आजचा शब्द~> "मुकुलन":
नवजात,आरंभीचा काळ,उमलणे;
budding,nascent,incipient,inchoate
#मराठी #LearnMarathi

१. वृषालीताई 'मुस्कान" सारख्या बालकांचे मुकुलन करण्याची जिद्द बाळगतात ही अभिमानास्पदच बाब आहे

- डॉ. प्रज्ञा देशपांडे

२. झाडांना काय किंवा लहान मुलांना काय मुकुलनाच्या काळात जपावं लागतं, जोपासावं लागतं - प्रसाद सिनकर
                                                                               
३. बालकवींना सर्वच निसर्ग सौंदर्याच्या मुकुलनातून भरावलेला दिसतो.सौंदर्यरूपी मुकुलनातून उमटलेल्या त्यांच्या कविता अक्षरशः वेड लावतात.काव्यसौंदर्यातून विश्वाच्या सत्यस्वरूपाचा साक्षात्कार देतात!!!!!
_____________________
प्रीती फुलाच्या सुंदरतेचे
दव चुंबन घ्यावे
मुकुलन होता मनाचे
अनं धुंद रंगुनी जावे!!!

- मृणाल पाटोळे

_____________________
४. स्वागतयात्रेत ज्ञानभाषेच्या चित्ररथद्वारे प्रत्येक मराठी मनामध्ये माय मराठीच्या प्रेमाचे मुकुलन व्हावे हीच सदिच्छा
- प्रज्ञा वळंजू


९ वारी साडी

राजा रविवर्मा या चित्रकाराने देवीची चित्रे काढताना प्रथमच वस्त्रांकित देवींची चित्रे काढली. देवींसाठी महिलांची वस्त्रे चित्रित करणे आवश्यक असल्याने रविवर्माने आजच्या थायलंड, मलेशिया पासून अफगाण, इराण पर्यंत प्रवास करून महिलांच्या पोशाखांची माहिती घेतली. केरळमधील या चित्रकाराने निरीक्षण केलेल्या सर्व पोशाखांतून महाराष्ट्रीय नऊवारी साडीची निवड त्याने चित्रित केलेल्या देवींच्या चित्रांसाठी केली. तेव्हापासून संपूर्ण भारतीय उपखंडात महिलांच्या पोशाखात कितीही विविघता असली करी हिंदूंच्या संकल्पनेतील देवीच्या चित्रात किंवा मूर्तीच्या पोशाखात नऊवारी साडीच प्रामुख्याने आढळते.

अनिल गोरे मराठीकाका

थंडाई - पाककृती

उन्हाळ्यात पाणी पिऊन भुक कमी लागते थकवा जाणवतो. कोल्हापूरला असताना रोजच्या दिनक्रमातला महत्वाचा भाग म्हणजे थंडाई बनवणे. खुप पौष्टीक आणि चवीला मस्त असणारं हे पेय आहे. लहान मुल घरात असतील तर त्यांच्या साठी हे जरूर बनवा. लहान मुलं असल्या गोष्टी खायला प्यायला नको म्हणतात पण त्यांची थोबाडं उचकटुन त्यात कोंबा.
सांगत असलेली थंडाई महिनाभर टिकु शकते त्यामुळे त्या हिशोबाने बनवा.
साहित्य : सर्व आपल्या गरजेनुसार
काजु ,बदाम ,पिस्ता, बडीशेप,मगज बी, खसखस एकत्र करून दोन तास भिजत ठेवा. त्यानंतर हे भिजवलेले साहित्य मिक्सर मधुन काढा, मिक्सर मध्ये हवं तितके बारीक होत नाही त्यामुळे त्यानंतर पाट्यावर एकजीव करून घ्या. तोवर साखरेचा पाक करून ठेवा. मंद अग्नीवर त्या पाकात गुलाबजल, इलायची कुटून आणि केसर टाका. या मिश्रणात आपण वाटुन काढलेले काजु बदामाचे मिश्रण टाका. थंडाई तयार झाली.

गरज भासेल तेव्हा थंड दुधात हि थंडाई एक दोन चमचे मिक्स केलं कि मस्त पेय तयार. थंडाई शरीराला खुप चांगली आहे.

- तुषार दामगुडे


समुहाची नियमावली :



