ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Sunday, June 11, 2017

कल्याण सार्वजनिक वाचनालय

काही दिवसांपूर्वी एके ठिकाणी भाषिक प्रश्नावरून वाद झालं होता. त्यावेळी एका व्यक्तीने मराठीने आपल्या औकातीत रहावं अशी टिप्पणी केली होती. प्रतिष्ठेच्या कारणामुळे मुलांना मराठी शाळेत न पाठवण्याकरता देण्यात येणाऱ्या १०१ कारणांपैकी एक म्हणजे ! मराठी ज्ञानभाषा नाही!!!

मराठी केवळ लहान-सहान विनोद, सुविचार पाठवण्यासाठी वापरण्यात येणारी भाषा आहे, असं तो म्हणाला. खाली मराठीची औकात किती आहे त्याचे फोटो दिले आहेत. डोळे फाडून बघा, इतरांनापण दाखवा. अमोल सुधाकर शिंपी​ यांनी पाठवलेले कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयातले फोटो. अजून ४-५ कपाटं राहिली आहेत.

हे सर्व ज्ञान-विज्ञान पर साहित्य, युनिकोडमध्ये गुगलवर आलं तर किती धमाल होईल, याचा विचार करा....अजून अनेक ग्रंथालयांमध्ये विज्ञानपर साहित्य वाचनाकरता उपलब्ध आहे, ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या मावळे अशी सर्व माहिती एकत्र करत आहेत..आणि म्हणे मराठी ज्ञानभाषा नाही.

#ज्ञानभाषामराठी ##ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान








































































































No comments:

Post a Comment