श्री. प्रभू खाडिलकर : योग मान्य करताना त्याचे दैवताची माहिती पातंजलीनी दिली आहे. ती मानली नाही तरी पतंजलीना पहिले योगगुरू मानायला हरकत नसावी.
डॉ. प्रज्ञा देशपांडे : पतत्+अञ्जलि=पतन्+अञ्जलि=पतञ्जलि = व्याकरण महाभाष्यकार व योगशास्त्रकार (आदि शेष भगवान) *पतंजलि* यांच्या जन्मकथेवरून हे नाव आहे.
श्री. दिलीप फडके : पतंजली हे ऋषी होते ना, ते भगवान कधी झाले?
डॉ. प्रज्ञा देशपांडे : भगवान आदि शेष म्हटले ,पतंजलि नव्हे . तसेही *भगवान्* म्हणजे काय??
श्री. दिलीप फडके : Bhagvan म्हणजे god समजतो आम्ही
डॉ. प्रज्ञा देशपांडे : भग>ऐश्वर्य वत्>असलेला/ असलेली / असलेलं। भगवत्>भगवान्> ऐश्वर्ययुक्त, असा मूळ अर्थ आहे म्हणून देव/राजा/गुरु/उपकारकर्ता /तारणहार इ इ ला भगवान म्हणण्याचा प्रघात आहे.
श्री. दिलीप फडके : माझ म्हणणं इतकच कीं योगा जगभर पसरावा अस वाटत असेल तर त्याला देव देवतांच्या जोखडातून मुक्त केला पाहिजे
डॉ. प्रज्ञा देशपांडे : त्यात माझे दुमत नाही. *योगशास्त्र/योगदर्शन* याचा प्रचलित धर्मांशी संबंध नाहीच ,ते अतिशय नैसर्गिक विज्ञान आहे.
श्री. दिलीप फडके : पण तो जोडण्याचा अट्टाहास केला जातो ना
डॉ. प्रज्ञा देशपांडे : जे करतात ते अज्ञच पण जे तोडतात तेही सुज्ञ नव्हे . *योगदर्शन* मूळ भारतभूमीतील असल्यामुळे त्याचे भारतीयीकरण असणे स्वाभाविक आहे . पण भारतीय>हिन्दू >धार्मिक >संकुचित असा तर्क सुद्धा अतिकाळजीवाहक नाही का?
श्री. दिलीप फडके : मूळ भारतीय आहे हे सत्यच आहे पण मुळापेक्षा विस्ताराकडे अधिक पाहूया ना, आता कुणी मुळा शिवाय विस्तार वगरे काढू नये कृपया अर्थ घ्यावा
डॉ. प्रज्ञा देशपांडे : मन+बुद्धी +शरीर, कोणत्याही धर्माचे असो ते निरोगी राहून विकसित व्हावे हाच खरा योग होय
No comments:
Post a Comment