१. हा समूह मराठी शाळांसाठी म्हणजेच शैक्षणिक आहे. इथे २ च विषय ठेवा. मराठी शाळा आणि मराठी भाषा.
२. शैक्षणिक चर्चा होऊ द्या. १५ दिवसातून एकदा/महिन्यातून एकदा/वेळ प्रसंगी
३. समूहावर जात/धर्म/देव/राजकारण वगैरे असल्या विषयावरची चर्चा टाळा. हे वादाचे मुद्दे आहेत. याशिवाय दुसऱ्या जाती-धर्माला दुखावले जाईल असे संदेश देखील टाकू नका. यातून मतभेद आणि नंतर मनभेद होतात. याचा परिणाम तुमच्या एकीवर होऊ शकतो. या बद्दल ची मते स्वतः जवळ ठेवावीत.
४. शैक्षणिक साहित्य प्रसारित करा, तुमच्या शाळांचे प्रश्न मांडून दुसऱ्या शाळांकडून त्यांची मते जाणून घ्या.
५. एकवेळ समुहात लोक कमी असले तरी चालतील पण प्रतिसाद देणारे, चर्चेत भाग घेणारे, हवेत. बोलला नाही तर तुमचे आणि दुसऱ्याचे दोघांचे नुकसान आहे...
६. कुठले संदेश समूहावर टाकावे ? - मराठी संदेश/साहित्यिकांची ओळख करून देणारे संदेश/शाब्दिक कोडी/सामान्य ज्ञान, अर्थात ज्याचा तुम्हाला मुलांना शिकवताना उपयोग होऊ शकतो
७. मराठी टंकलेखन करा. आपण मराठी भाषा आणि देवनागरी लिपीचे समर्थन करतो.
८. पोस्ट करताना पहावे समुहावर काही चर्चा चालु आहे का? असल्यास संदेश टाकताना थांबावे.
९. बऱ्याच लोकांचा  इंटरनेट डाटा pack मर्यादित असतो, त्यामुळे  उगाच भलत्याच विषयावर वाद घालू नये, त्यामुळे बाकी लोकांना विनाकारण त्रास होतो, आणि आर्थिक नुकसान होते आणि लोक समूह सोडून जातात.
१०. या सगळ्याचा उद्देश समुहावर बंधने टाकणे नसून, या समुहातून प्रत्येकाला जास्तीत जास्त फायदा पोहोचवणे हा आहे..
११. सर्वच प्रशासक तुमच्यासारखेच नोकरदार असल्याने, सतत सर्व पोस्ट्स पाहणे शक्य नाही. एखादी आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास कृपया कोणत्याही प्रशासकांना फोन करून कळवा.
___________________________________
अतिरिक्त नियम - १
आपण आपल्या ज्ञानभाषा समुहाच्या मुख्य उद्देशाला कुठेही बाधा न पोहोचवता, नियमावलीत खालील काही बदल करू शकतो...
रोज संध्याकाळी ७ ते रात्री १० किंवा वेळोवेळी विविध विषयांवर चर्चां केल्या तरी हरकत नाही. जास्तीत जास्त लोक या वेळेत सक्रीय असतात आणि सर्वांना चर्चेमध्ये भाग घेता यावा म्हणून वेळ सुचवली आहे. बंधन नाही. आत्तापर्यंत आपण मुख्यत्वे भाषिक आणि शाळांच्या विषयांवर चर्चा करत आहोत. पण तरीही वाद नको म्हणून, जात/धर्म/देव/राजकारण यावर चर्चा टाळूया. वाचनकट्ट्याला मात्र कसलीच बंधने नाहीत. तुम्ही कोणत्याही विषयावर आक्षेपार्ह नसलेले साहित्य वाचू शकता.
चर्चेसाठी विविध विषय कोणते असू शकतात?
गॅजेट्स, छंद, तुम्ही घेत असलेले समाजोपयोगी उपक्रम, वाचलेले लेख, ऐतिहासिक संदर्भ, शैक्षणिक/रोजगाराच्या संधी इ. अगदी त्यादिवशी तुम्ही अनुभवलेला मजेदार किस्सा जरी बाकी लोकांसोबत शेयर केलात तरी हरकत नाही.
___________________________________
अतिरिक्त नियम - २ - दिनांक ३ एप्रिल २०१६
ज्ञानवर्धक चर्चा चालू असताना, कृपया कोणत्याही असंबद्ध पोस्ट्स टाकू नयेत. प्रथम काय चर्चा चालू आहे ते पाहूनच पोस्ट करावे, अशाने चर्चेत सहभागी लोकांचा रसभंग होऊ शकतो.
___________________________________
अतिरिक्त नियम - ३ - दिनांक ३ एप्रिल २०१६
समुहात चर्चा करताना भाषेत उर्मटपणा येणार नाही किंवा आपण कोणाला दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी.
___________________________________
अतिरिक्त नियम - ४ - दिनांक ३ एप्रिल २०१६
नियम न पाळणार्‍या सदस्याला अनेक वेळा सूचना देऊन देखील सुधारणा न झाल्यास, नाईलाजाने काही काळाकरता समुहातून काढून टाकण्यात येईल.
___________________________________

!!!Everything can not be documented!!! प्रत्येक मुद्दा लिखित स्वरूपात मांडणे अशक्य आहे!!! त्या त्या दिवशी, जनभावना लक्षात घेऊन, दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनामार्फत निर्णय घेतले जातील.

समुहाचे ट्वीटर खाते - https://twitter.com/SarvatraMarathi

फेसबुक पान - https://www.facebook.com/MajhiShalaMajhiBhasha/

ब्लॉग - http://sarvatramarathi.blogspot.in/

      || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||